रोखठोक –
महायुती /महाविकास आघाडी उमेदवार..- हवेत.- गुलाल आमचाच. ( पण हवा कोणाची
आहे. )
संपादकीय. वार्तापत्र.
आजरा तालुक्याला जोडलेल्या कागल, राधानगरी, चंदगड या तिनही विधानसभा मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार सद्या हवेत असलेली गणित घालून बसली आहेत. पण प्रत्यक्षात मतदारांच्या मनात कोणकोणत्या कारणासाठी कोणकोणत्या उमेदवाराबाबत नाराजी आहे. याचाही विचार व्हायला पाहिजे. तसं खरंतर उमेदवारांनी जमिनीवर राहून प्रचार यंत्रणा राबवली पाहिजे. मीच निवडून येणार असं म्हणण्यात काही सद्या तरी अर्थ नाही.. असा विचार करण्यापूर्वी मागील काळ काही विचारात घ्यावा. गटातटाचे राजकीय कार्यकर्ते जे प्रत्येक नेत्यांवरती अवलंबून आहेत. त्यांना तर पर्याय नाही. आपल्या नेत्यासाठी म्हणावेच लागेल. परंतु मतदारांच्या मनातील भावना या वेगवेगळ्या आहेत निवडणुकीच्या अगोदर एक / दोन महिना लाडकी बहीण योजना अमलात आली व बहिणीच्या खात्यावर पैसे पोहोचले. लागलीच दुसऱ्या दिवशी तेलाच्या डब्याचे भाव वाढले. अन्य जीवनावश्यक वस्तूंची महागाई तर आहेच. यामुळे योजनेचा लाभ लाभार्थी महिलांना भगिनींना मिळाला म्हणून भावाने जास्त खुश होण्याची गरज नाही. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला पोहोचविले यामुळे शंभर टक्के बहिणी आपल्यावर खुश असतीलच अशी खात्री बाळगणे गैरसमज होईल. हा झाला महाराष्ट्रातील नेत्यांबद्दल व मतदारांच्या मनातील मूळ विषय. तसा महाराष्ट्रात कागल विधानसभा मतदारसंघ हाय व्होल्टेज लढत आहे. राजे समरजीतसिंह घाटगे व नामदार हसन मुश्रीफ यांच्यातील लढत ही काटेकी टक्कर आहे. नाम. श्री. मुश्रीफ यांचा विकास कामाचा धडाका तर आहेच. पण काही प्रमाणात कोणत्याही संविधानिक पदावर नसताना समरजीत घाटगे यांनी केलेला विकास. सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा लावून केलेले काम. परंतु आठवणीचा उजाळा म्हणून आचारसंहितापूर्वी दोन दिवस उत्तुर येथे बांधकाम कामगार यांची थम कॅम्प आयोजित केली होती. ही कॅम्प उत्तुर जिल्हा परिषद मधील बांधकाम कामगार यांच्यासाठी होती. तसं पाहायला गेलं तर ही कॅम्प गावागावात किंवा चार गाव एकत्र करून कॅम्प घेतली पाहिजे होती. पण उत्तुर मध्ये शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून ही कॅम्प शक्यतो यापूर्वीही नेहमीच उत्तुर या ठिकाणी घेतली गेली सदर कॅम्प वेळी पहाटे सहा वाजल्यापासून महिला रांगेत उभे राहून माझा नंबर कधी येईल याची प्रतीक्षा पणाला लावून वेळेवर अन्न पाणी नाही. अल्पोपहार नाही चहा नाही थम केव्हा लावतोय आणि घरी कधी जातोय अशी परिस्थिती होती. यामध्ये काही सूत्राकडून माहिती समजते उत्तुर जिल्हा परिषद मधील काही मोठे पदाधिकारी यांनी आपल्या गावात बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बाराशे रुपये घेऊन नोंदणी करून घेतली. पण सदर रक्कम ही कागल विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगार यांच्याकडून घेतली गेली नाही. सदर रक्कम चंदगड विधानसभा, व राधानगरी विधानसभा मतदार संघातील अंदाजे प्रति बांधकाम कामगार एक हजार बांधकाम रुपये घेऊन नोंदणी घालून. थम कॅम्प साठी या ठिकाणी सदर लाभार्थी येऊन अक्षरशः कॅम्प मध्ये महिलांनी धुमाकूळ घातला. प्रत्यक्षात ज्या लाभार्थ्यांसाठी ही कॅम्प होती ज्या नेत्यांनी आयोजित केली होती. त्या लाभार्थ्यांना मात्र सायंकाळी पर्यंत थांबून थम न लावता परत घरी यावं लागेल. यामधील नाराज लाभार्थी महिला या अधिकऊन उत्तुर जिल्हा परिषद मतदार संघातील आहेत. या कॅमसाठी बाहेरील लाभार्थ्यांनी पैसे दिले आहेत. आमचा अगोदर थम लावून घ्या अशी चर्चा घटनास्थळी होती.
परंतु अशा गोष्टी वरिष्ठ नेत्यांना यातील काही कल्पना नसते. मग निवडणुकीच्या वेळी असे प्रश्न उपस्थित होतात. आता हा या विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांसाठी कॅम्प असताना. बाहेरील मतदारसंघातील लाभार्थ्यांच्या नोंदण्या करून कॅम्पमध्ये थांबवण्यासाठी त्या लाभार्थ्यांना आणण्यात आले. हे पदाधिकारी कार्यकर्ते कोण आहेत लाभार्थ्यांना कोणी आणले पैसे कोणी घेतले याचा शोध घेण्याची जबाबदारी ज्याची त्याची असेल.
दुसरीकडे विकासकामाचे आरोप प्रत्यारोप. केलेली काम निकृष्ट दर्जाची. व अर्धवट कामे आहेत. यामुळे काही मतदार नाराज आहेत. असे वेगवेगळे प्रश्न कागल विधानसभा मतदारसंघात आहेत. फक्त मतदारसंघाचा विकास केला म्हणजे मतदारांनी मतदान करावे असे काही नाही. विकास काम करणे हे निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचे कामच असते. त्यामुळे विकासाचा डोंगर या मुद्द्यावर ही निवडणूक व प्रचाराचा मुद्दा होऊन बसली आहे. महाराष्ट्रात सर्वात अधिक योजना व त्या योजनेचा लाभ देण्यासाठी कागल विधानसभा मतदारसंघात अधिक प्रयत्न झाले. हे नाकारता येत नाही. अनेक योजना अमलात आल्या त्या राबवल्या गेल्या.. परंतु ज्या त्या गावात आपल्या गटाच्या लोकांना त्याचा लाभ मिळवून दिला. आपल्या गटाचे असतील तेच लाभार्थी मग अन्य लाभार्थ्यांचे काय तर यासाठी काही प्रमाणात समरजीत घाटगे यांनी पुढे येत अल्प प्रमाणात असेना का पण त्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घरकुले मिळवून देण्याचे काम केले आहे. हे देखील तितकच सत्य आहे….. पण कोणी कोणाला कमी लेखून हलक्यात घेऊ नये..
तूर्तास कागल विधानसभा मतदारसंघ.. उद्याच्या भागात राधानगरीचा टक्केवारीचा विकासाचा आरोप होत असला तरी किंवा सत्यता असली नसली तरी ज्यांना विकास म्हणजे काय माहित नाही त्यांनी आरोप करण… म्हणजे विकासाचा अपमान..
