🛑शासकीय योजनेच्या लाभासाठी पालकमंत्र्यांच्या दरबारात रांगा लावाव्या लागतात हेच मोठे दुर्भाग्य…
🛑दबावामुळे कुणबी दाखले मिळत नसतील तर कागलमध्ये मला लक्ष घालावे लागेल
( मनोज जरांगे पाटील यांचा इशारा.)
( शाहूंच्या जनक घराण्याचे वंशज समरजितराजेंनी अंतरवाली सराटीत घेतली जरांगे पाटलांची भेट.)
कोल्हापूर.- प्रतिनिधी.

मराठा समाजातील नागरिकांनी पुराव्यांशी कुणबी दाखल्यासाठीचे प्रस्ताव सादर केले असतील तर ते प्रशासनाला द्यावेच लागतील. त्यासाठी कागलमध्ये कुणाचा दबाव येत असेल तर मला स्वतः लक्ष घालावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण, कुणबी दाखले व इतर लाभ मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.अशी ग्वाही मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी दिली. अंतरवाली सराटी जालना येथे छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी उभयंतात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.यावेळी ते बोलत होते.
यावेळी घाटगे यांनी कागल, गडहिंग्लज-उत्तूर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील मराठा समाजातील दीड लाखाहून अधिक नागरिकांनी कुणबी दाखले मिळावेत.यासाठी विहित नमुन्यात रीतसर अर्ज केले आहेत. त्यापैकी फक्त दहा हजार नागरिकांना हे दाखले मिळाले आहेत. हे प्रस्ताव दाखल करून घेताना टाळाटाळ केली जात आहे. याबाबत शासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही ते दखल घेत नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पालकमंत्री यांचे होम ग्राउंड असलेल्या कागल तहसीलदार कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक आंदोलनही करण्यात आले. त्यांनी दखल न घेतल्यास कागल मध्ये निषेध सभा घेण्याचा इशाराही सकल मराठा समाजाने दिला. मराठा समाजाच्या हिताच्या आड येणारी ही कृती कुणाच्या दबावामुळे केली जात आहे त्यामुळे यासाठी प्रतिसाद मिळत नाही. असा प्रश्न मराठा समाजाच्या वतीने उपस्थित केला जात आहे .त्यामुळे लाखो नागरिक नोकरी,शिक्षण यासह इतर शासकीय पातळीवरील लाभापासून कुणबी दाखल्याअभावी वंचित राहिले आहेत.अशी वस्तुस्थिती जरांगे पाटील यांच्यासमोर मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आम्ही वेळोवेळी मराठा आंदोलनात भाग घेतला आहे. या महत्त्वपूर्ण मागणीत सकल मराठा समाजासह आम्हीही तुमच्या बरोबर आहोत
या भेटीनंतर माध्यमाशी बोलताना श्री घाटगे म्हणाले, मी आज जरांगे साहेब याना भेटलो, विनंती केली, मला तुमचं सहकार्य हवं यावर ते म्हणाले, शाहू महाराजांचा जनक घराणे आहे. मान राखलाच पाहिजे. ही निवडणूक हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे अशी नाही .कागलची स्वाभिमानी जनता विरुद्ध हसन मुश्रीफ अशी आहे. स्वाभिमानी जनता माझ्याबरोबर आहे. माझ्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरली जात आहे. मी त्यावर काहीही बोलणार नाही. मी माझ्या संस्काराप्रमानेच जाणार!
चौकट
समरजीतसिंह घाटगे यांचे कौतुक
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने कागल, गडहिंग्लज-उत्तूर विभागातील तरुणांना राज्यातील प्रथम क्रमांकाचा कर्जपुरवठा केला आहे. दीडशे कोटीहून अधिक रक्कम पंधराशेहुन अधिक युवकांना कर्ज स्वरूपात दिली आहे.त्यापैकी बहात्तर टक्के युवकांनी नव्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.त्याचा व्याज परतावा नियमितपणे या युवकांना मिळत आहे.अशी माहिती घाटगे यांनी जरांगे पाटील यांना दिली. यावर पाटील यांनी घाटगे यांचे कौतुक केले.
🛑शासकीय योजनेच्या लाभासाठी पालकमंत्र्यांच्या दरबारात रांगा लावाव्या लागतात हेच मोठे दुर्भाग्य…
राजे समरजीतसिंह घाटगे
“समरजीतसिंह आपल्या दारी”.योजना आम्ही राबवली हाच त्यांच्या व आमच्यातील फरक….
उत्तूर प्रतिनिधी

छोट्या मोठ्या कामासाठी व शासकीय योजनेच्या लाभासाठी सकाळी सहा वाजले पासून पालक मंत्र्याच्या दरबारात रांगा लावाव्या लागतात हेच मोठे दुर्भाग्य आहे अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कागल गडहिंग्लज उत्तूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी केली.
हालेवाडी (ताआजरा) येथे झालेल्या प्रचार बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मी तर म्हणतो शासकीय योजनेचा लाभ हा लाभार्थ्याला मिळालाच पाहिजे त्यासाठी सहा वाजता लोकप्रतिनिधीच्या दारात उभा राहायची गरजच काय? त्यातील नवा प्रयोग म्हणून आम्ही समरजीत सिंह आपल्या दारी हा उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत आम्ही कोणत्याही मध्यस्थशिवाय थेट नागरिकांच्या दारात जाऊन विविध योजनांचे लाभ दिले.
या अभिनव उपक्रमाची चर्चा राज्यभर झाली. येत्या काळात आम्हाला असेच काम करायचे आहे. जनतेला आणि लाभार्थ्याला वेटीला धरणे हे आमच्या संस्कारात नाही.
कागल विधानसभा मतदारसंघात उत्तूर विभागात समावेश झाल्यानंतर हा विभाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत या विभागासाठी जास्तीत जास्त वेळ दिला. शासन आपल्या दारी तसेच विविध उपक्रम व विकास कामासाठीच्या निधीचा पहिला मान उत्तूर विभागालाच दिला. छ शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानमधील संपूर्ण रयत कुटुंब मानून काम केले. त्यांचाच वारसा चालविताना कागल गडहिंग्लज उत्तूर विभाग कुटुंब मानून या विभागातील जनतेच्या सुखदुःखाशी समरस झालो. आपल्या कुटुंबातील सदस्याला यावेळी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी द्या. या विभागाचे नंदनवन केल्याशिवाय मी थांबणार नाही.

यावेळी प्रकाश कृष्णा येजरे, मधुकर पाटील, धनाजी खवरे, सुरेश पाटील, तुकाराम येजरे, प्रकाश पाटील, मधुकर पाटील, वसंत येजरे वैशाली येजरे, मयुरी येसादे,संदीप पन्हाळकर, दशरथ कांबळे,रणजीत कांबळे आदी उपस्थित होते.
सुनील सुतार यांनी स्वागत केले.दीपक येसादे यांनी आभार मानले.
चौकट
पालकमंत्र्यांनी तरुणांची एक पिढी बरबाद केली.
निवडणुका आल्या की तरुणांना अमिष दाखवायचे?
तूटपुंज्या पगारावर रोजंदारी वर कामावर घ्यायचे? या तरुणांच्या भविष्याचा विचार पालकमंत्र्यांनी कधी केला काय?मर्जीतील चार ठेकेदारांना सांभाळण्यासाठी रस्ते व गटर्स याव्यतिरिक्त काही केले का? तरुणांच्या हाताला काम मिळावे? बेरोजगारी दूर व्हावी? यासाठी काय केले? रस्ते आणि गटारी याही पेक्षा अनेक कामे आहेत.आज
मोठ्या संख्येने सुशिक्षित तरुण आहेत जे बेरोजगार आहेत या तरुणांच्या भवितव्याच्या दृष्टीने कागल गडहिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघात विभागवाईज अभ्यासिका, वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र अशा तरुणाईच्या हिताच्या गोष्टी का केल्या नाहीत?
युवा पिढीचा राजकारणासाठी वापर करून निवडणूक काळात अमिष दाखवून ,पैसे देऊन आपल्या पाठीमागून फिरविले. त्यामुळे तरुणांची एक पिढी बरबाद झाली ही सामाजिक हानी कशी भरून निघणार?
चौकट
आबेओहोळ प्रकल्प का
रखडला
रखडलेला आंबेओहोळ धरण प्रकल्पासाठी आम्ही 227 कोटीचा निधी मंजूर करून आणला त्यामुळेच या धरण प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. हे सर्व या विभागातील जनता जाणते. पालकमंत्री त्यांच्या सवयीप्रमाणे गाजावाजा करतात हा प्रकल्प आम्ही पूर्ण केला मग पंधरा वर्षे हा का रखडला होता?
.
