Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रश्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी वामन सामंत, उपाध्यक्षपदी विद्या हरेर. यांची निवड.🛑...

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी वामन सामंत, उपाध्यक्षपदी विद्या हरेर. यांची निवड.🛑 सर्व श्रमिक संघटनाच्या वतीने शनिवारी गडहिंग्लज येथे होणार निदर्शने.🛑मलिग्रे ता आजरा येथील जेष्ठ व अपंग मतदान प्रक्रिया सुरू🛑आजरा तालुक्यातील सोळा गावातील भजनी मंडळाना भजनाचे साहित्य वाटप.🛑शिवसेनेचे देवराज माडभगत यांचा आम. प्रकाश आबिटकर यांना गवसे विभागातून पाठिंबा

🛑श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी वामन सामंत, उपाध्यक्षपदी विद्या हरेर. यांची निवड.
🛑 सर्व श्रमिक संघटनाच्या वतीने शनिवारी गडहिंग्लज येथे होणार निदर्शने.
🛑मलिग्रे ता आजरा येथील जेष्ठ व अपंग मतदान प्रक्रिया सुरू
🛑आजरा तालुक्यातील सोळा गावातील भजनी मंडळाना भजनाचे साहित्य वाटप.
🛑शिवसेनेचे देवराज माडभगत यांचा आम. प्रकाश आबिटकर यांना गवसे विभागातून पाठिंबा

आजरा.- प्रतिनिधी.

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी वामन सामंत, उपाध्यक्षपदी विद्या हरेर कार्यवाहपदी कुंडलिक नावलकर व सहकार्यवाहपदी रविंद्र हुक्केरी यांची निवड करण्यात आली. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी वामन दत्तात्रय सामंत यांची तर उपाध्यक्षपदी सौ विद्या परशराम हरेर यांची निवड करणेत आली. कार्यवाह पदावर कुंडलिक सदाशिव नावलकर व सहकार्यवाहपदी रविंद्र वाळाप्पा हुक्केरी यांची निवड करणेत आली. डॉ. अशोक वाचुळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली. वाचनालयाच्या सल्लागार समितीचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यावेळी प्रमुख उपस्थित होते.

Oplus_131072

यावेळी कार्यकारीणी सदस्य संभाजी इंजल, सुभाष विभुते, विजय राजोपाध्ये, सदाशिव मोरे, महंमदअली मुजावर, बंडोपंत चव्हाण, विनायक आमणगी, डॉ. अंजनी देशपांडे, सुचेता गडडी, गीता पोतदार उपस्थित होते. सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अनिल देशपांडे, विजय वांदेकर, विलास नाईक, मारूती मोरे यांचे सहकार्य लाभले.

🛑 सर्व श्रमिक संघटनाच्या वतीने शनिवारी गडहिंग्लज येथे होणार निदर्शने.

आजरा.- प्रतिनिधी.

सर्व श्रमिक संघटना बॅक युनियन अंगणवाडी कर्मचारी संघ व पेन्शनरांच्या वतीने शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी गडहिंग्लज येथे शासनाच्या विरोधात निदर्शने करणार असलेचे गिरणीकामगार तालूका अध्यक्ष काॅ.शांताराम पाटील यांनी सांगितले. तसेच या शासनाने इ पी एस पेन्शन वाढ नाकारली. गिरणीकामगाराना मुंबई च्या बाहेर घरे दाखवली . कामगारांचे कंत्राटोकरण केले, महागाई प्रचंड वाढवली, जाती धर्माचा द्वेष पसरवला. याचा निषेध करण्यासाठी शिवाजी पुतळा गडहिंग्लज येथे आजरा चंदगड गडहिंग्लज येथील गिरणीकामगार पेन्शनर यांनी उपस्थित रहावे असे आवाहन काॅ शांताराम पाटील यानी केले आहे.

🛑मलिग्रे ता आजरा येथील जेष्ठ व अपंग मतदान प्रक्रिया सुरू

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा तालुक्यातील पुर्व भागातील गावाच्या मध्ये ८५ वर्षावरील आजारी जेष्ठ मतदार व अपंग मतदार यांचे त्याच्या राहत्या घरी जावून मतदान प्रक्रिया राबवण्यात येत आहे. गजरगाव सरबंळवाडी कानोली मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. मलिग्रे येथील सहा जेष्ठ मतदार व एक अपंग पैकी पाच मतदारांचे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली दोन मतदार बाहेर गावी असल्याने घरी जावून स्थळ पाहणी करून १६ तारखेला पुन्हा ही टिम मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार असलेचे ए बी मासाळ निवडणूक अधिकारी यानी सांगितले. यावेळी मतदान अधिकारी नामदेव देवळे गजानन बैनवाड लक्ष्मण रगडे ग्रामसेवक धनाजी पाटील तलाठी संजय माळी पोलिस एम एन टेळी पोलिस पाटील मोहन सावंत विजय देसाई बि आर भाग्यवंत राजेस कोकितकर याच्या सह माझी सरपंच अशोक शिंदे कारखाना संचालक अशोक तर्डेकर उपस्थित होते.

🛑आजरा तालुक्यातील सोळा गावातील भजनी मंडळाना भजनाचे साहित्य वाटप.

आजरा .- प्रतिनिधी.

Oplus_131072

अखिल भारतीय वारकरी मंडळ आजरा यांच्या माध्यमातून पंढरपूर येथील गजानन महाराज मठाच्या वतीने, दहा टाळ, पकवाज, विना, ज्ञानेश्वरी, तुकाराम, गजानन महाराज अशा तीन गाथा असे भजनी साहित्य आजरा तालुक्यातील मेंढोली, हारूर, सरबंळवाडी, कानोली, सरोळी, वाटंगी, किणे, मोरेवाडी, कासार कांडगाव, मसोली, लाटगाव, आवंडी, मुंगूसवाडी, शेळप, आंबाडे, किटवडे इत्यादी सोळा गावातील भजनी मंडळाना भजनाचे साहित्य वाटप कार्यक्रम पंढरपूर येथे संपन्न झाला. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळ आजरा चे अध्यक्ष हभप गौरव सुतार उपाध्यक्ष हभप संतू कांबळे, कोषाध्यक्ष कोडिंबा आडे, जिल्हा प्रतिनिधी राजाराम जाधव, सदस्य पांडूरंग पाटील, नामदेव सुतार, पुंडलिक गुरव, बाळासाहेब सुतार, गंगाराम येडगे, लक्ष्मण शिंत्रे, कल्पना जाधव, कलावती गुरव याच्यासह तालुक्यातील भजनी मंडळ व वारकरी उपस्थित होते.

शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख देवराज माडभगत यांचा आबिटकरांना पाठिंबा.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा गवसे आल्याचीवाडी येथील शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख देवराज माडभगत हे उद्या आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार आबिटकर यांना भेटून जाहीर पाठिंबा देत असल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगितले
ते म्हणाले की आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आमदार आबिटकर यांच्यासोबत राहून धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून त्यांना विजय करण्याचा निर्धार करायचा आहे.. तरी सर्वांनी उद्या एकत्र येऊन आमदारांना पाठिंबा द्यायचा असल्याचे सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.