Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा शहरात डेंग्यू रुग्ण असल्याच्या अफवेमुळे. - आरोग्य विभागाची विनाकारण तारांबळ.【 सद्यस्थितीत...

आजरा शहरात डेंग्यू रुग्ण असल्याच्या अफवेमुळे. – आरोग्य विभागाची विनाकारण तारांबळ.【 सद्यस्थितीत एकही डेंग्यू रुग्ण नाही. 】

आजरा शहरात
डेंग्यू रुग्ण असल्याच्या अफवेमुळे. – आरोग्य विभागाची विनाकारण तारांबळ.【 सद्यस्थितीत एकही डेंग्यू रुग्ण नाही. 】

आजरा. प्रतिनिधी. २८

आजरा शहरात डेंग्यू रुग्ण असल्याच्या अफवेमुळे आरोग्य विभागाची विनाकारण तारांबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने संभाव्य धोका ओळखुन आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण सुरु आहेच. परंतु या अफवेबाबत बाबत आरोग्य अधिकारी यांना विचारले असता आरोग्य अधिकारी यशवंत सोनवणे यांनी माहिती दिली कि आजरा येथे एकूण ८ टीम द्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण ३३३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये एकूण ५४० कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये २ कंटेनर दूषित आढळले व ते रिकामे करण्यात आले.
आजरा येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाकडे आरोग्य सहाय्यक यांनी विचारणा केली असता १४ डेंगू रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले व ते बरे झाल्याचे सांगण्यात आले असून. तसेच आणखी पुढील दोन ते तीन दिवस सर्व टीम घरोघरी जाऊन ताप रुग्ण सर्वेक्षण ,कंटेनर सर्वेक्षण, आरोग्य शिक्षण या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
तसेच कोणताही किटकजन्य आजार डेंगू ,चिकनगुनिया, हिवताप इ.तसेच जलजन्य आजार,गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ इत्यादी आजाराबद्दलची माहिती संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास कळवण्यात यावे याविषयी सर्व खाजगी डॉक्टरांना लेखी कळविण्यात आले आहे. जेणेकरून आरोग्य विभागास तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येतील.
आजरा शहरात आरोग्य पथकामार्फत ताप रुग्ण सर्वेक्षण पुढील दोन ते तीन दिवस करण्यात येणार आहे. तसेच काही प्रमाणात डेंग्यूसदृश रुग्ण आजरा येथे आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य पथकामार्फत आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच आजरा येथील डेंग्यू संदर्भात ही फक्त अफवा आहे. डेंग्यू रुग्ण असल्याचे असे आपन स्वतः
किंवा आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आलेले नाही. सद्या एकही डेंग्यूचा रुग्ण नाही.
डेंग्यू संदर्भात किंवा इतर साथ रोगा संदर्भात सर्वांनी सामूहिक रित्या प्रयत्न करून व आरोग्य विषयक जनजागृती करून प्रतिबंध करु. असे शेवटी श्री. सोनवणे यांनी माहिती दिली त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये परंतु पावसाळ्यात काळजी घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.