Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रके. पी पाटलांची आजऱ्यात उभ्या पावसात सभा.- सुषमाताई अंधारे उशिरा सभास्थळी दाखल.(सोशल...

के. पी पाटलांची आजऱ्यात उभ्या पावसात सभा.- सुषमाताई अंधारे उशिरा सभास्थळी दाखल.(सोशल मीडियावर लाईव्ह येऊन सुषमा अंधारे यांनी घेतला विरोधकांचा समाचार.. )

के. पी पाटलांची आजऱ्यात उभ्या पावसात सभा.- सुषमाताई अंधारे उशिरा सभास्थळी दाखल.
(सोशल मीडियावर लाईव्ह येऊन सुषमा अंधारे यांनी घेतला विरोधकांचा समाचार.. )

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे महाविकास आघाडीचे शिवसेना उभाठा गटाचे उमेदवार माजी आम. के. पी. पाटील त्यांच्या प्रचारात आजरा शहराच्या बाजारपेठेत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या प्रमुख वक्त्या शिवसेनेच्या स्टार प्रचारक सुषमाताई अंधारे होत्या. परंतु प्रमुख वक्त्यांना येण्यास उशीर झाला. यावेळी बोलताना उमेदवार के. पी. पाटील म्हणाले
मागील दहा वर्षात साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराच्या मुलग्याला तरुण आहे. म्हणून आमदार केला त्याने मतदारसंघाचा विकास करता करता स्वतःच्या संपत्तीचा विकास केला वीस गुंठे कागदपत्रे जमीन नावे असताना.. अनेक एकर जमिनी घेत असा कागदोपत्री ९० एकर जमीन नावावर आहे अनेक पेट्रोल पंप अनेक क्रशर व प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना दोन वेळा उमेदवारी दिली. शेवटी त्यांच्याशी गद्दारी करून गुहाटी ला पळून गेले.. ते उद्धव ठाकरेचे राहिले नाहीत ते तुमचे आमचे काय राहणार.. यामुळे बदल घडवून शिवसेना पक्षाच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबा व मला आपली सेवा करण्याची संधी द्या.. असे उमेदवार के. पी. पाटील म्हणाले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना युवराज पोवार म्हणाले आजरा शहरात १०० कोटीचा विकास कंदील लावून शोधला पाहिजेत अनेक प्रश्न प्रलंबित असताना आजरेकरांना रोज एका आंदोलनाला सामोरे जावे लागत आहे.. यामध्ये येथील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक आंदोलन होतात.. यासाठी अन्याय निवारण समिती देखील स्थापन झाली.. त्यांनीही या आदरा शहराचा विकास व्हावा यासाठी अनेक आंदोलने केली.. आजरा शहर स्वच्छ व सुंदर मुबलक पाणी स्वच्छ पाणी आहे. चांगले रस्ते आहेत तर मग ही आंदोलने का होतात. विरोधकांकडून शंभर कोटीची अफवा पसरून विकासाच्या खोट्या गप्पा मारत आहेत. ज्यांनी मातोश्री श्री गद्दारी केली त्यांना गाडले पाहिजेत मशाल पेटवली पाहिजेत. यासाठी शिवसेनेचे उमेदवार के. पी. पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन श्री पोवार यांनी केले.
यावेळी शिवसेनेचे तडफदार वक्ते अकलाक मुजावर शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा व निष्ठावंत शिवसैनिक असा असतो. याचा समाचार घेत. के पी पाटील यांना का विजयी करायचे व गद्दार आला गाढायचे याबाबत मनोगत व्यक्त करत व्यासपीठाला व आजरा शहरातील नागरिकांना मतदारांना आपल्या तडफदार शैलीत शिवसेनेचे महत्त्व पटवून दिले.
त्यावेळी राहुल देसाई, अरिफ खेडेकर, तानाजी देसाई, अजय देशमुख, संग्राम सावंत अभिषेक शिंपी, यांची भाषणे झाली.
या सभेला मुकुंददादा देसाई, सुधीर देसाई, सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, उदयराज पवार, संजयभाऊ सावंत, विश्वनाथ कुंभार, जी. एम. पाटील, प्रभाकर कोरवी, मंजूर मुजावर, किरण कांबळे, संजीवनी सावंत, रचना होलम सह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी, शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक सर्व मतदार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दयानंद भोपळे यांनी सूत्रसंचालन केले. आभार समीर चांॅद यांनी मांनले

Oplus_131072

चौकट.

उमेदवार के पी पाटील यांचे भाषण चालू असताना पावसाने जोर धरला. व सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदाय हा. बाजारपेठेतील दुकान शेजारी उभा राहिला. परंतु उद्या पावसात के पी पाटील यांचे भाषण संपूर्ण होईपर्यंत बाजूला झाले नाहीत. भाषण संपून व्यासपीठावरून उतरले.. वया उभ्या पावसाचालू असताना आचारसंहितेचा कालावधी संपला व विद्युत खंडित झाला यावेळी शिवसेनेच्या नेत्या व या सभेच्या प्रमुख वक्त्या सुषमाताई अंधारे यांचे आगमन झाले. यावेळी उपस्थित जनसमुदाय यांनी सौ. अंधारे यांच्या सोशल मीडियावर लाईव्ह भाषणासाठी आग्रह धरला यावेळी अंधारे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आपले मनोगत व्यक्त करत विरोधकांचा समाचार घेतला.

विरोधकाकडून अफवा.
के पी पाटील यांच्या भाषण सुरू असताना जनसमुदाय उठून गेला..

परंतु पाऊस आल्यामुळे उपस्थित जनसमुदाय हा बाजूला उभा असल्याचे चित्र घटनास्थळी होते. यावेळेस अति पावसाने विद्युत प्रवाह खंडित झाला..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.