महिलांचा सर्वांगीण विकास साधने हे माझे मुख्य उद्दिष्ट – शिवाजीभाऊ पाटील.
( डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला समाजाचा भाऊंचे हात बळकट करण्याचा निर्धार. )
चंदगड .- प्रतिनिधी.

शिवाजीराव पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महिला समाजाचा निर्धार, बेरोजगारांसाठी रोजगार, महिलांचा सर्वांगीण विकास साधने हे माझे मुख्य उद्दिष्ट असून केवळ मागासवर्गीयचनव्हे तर संपूर्ण चंदगड आजरा व गडहिंग्लज मतदार संघातील बंधू- भगिनींना विकास वर्गीय बनविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे आश्वासन उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी इनाम सावर्डे येथे भव्य मेळाव्यामध्ये बोलताना सांगितले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी रोहयो मंत्री भरमूअण्णा पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी मेळाव्याला गोकुळ दूधचे संचालक नामदेव कांबळे, श्रीकांत नेवगे, बबनराव देसाई, प्रगतशील शेतकरी डॉ.सदानंद गावडे, प्रणाम हॉटेलचे मालक लक्ष्मण गावडे, सिताराम रामू कांबळे, रामदास नामदेव कांबळे, दाट्याचे प्रकाश गुंडू कांबळे, दत्तू झीलू कांबळे, (पाटणे) संदीप गोपाळ पाटणेकर, शिवाजी बागवे, वसंत रामू कांबळे, तानाजी पवार, सरपंच विंझणे, मायाप्पा पाटील,( तालुका अध्यक्ष मुन्ना महाडिक युवाशक्ती चंदगड) यावेळी बोलताना पुढे म् शिवाजीराव पाटील म्हणाले की चंदगड आजरा मतदारसंघाचा या मतदार संघाचा विकास करण्यासाठी जीवाची रान करणार असल्याचे शिवाजीराव पाटील म्हणाले या मेळाव्याला हजारोच्या संख्येने या भागातील मतदार बंधू भगिनी उपस्थित होत्या.
