Homeकोंकण - ठाणेविधिमंडळ पावसाळी अधिवेशन शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हिप जारी

विधिमंडळ पावसाळी अधिवेशन शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हिप जारी

विधिमंडळ पावसाळी अधिवेशन
शिवसेनेकडून सर्व आमदारांना व्हिप जारी

मुंबई. प्रतिनिधी. २९.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलैला होत आहे. या अधिवेशनात संपूर्ण दिवस उपस्थित राहायच आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करून मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांनी संपूर्ण अधिवेशन पूर्ण दिवस उपस्थित राहिले पाहिजे, असा पक्षादेश व्हीप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते कार्यालयाद्वारे शिवसेनेच्या आमदारांना जारी केला आहे.

👉विशेष म्हणजे विधिमंडळाच्या नियमित कामकाजासोबत या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता असल्यानं सेनेच्या या व्हिपला महत्व प्राप्त झालं आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचं स्थानिक स्वराज संस्थांमधील रद्द झालेलं अतिरिक्त आरक्षण, कोरोना रुग्णसंख्या, कोरोना लसीकरण, अनिल देशमुख प्रकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दुधाचे घटलेलं दर यामुळे विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता असल्यानं शिवसेनेनं देखील दक्षता म्हणून त्यांच्या आमदारांना व्हीप बजावला असल्याचं कळतंय.

👉दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या (ED) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित होते. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक झाली. त्याचदरम्यान राष्ट्रवादीचे दिग्गज नेते वर्षा बंगल्यावर दाखल झाल्यानंतर तासाभराने म्हणजे संध्याकाळी 4 च्या सुमारास स्वत: शरद पवारही वर्षा बंगल्यावर दाखल झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.