Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रएमआयडीसी कामागारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार :आमदार प्रकाश आबीटकर( एमआयडीसी कामगार मेळाव्यास...

एमआयडीसी कामागारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार :आमदार प्रकाश आबीटकर( एमआयडीसी कामगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद )

एमआयडीसी कामागारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार :आमदार प्रकाश आबीटकर
( एमआयडीसी कामगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद )

गारगोटी : प्रतिनिधी.

Oplus_131072

एमआयडीसी कामगारांना अनेक प्रश्न भेडसावत असुन कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन आमदार प्रकाश आबीटकर यांनी केले. ते कुर येथे एमआयडीसी कामगार मेळाव्यात बोलत होते. अशोकराव फराकटे, मदन देसाई प्रमुख उपस्थित होते.

आमदार आबिटकर पुढे म्हणाले, एमआयडीसीमध्ये सगळ्यात जास्त कामगार राधानगरी मतदार संघातील आहेत. एमआयडीसीमुळे कामगारांच्या टॅलेंटला न्याय मिळू लागला आहे. विविध कंपन्यामध्ये खेडोपाड्यातील युवक अधिकारीपदी काम करून आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. मात्र काही कंपन्या कामगारांची पिळवणूक करत आहेत. कर्मचाऱ्यांची पिळवणूक केल्यास कंपनीच्या मालकांना जाब विचारुन न्याय मिळवून देऊ. मालकांच्या लहरीपणांमुळे कंपन्या बंद करून कामगारांचे भविष्य बरबाद करणा-यांना वठणीवर आणू असा इशारा देत कामगार सुरक्षित ठेवण्यासाठी संसदेत कायदे करण्यास भाग पाडू. कामगारांच्या वाहनांना नाहक त्रास दिला जातो अशी कामगारांची तक्रार आहे तो त्वरित थांबवावा. कामगारांच्या समोर अनेक प्रश्न त्यांचे प्रश्न मार्गस्थ लावण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करू असे आश्वासन आमदार आबिटकर यांनी दिले.

कामगार सभेचे जिल्हाध्यक्ष डी. एस. बुजरे एमआयडीसी कामगारांचे कंपनी कामगार धोरण लागू करण्यासाठी आमदार आबिटकर यांच्या माध्यमातून प्रयत्न करू.

सागर जरग म्हणाले दहा वर्षापूर्वी मतदार संघाची दुर्दशा झाली होती. आमदार प्रकाश आबिटकर यांनी हा मतदार संघ विकासाच्या वळणावर आणला आहे.

रुपेश भांदीगरे, म्हणाले विकासा पासून वंचित राहिलेल्या घटकांचा आमदार प्रकाश आबीटकर यांनी विकास साधला. त्यांचे व्हिजन मोठे असुन कार्यकुशल आमदारांच्या कामाबद्दल आम्हाला अभिमान आहे. सुनील किरोळकर म्हणाले आमदार आबिटकर यांनी कामगारांचे प्रश्न वेळोवळी मार्गस्थ लावण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे कामगारांनी आ. आबीटकर यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

संतोष शिंदे, सरपंच रणजीत पाटील (कुंभारवाडी) यांनी सर्व कामगार व त्यांचे कुटुंबीय निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर यांच्या ठामपणे पाठीशी राहतील अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी अशोक फराकटे, मदन देसाई , वसंत प्रभावळे, समाधान मोरे, अरविंद म्हांगोरे, सुनील वागरे, दिपक पाटील, प्रवीण पाटील सुळंबी, संतोष शिंदे धनाजी राठोड अरुण राठोड आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन विश्वास आरडे यांनी केले. प्रास्ताविक प्रविण शिंदे यांनी केले. आभार विजय चव्हाण मानले.
……………………………..
आबीटकर कामगार मंत्री होतील…
आमदार प्रकाश आबिटकर यांनी कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सोडविण्यासाठी वेळोवळी प्रयत्न केले आहेत. मंत्री सुरेश खाडे यांच्या सोबत बैठका घडवून आणल्या आहेत. या निवडणुकीत आ. आबीटकर यांचा विजय निश्चित असुन त्यांना कामगार मंत्री पद मिळेल असे अनेक कामगारांनी मनोगतात सांगितले.
…………………………….
चिठ्ठीला भुललो नाही…..
आपल्या युवकात टॅलेन्ट आहे. आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर प्रत्येकांने भविष्य घडविले आहे. बिद्री चिठ्ठीच्या मोहजालात अडकलो असतो तर आत्महत्या करण्याची वेळ आली असती अशा कुटूभावना अनेकांनी व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.