कोणतेही संविधानिक पद नसताना शंभर कोटीची विकास कामे म्हणून शिवाजी भाऊ पाटील यांना पाण्याच्या टाकी या चिन्हाला मतदान करण्याचे केले अशोक चराटी यांनी आवाहन.)
( आजरा येथे अण्णाभाऊ संस्था समूहाचा.. मेळावा संपन्न.)
आजरा.- प्रतिनिधी.

चंदगड विधानसभेचे अध्यक्ष उमेदवार शिवाजीभाऊ पाटील यांच्या प्रचारार्थ आजरा येथे कोळींद्रे जि प. मतदारसंघातील अण्णाभाऊ संस्था समूहाने पाठीशी व पाण्याची टाकी या चिन्हाला मतदान करावे व शिवाजी भाऊंना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी मेळाव्याला संबोधित करत होते. स्वागत व प्रास्ताविक विलास नाईक यांनी केले. यावेळी श्री. चराटी यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील कोणतेही संविधानिक पद नसताना केलेल्या १०० कोटींच्या विकास कामाचा आढावा दिला.
कोळींद्र जिल्हा परिषद मध्ये झालेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडला कोळींद्रे विभागात आमचा समूहाचा कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या कर्मचारी व अण्णा समूहाच्या गटाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मताधिक्य देऊ. असे मेळाव्यात बोलताना शिवाजीराव पाटील यांना आश्वासित केले.
यावेळी बोलताना उमेदवार शिवाजीभाऊ पाटील म्हणाले

मागील विधानसभा निवडणुकीत इतकं मोठं सभागृह माझ्यासोबत असतं तर त्याचवेळी आमदार झालो असतो. आज हे भरगच्च सभागृह पाहून समाधान वाटतं. आपण मला या मतदारसंघातून विजयश्री खेचून आणण्यासाठी जी साथ देत आहात. त्याची परतफेड मी विकास कामातून नक्कीच करेन. मागील वेळी घराणेशाही असताना देखील १७ हजार मते मिळाली या आमदार पाटील यांचा इतिहास पाहिला तर स्वतःच्या स्वार्थासाठी बापाचा विचार करत नाहीत ज्या जनतेच्या जीवावर निवडून आले किंवा त्यांचा तरी विचार करावा माझ्याकडे कोणतेही संविधानिक पद नसताना मी विकास कामावर जोर दिला निधी आणला दौलत कारखाना चालू केला. महायुती असताना देखील निवडणूक लढवण्याचा फार विचार करून निर्णय घेतला आहे तो आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व आपल्या जीवावर. यासाठी आपल्या सर्वांची सेवा करण्याची मला एक संधी द्या त्या संधीचे मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. सर्वांनी साथ द्या.. पाण्याच्या टाकी या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन उमेदवार शिवाजी पाटील यांनी केले.
या मेळाव्याला अण्णाभाऊ संस्था समूहाचे सर्व संचालक, कर्मचारी अण्णाभाऊ संस्था समूह गट व गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार जयवंत सुतार यांनी मांनले.
चोकट जनतेच्या पैशातील एक रुपयाही स्वतःसाठी वापरणार नाही.. शिवाजीराव पाटील.
मला आमदार करा जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला जाईल.. कोणत्याही निधीतील टक्केवारी घेतली जाणार नाही.- आमदारकीतील एक रुपये ही स्वतःच्या खर्चासाठी वापरणार नाही.. चंदगड मतदारसंघात 10 मोठे व्यवसाय उभे करण्याचा मानस आहे.. सोबत कला क्रीडा व सांस्कृतिक, व वैद्यकीय सेवेवर लक्ष केंद्रित करेन..
