आजरा तालुका बनणार इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण.
【आता शेतकरी पिकवणार इंधन, स्थानिकांना मिळणार रोजगाराच्या संधी.】
आजरा. प्रतिनिधी.२९
आजरा येथे मुंबई स्थित MCL ( मिरा क्लीन फ्युएल लिमिटेड) यांच्या माध्यमातून स्थापन झालेल्या आजरा समृद्धि प्रोड्युसर कंपनी लि. आणि छत्रपती शाहू महाराज बायोफ्युल्स प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून आजरा तालुक्यात जैवइंधन निर्मिती चा प्रोजेक्ट साकारला जात आहे. नुकतेच या कंपनीचे उध्दघाटन आजरा इथे झाले आहे. या प्रसंगी कंपनी चे डायरेक्टर श्री.बाळू वाघमारे, श्री.लक्ष्मण पाटील, श्री.सुरेश दळवी व श्री.शैलेश मुळीक यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांकडुन सभासद फाॅर्म भरुन प्रकल्पाचा शुभारंभ केला.
या कार्यक्रमासाठी दिनानाथ पांडे, हाजगोळी गावचे सरपंच पांडूरंग भादवणकर, समीर देशपांडे, टि.डी.चव्हाण, किशोर हरळकर, डॉ.अनिल गोरुले, सदानंद पाटील, किशोर केसरकर,राजू पाथरवट, विशाल कुंभार, सुधाकर खोत, डॉ.त्रिरत्ने, अनिकेत मुळीक, प्रितम बेलवाडे, सचिन व्हरंबळे, बाळकृष्ण कांबळे , उत्तम जाधव, शेखर पाटील व शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कागल हून आलेले श्री.किरण घुगरे यांनी प्रकल्पाची संपूर्ण माहिती दिली. या प्रकल्पामध्ये शेतात उगवणारे सुपर नेपियर ग्रास (हत्ती गवत ) या वाणा पासून बायो CNG,PNG,घरगुती गॅस, बायो डिझेल व बायो पेट्रोल ,फर्टिलायझर इत्यादी तयार केले जाणार आहे. शेतकर्याकडून एक हजार रु प्रती टन या दराने हत्ती गवत खरेदी करुन प्रतिदिन शंभर टन गॅस निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
शेतकरी आता मोठ्या प्रमाणात जनावारांसाठी ओला चारा म्हणून हत्ती गवताचे उत्पादन घेत आहे. यातील सुपर नेपियर हे विकसित वाण या साठी वापरले जाणार आहे.. कंपनी कडुन यासाठी बियाणे व खतांचा पुरवठा केला जाणार आहे. या पिकाला फारसे कष्ट लागत नाहीत. सर्वसाधारण कोणत्याही प्रकारच्या
जमिनीवर पण याचे उत्पादन होते. एकरी अंदाजे ४० टन उत्पादन होते. अंदाजे पाच ते सहा कापण्या वर्षाला येतात, सुपर नेपियर ग्रास हे एकदा लागण केली की ८/१० वर्षे उत्पादन देते.
शेतकरी वर्गाला काय मिळणार ?
कंपनीचे १०,००० सभासद करुन घेण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येकी ५०० रु. भरुन सभासद होता येईल. (२५० रू. प्रोसेशिंग फी व २५० रु.चे शेअर्स ) ऊस एकरी ४० टन निघाला तरी त्यातून अंदाजे १लाख २०हजार रु.उत्पन्न मिळते. त्यातील निम्मी रक्कम खर्चापोटी जाते….पण या गवतासाठी काहीच खर्च नाही. याचे अंदाजे एकरी ४० टन उत्पादन होते. कंपनी एक हजार रु.टन या दराने ते विकत घेईल. वार्षिक २०० टन उत्पादन धरले तरी दोन लाख रुपये शेतकर्याला मिळतील.
स्थानिक तरुणांना.-
रोजगाराच्या संधी
या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा जवळपास २५०० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.