दिपावली पाडव्याच्या मुहुर्तावर जनता बँक आजरा कडे – १५ कोटी ०४ लाखाच्या विक्रमी ठेवी जमा.
आजरा.- प्रतिनिधी.
जनता सहकारी बँक लि., आजरा या बँकेकडे दिपावली पाडव्याच्या मूहुर्तावर रु. १५ कोटी २४ लाखाच्या ठेवी जमा झाल्या आहेत. सभासद, ठेवीदार, हितचिंतक व ग्राहक यांचा बँकेवर असलेला दृढ विश्वास व बँकेबद्दल असलेली आत्मीयता दिसून आली. तसेच बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
बँकेने अनेक यशाची शिखरे पार करत देश स्तरावर सर्वोकृष्ट बैंक, बेस्ट क्रेडीट ग्रोथ बैंक. बेस्ट एन पी ए मॅनेजमेंन्ट, बेस्ट टर्नाराऊंड बँक, बेस्ट टेक्नॉलॉजी इंम्पलीमेंन्टेशन, बेस्ट सीईओ, बेस्ट चेअरमन असे अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. बँकेकडे रु. ३८८ कोटीच्या ठेवी, रु. २६० कोटीची कर्जे व रु. १६० कोटीचो गुंतवणूक असून बँकेने सलग शुन्य टक्के नेट एन पी ए ठेवण्यामध्ये सातत्य राखले आहे. बँकेच्या एकूण २० शाखा कार्यरत असून बँकेचे कार्यक्षेत्र कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, ठाणे. मुंबई व उपनगरे असून नुकतेच रिझर्व बँकेने नवीन तीन शाखांना नेसरी, ता गडहिंग्लज, कलंबा, ता करवीर, पेठवडगांव, ता हातकणंगले या ठिकाणी शाखा उघडणेस परवानगी दिलेली होती. तिन्हो शाखा वेळेत सुरु करुन अल्पावधीतच अपेक्षेपेक्षा जादा व्यवसाय सदर शाखेने केला आहे.
यापुढे बँक मुंबई व पुणे येथे येणाऱ्या वर्षामध्ये शाखा ओपन करणेचा मानस आहे अशी माहिती बँकेचे चेअरमन श्री मुकुंददादा देसाई यांनी दिली. तसेच बँकेची प्रगती ही बँकेवर विश्वास ठेवलेल्या ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक तसेच बँकेचे कर्मचारी व त्यांनी पुरविलेल्या सेवेमुळेच झालेली आहे असे मत बँकेचे सीईओ श्री एम बी पाटील यांनी मांडले.बँकेकडे अद्यावत तंत्रज्ञानयुक्त डी सी व डी आर सेंटर असून बँकेच्या २० शाखांपैकी १३ शाखा स्वमालकीच्या इमारतीध्ये कार्यरत आहेत. तसेच बँकेकडे सर्व प्रकारची अत्याधुनिक टेकनॉलॉजी, यु पी आय. आर टी जी एस. एन ई एफ टी. आय एम पी एस. पॉज, ई कॉम, रिसायकलर ए टी एम. एस एम एस सुविधा व मोबाईल बँकींग यासारख्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहेत. बँकेने आज पर्यंत ९५० लोकांना जवळपास रु. ९५ कोटीची कर्ज आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेमार्फत बिनव्याजी आदा केलेले आहेत. त्याचा सर्व मराठा समाजातील तरुण उद्योजकांनी लाभ घ्यावा. तसेच अन्य समाजातील महामंडळाअंतर्गत तरुण उद्योजकांना व्याज परताव्याची कर्ज ही बँकेने सुरु केलेले आहे. तसेच पंतप्रधान सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाअंतर्गत रु. १० लाखाच्या सबसिडीची कर्जे आज पर्यंत ६० लोकांना रु ९ कोटी कर्ज वाटप करुन बहुजन समाजातील उद्योजकांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम बँकेने केलेले आहे. त्याचाही फायदा उद्योजकांनी घ्यावा असे आव्हान बँकेचे चेअरमन श्री मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन श्री महादेव टोपले, सी ई ओ श्री एम बी पाटील व सर्व संचालक यांनी केले.
