{ कोल्हापूर जिल्ह्याचे डोळस नेतृत्व म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील.- उमेदवार के. पी. पाटील }
पुरोगामी विचाराच्या आघाडी व सतेज पाटील यांच्यासोबत.- श्री .शिंपी
( आजऱ्यात जयवंतराव शिंपी गटाचा के. पी. पाटील यांना पाठिंबा. )
आजरा.- प्रतिनिधी.
महाविकास आघाडीचे देशातील व राज्यातील नेत्यांच्या बळावर जी आघाडी तयार झाली आहे. व जातीवादी पक्षासोबत न जाता पुरोगामी विचारांच्या आघाडी सोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे. आजरा येथील जयवंतराव शिंपी गट या गटाच्या बैठकीत माजी आमदार. व महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार के. पी. पाटील बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक जयवंतराव शिंपी यांनी केले. पुढे बोलताना के पी पाटील म्हणाले मी आता शिवसैनिक म्हणून महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. माझे चिन्ह मशाल असून ही मशाल आजरा जिल्हा परिषद मतदार संघात घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी आता आपली आहे.
मागील काही महिन्यापूर्वी स्थानिक राजकारणामुळे माझ्याकडून चुकीचे वक्तव्य झाले याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण जयवंतराव शिंपी हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांचं काम अमृतराव देसाईपासून सामाजिक बांधिलकी त्यांनी जपत आयुष्यभर भ्रष्टाचारापासून दूर राहून शिंपी यांनी समाजाची सेवा केली आहे. आधार कारखाना बंद पडू नये म्हणून देखील त्यांचे फार मोठे योगदान होतं मागील काही गोष्टी मोठ्या मनाने आपण सर्वांनी विसरावे व एक दिलाने एक मनाने शिंपी गटाने कामाला लागावे. यापुढे अभिषेक शिंपी यांच्या माध्यमातून आजरा जिल्हा परिषद मध्ये जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आपल्या गटाचा मानसन्मान योग्य असा दिला जाईल. सर्वसाधारण सोबत घेऊन शिंपी साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करू प्रचाराला लागू प्रतिस्पर्धी उमेदवार या उमेदवाराला मागील पहिल्या निवडणुकीत “एक वोट एक नोट” असे मतदारांनी आमदार केले. पण आज या मतदारसंघात टक्केवारीचा विकास चालला आहे. हजारो एकर जमिनी घेऊन मुख्यमंत्र्याचा जवळचा आमदार म्हणून हवा इतका निधी उपलब्ध झाल्याने टक्केवारी घेऊन आपलीच ठेकेदार आपलेच कॉन्ट्रॅक्टर स्वतःच्या क्रशर वरील खडी असा आपण निवडून दिलेला आमदार आहे. हरिभाऊ कडवा यांच्या माध्यमातून पांटगाव धरण झाले व सर्व भाग समृद्ध झाला पण आदाणीला सोबत कॉन्टॅक्ट करून वीज तयार करण्यासाठी ठेका दिला. असा हा कमिशन घेऊन स्लीपिंग कॉन्ट्रॅक्टर आमदार आहे. यांना योग्य जागा दाखवली पाहिजे. असे बोलताना के पी पाटील म्हणाले.
अभिषेक शिंपी म्हणाले. जिल्ह्याचे नेते सतेज पाटील यांचा नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. त्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन व महाविकास आघाडीचा घटक म्हणून आम्ही पाटील साहेबांना पाठिंबा देत आहोत. त्यांचा मशाल चिन्ह असून आजपासून प्रचाराला सुरुवात करायची आहे. मागील हेवेदावे विसरून एक दिलाने एक मनाने काम करायचं असल्याचे स्पष्ट केले.
या जाहीर पाठिंबाच्या बैठकीला अशोक पोवार, किरण कांबळे, सचिन शिंपी, मुकुंद तानवडे, विष्णू पाटील, शिवाजी डोंगरे, विक्रम पट्टेकर, सुधीर जाधव, सुनील पाटील, के.जी. पट्टेकर, आसिफ सोनेखान, हुसेन दरवाजकर, वसंत मस्कर, शामराव कांबळे, प्रकाश सरदेसाई, अनिल नार्वेकर, रमेश निकम, सदाशिव डेळेकर, पांडुरंग जाधव सह जयवंतराव शिंपी गटाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास पाटील यांनी आभार मानले.
