Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा येथे अण्णाभाऊ संस्था समूहाचा.. मेळावा संपन्न.( प्रमुख उपस्थिती नाम. हसन मुश्रीफ,...

आजरा येथे अण्णाभाऊ संस्था समूहाचा.. मेळावा संपन्न.( प्रमुख उपस्थिती नाम. हसन मुश्रीफ, आम. प्रकाश आबिटकर.- घड्याळ व धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याचे केले अशोक चराटी यांनी आवाहन.)

आजरा येथे अण्णाभाऊ संस्था समूहाचा.. मेळावा संपन्न.
( प्रमुख उपस्थिती नाम. हसन मुश्रीफ, आम. प्रकाश आबिटकर.- घड्याळ व धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याचे केले अशोक चराटी यांनी आवाहन.)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा तालुक्याला जोडलेल्या तीन विधानसभा मतदारसंघातील तीन आमदार निवडून आणणारा हा आजरा तालुका आहे. कागल विधानसभा व राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या अण्णाभाऊ संस्था समूहाने पाठीशी राहून धनुष्यबाण व घड्याळ या चिन्हाला मतदान करावे व दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी मेळाव्याला संबोधित करत होते. स्वागत व प्रास्ताविक विलास नाईक यांनी केले. यावेळी श्री. चराटी यांनी आजरा राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील विकास कामाचा आढावा दिला.
आजरा शहरात १०० कोटीची विकास कामे झाली असल्याचे सांगितले आजरा जिल्हा परिषद मध्ये झालेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडला उत्तुर विभागात आमचा समूहाचा कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या कर्मचारी व अण्णा समूहाच्या गटाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मताधिक्य देऊ. मुश्रीफ साहेब खरोखरच कामाचा माणूस आहे. आमच्याकडून काही मागील काळात चुका झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत. यापुढे सर्वांनी एकत्र राहून चांगल्या पद्धतीने काम करून जनतेचा विकास करूया होऊ घातलेल्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्य देऊन पुन्हा विधानसभेत पाठवूया असे बोलताना श्री चराटी म्हणाले.

यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले. अण्णाभाऊ चे काम कौतुकास्पद होते. अण्णाभाऊंनी तयार केलेले संस्थेची जाळे, व संस्था टिकून ठेवून चांगल्या पद्धतीने चालवल्या लोकांच्या हाताला का मिळाले. हे केलेले संस्थेचे जाळे हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पूर्वी या संस्था काढल्या वाढवल्या व चालवल्या हे सर्वात मोठे योगदान हे अण्णाभाऊंचं आहे. व त्याच धर्तीवर अशोक चराटी देखील यामध्ये वाढीव काम करून संस्था चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. मागील आपले व चराटी यांचे झालेले मतभेद हे चराटी यांनी व्यक्त केली अगदी मोठ्या मनाने त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. झालं गेलं विसरून जाऊ.. पण आज जी मला तुम्ही मदत करत आहात त्याचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. यावेळी प्रकल्पग्रस्तांचे आभार मानण्यात आले सन्मानाने पॅकेज घेऊन पाणी पुजनाला परवानगी दिली. व आपल्या विकास कामाच्या बळावर माझ्या सर्वजण सोबत आहेत. याचा मला सार्थ अभिमान असल्याचे बोलताना ना. मुश्रीफ म्हणाले.

यावेळी राधानगरी भुदरगड आजरा विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर म्हणाले.. आजरा जिल्हा परिषद मतदार संघात केलेल्या विकास कामाची पोहच पावती म्हणून आपण या जिल्हा परिषद मधून प्रचंड मताधिक्य द्यावे.. व आमच्या निवडणुकीच्या लग्नाच्या अक्षदा मताच्या पेटीतून टाकाव्या.. महायुती सरकारने अनेक योजना आपल्यासाठी आणल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. या सगळ्याचा विचार करून धनुष्यबाण व कागल विधानसभेचे उमेदवार हसन मुश्रीफ यांचे घड्याळ चिन्ह या चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार श्री अबिटकर यांनी केले. या मेळाव्याला अण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्व संचालक सर्व कर्मचारी तसेच अण्णाभाऊ गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट.

आपण पुन्हा एकदा संधी द्या पाच वर्ष हमाल म्हणून काम करू. फक्त जनतेसाठी…ना. हसन मुश्रीफ.

रवींद्र आपटे यांच्या कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो..
शासनाच्या अनेक योजना करण्यात आल्या.. परंतु विरोधकाकडून लाडक्या बहिणीची सावत्र भाऊ यांनी ही योजना थांबावी म्हणून हाय कोर्टात गेले. त्यांना योग्य जागा दाखवा. महिलांना सन्मान देणार योजना, सरपंचा सर्व कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले व अनेक महामंडळ स्थापन करण्यात आली.

खटाखट – खटाखट
धनुष्यबाण व घड्याळ चिन्हाला मतदान करा..ना. मुश्रीफ…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.