Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआमदारकीची एक संधी द्या,आंबेओहोळच्या पुनर्वसनचा प्रश्न पहिल्याच बैठकीत मार्गी लावतो.- समरजितसिंह घाटगे🛑आंबेडकरी...

आमदारकीची एक संधी द्या,आंबेओहोळच्या पुनर्वसनचा प्रश्न पहिल्याच बैठकीत मार्गी लावतो.- समरजितसिंह घाटगे🛑आंबेडकरी चळवळीतील आरपीआयच्या विविध पक्ष व संघटनांंचा पाठिंबा नसून माझ्यासाठी आशीर्वादच.- समरजितसिंह घाटगेशाहूंच्या ऋणातून उतराई होण्याचा दलित कार्यकर्त्यांचा निर्धार

🛑आमदारकीची एक संधी द्या,आंबेओहोळच्या पुनर्वसनचा प्रश्न पहिल्याच बैठकीत मार्गी लावतो.- समरजितसिंह घाटगे
🛑आंबेडकरी चळवळीतील आरपीआयच्या विविध पक्ष व संघटनांंचा पाठिंबा नसून माझ्यासाठी आशीर्वादच.- समरजितसिंह घाटगे
शाहूंच्या ऋणातून उतराई होण्याचा दलित कार्यकर्त्यांचा निर्धार

कागल.- प्रतिनिधी.

छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घाटगे घराण्याचे दलित समाजाशी ऋणानुबंध आहेत. दीपावलीच्या पूर्वसंध्येला याच कौटुंबिक नात्यातून कागल, गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील वैचारिक लढाईमध्ये आंबेडकरी चळवळीतील आरपीआयच्या विविध पक्ष व संघटना यांनी दिलेला पाठिंबा माझ्यासाठी फार मोठे आशीर्वादच आहेत.असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.

आरपीआयच्या विविध संघटना यांनी काल दिलेल्या पाठिंब्यानंतर कागल येथे झालेल्या गटांचे नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

समरजितसिंह घाटगे पुढे म्हणाले,कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात बहुजन समाजाचा पालकमंत्र्यांनी पंचवीस वर्षे फक्त मतापुरता वापर करून घेतला. आज तरुण मोठ्या संख्येने व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडले आहेत. पालक मंत्र्यांच्या या स्वार्थी राजकारणात एक पिढी पूर्णतःबरबाद झाली आहे.

स्वर्गीय विक्रमसिंहजी घाटगे व सदाशिवराव मंडलिक यांनी बहुजन समाजास पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. मात्र पालकमंत्री समाज व जातवाईज मेळावे घेऊन त्यांच्यामध्ये फूट पाडत आहेत.आम्ही आपल्या सर्वांच्या साथीने छत्रपती शाहू महाराजांचे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकसंघ आदर्श कागल निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहोत. परिवर्तनाच्या या लढाईत शाहू महाराजांच्या वंशजाच्या पाठीशी आंबेडकरांच्या विचारांच्या अनुयायांच्या आशीर्वादामुळे मोठे बळ मिळाले आहे.बहुजन समाजाची होणारे फसवणूक मला थांबवायची आहे. त्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात आहे. मताच्या राजकारणासाठी सिद्धनेर्लीतील दलित समाजातील जमिनीच्या प्रकरणाचे ते चुकीच्या पद्धतीने भांडवल करीत आहेत.यामध्ये जर चुकीचे असेल तर तुम्ही पालकमंत्री आहात चौकशी करून कारवाई करा.मात्र माझा तुम्हाला सवाल आहे? तुम्ही समाजासाठी एक गुंठा जमीन दिल्याचे दाखवा. मी राजकारण सोडतो.

राष्ट्रीय नेते बाबासाहेब वडगावकर म्हणाले, दलितांनी नेतृत्वासाठी पुढे येण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने प्रोत्साहन दिले. दलित समाज व छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचे पिढ्यांपिढ्याचे ऋणानुबंध आहेत. या ऋणानुबंधातून उतराई होण्याची संधी समरजितसिंह घाटगे यांना आमदार करून दलित समाजाला मिळाली आहे. चांगला महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांचा वंशज असलेल्या समरजितराजे यांच्यासारख्या उच्चशिक्षित व विकासाचे विजन असलेल्या नेतृत्वाला आमदार म्हणून निवडून देण्यात दलित समाज आघाडीवर असेल. मुश्रीफ साहेब हे विसरू नका मागल्या वेळी आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला म्हणूनच तुम्ही निवडून आलात यावेळी आमची पूर्ण ताकद राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी लावू
मुश्रीफ साहेब आज तुम्ही जातीवादी पक्षाच्या वळचणी जाणे दलित बांधव हे कधीही सहन करणार नाहीत. त्यामुळे मुश्रीफ साहेब याना त्यांची जागा दाखवण्यासाठीआज आंबेडकरी जनता पुढे सरसावली आहे.

यावेळी दयानंद व्हनाळीकर जयसिंग जाधव,पांडुरंग कांबळे, बाळासाहेब बेलेकर, हर्षद कांबळे, दयानंद कांबळे, भीमराव कांबळे, नामदेव कांबळे, अक्षय कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
राज कांबळे यांनी स्वागत केले.अभिजीत कांबळे यांनी आभार मानले.

चौकट

महापुरुषांच्या पुतळ्यासमोर अपशब्द वापरणाऱ्यांचा निषेध.

कागलमध्ये पैशाचे मोठ्या प्रमाणात आमिष दाखवले जात आहे. नागरिकांवर दबाव आणला जात आहे. यावर कहर म्हणजे गैबी चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाच्या मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांवर शिवीगाळ करून दादागिरीची भाषा वापरून संविधानाचा अवमान केला जात आहे.

त्यासाठीची स्क्रिप्ट पालकमंत्र्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना पुरवण्यात येते. मुश्रीफसाहेब मुद्द्याचं बोला, विकासावर बोला. तुम्हाला खालच्या दर्जाचे शब्द का वापरावी लागतात? स्वतःला पुरोगामी समजता परंतु भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांच्या पुतळ्यासमोर अपशब्द वापरताना तुम्हाला काहीच का वाटत नाही? छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वंशज म्हणून त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो.

🛑आमदारकीची एक संधी द्या,आंबेओहोळच्या पुनर्वसनचा प्रश्न पहिल्याच बैठकीत मार्गी लावतो.- समरजितसिंह घाटगे.- ( पालकमंत्र्यांनी सत्तावीस बैठका घेऊनही पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित का? )

उत्तूर.- प्रतिनिधी

चित्रीकार स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आंबेओहोळ प्रकल्पाकडे पाहिले जाते.त्यांच्या पश्चात निधीअभावी रखडलेल्या या प्रकल्पासाठी 227.54 कोटी रुपयांचे निधी उपलब्धतेतून या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचे भाग्य मला लाभले.गेल्या पाच वर्षापासून या धरणामध्ये पाणी साठवले जात आहे.मात्र पालकमंत्र्यांनी 27 बैठका घेऊनही या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित का आहेत? असा खडा सवाल उपस्थित करत आमदारकीची एक संधी द्या, पहिल्याच बैठकीत हा प्रश्न मार्गी लावतो. असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केले.
होन्याळी (ता. आजरा) येथे त्यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच स्मिता पाटील होत्या.

घाटगे पुढे म्हणाले, मतदार संघाच्या विभाजनानंतर उत्तूर विभागामध्ये स्वर्गीय कुपेकर यांनी पालकमंत्र्यांना पुढे केले.आंबेओहोळ प्रकल्पाच्या पूर्णत्वातून कुपेकर साहेब यांचे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांची जबाबदारी होती. मात्र पंचवीस वर्षे आमदार व मंत्री विशेषता जलसंपदा खात्याचे मंत्री असतानाही त्यांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे दुर्लक्ष केले.आम्ही निधी उपलब्ध केल्यानंतर या धरणाचे काम पूर्ण झाले. मात्र अद्यापही पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक वेळी पालकमंत्री पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध झाल्याचे पत्र वाटप करतात.आचारसंहितेमध्ये अशा पत्रांचे वाटप करून ते शेतकऱ्यांची केवळ दिशाभूलच करत नाहीत तर या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहेत. तालुक्यातील विकास कामांप्रमाणे या पुनर्वसनाच्या प्रश्नातही त्यांचे ठेकेदार या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर डोळा ठेवून त्यांची फसवणूक करत आहेत.

शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भिकाजी मोरबाळे म्हणाले,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक जिवाचे रान करतील.

चौकट

राजेंना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही-काॕ.संपत देसाई

श्रमिक मुक्ती दलाचे राज्यस्तरीय नेते कॉम्रेड संपत देसाई म्हणाले,ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यामुळे गतवेळी आम्ही पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला.मात्र त्यांनी उत्तूर विभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले. विशेषतः आंबेओहोळसारख्या प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मंत्री असूनही त्यांना सोडविता आला नाही. ही धमक छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांच्याकडे आहे. जनतेच्या सुखदुःखामध्ये समरस झालेल्या राजेंना यावेळी आम्ही पाठिंबा दिला असून त्यांना आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

यावेळी एस एस पाटील, उपसरपंच तानाजी गुरव, सचिन उंचावळे, संगीता देऊस्कर,जयश्री जाधव,शंकर कांबळे, संजय कांबळे, युवराज पाटील आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.