Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा ही माझी जन्मभूमी.- चंदगड कर्मभूमी व गडहिंग्लज कार्यक्षेत्र.- मानसिंग खोराटे

आजरा ही माझी जन्मभूमी.- चंदगड कर्मभूमी व गडहिंग्लज कार्यक्षेत्र.- मानसिंग खोराटे

आजरा (प्रतिनिधी) :

आजरा ही माझी जन्मभूमी आहे आणि चंदगड कर्मभूमी व गडहिंग्लज कार्यक्षेत्र आहे.आजपर्यंत आजऱ्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. कायमच दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे. एकतर हा भाग तीन मतदारसंघात विभागाला गेल्याने विकासाच्या नावाने फक्त आश्वासन देण्यात आली, ती कधी पूर्ण केलीच नाहीत. मात्र, आता आजऱ्याला हक्काचं नेतृत्व मिळालं असून हीच शेवटची संधी आहे. योग्य निर्णय घ्या आणि विकासाला मतदान करा असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी यांनी केले. आजार येथील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते.

आजरा भागात भावेवाडी, चाफवडे, चित्ता नगर, बुरुडे, जेऊर या भागात प्रचार दौरा काढण्यात आला. यावेळी प्रभाकर कोरवी, संग्राम आपके, दीपक केसादे, सुनील पन्हाळकर सुनील पाटील संजय पाटील, तुकाराम साबळे, रमेश येडगे, चिंतामणी तुकाराम नार्वेकर, आप्पा घुरे, भास्कर ईत्ताळे, जानबा बुडुळकर, नंदकुमार लाड, सागर लाड, जानबा मिसाळ, प्रकाश लाड, रामदास मिसाळ, दत्तात्रेय बापट, संजय भडांगे, रणजीत मोकाशी, महादेव सुतार, पुंडलिक दळवी, तुकाराम बापट, रामचंद्र पाटील, अनिल कांबळे, नंदकुमार कांबळे, बाबू कांबळे, अथर्व कांबळे, ऋषिकेश कांबळे, दीपक कांबळे, स्वप्नील कांबळे, रेखा कांबळे, सुनिता कांबळे, दिपाली कांबळे, सुवर्णा कांबळे, आप्पा घुरे, बाळू भाटकर आदी उपस्थित होते.

चंदगड मतदारसंघ हा विस्ताराने मोठा आहे. त्यात चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्याकडे देखील विकास नाही त्यातच आजाऱ्याचा जो भाग आहे त्याकडे मात्र इथल्या लोकप्रतिनिधींनीपण कायमच दूजाभाव दाखवला आहे. त्यामुळे यावेळी मात्र, आपल्या हक्काचा माणूस मिळाला आहे. याच मातीत मी वाढलो आहे. इथल्या लोकांच्या समस्या, कष्ट मी जवळून अनुभवलो आहे. त्यामुळे या माझ्या माताभगिनी, शेतकरी बांधवांना मीच न्याय देऊ शकतो. इथल्या तरुणांना नोकरी धंद्यासाठी मुंबई, पुण्याला जावं लागत. त्यांना इथेच नोकरी मिळेल, महिला भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करून देता येईल, कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योजकता मेळावा घेण्याचं नियोजन आहे, त्यामुळे या भागाचा कायापालट नक्की होईल हा शब्द देतो असं खोराटे म्हणाले.

दौलत कारखान्याच्या माध्यमातून चंदगड परिसराचा माझ्या प्रयत्नातून विकास याचा प्रयत्न केला. या भागातील शेतकरी दौलत सुरू झाल्यापासून सुखी समाधानी झालं आहे. आज आजरा भागातील ऊस दौलातला येतो. मात्र, इथला कारखाना अद्याप सुरळीत सुरू होऊ शकलेला नाही. त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मी नक्कीच सहकार्य करू शकतो. माझा या क्षेत्रातील अनुभव आणि कार्यपद्धती याच्या जोरावर या भागाचा सर्वांगीण विकास करणे हेच माझं ध्येय असून त्याला राजकीय ताकद गरजेची आहे. सर्वांगीण विकास तर नक्कीच करेन पण ते तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी राहणं गरजेचं असून येत्या निवडणुकीत नारळाची बाग चिन्हावर प्रचंड मतांचा आशीर्वाद देऊन विकासाची संधी द्या असे भावनिक आवाहन खोराटे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.