रेशनकार्ड E-KYC करण्यासाठी घेत असलेल्या रकमेबाबत – मडिलगे ग्रामस्थ दक्षता कमिटी यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.
मडिलगे ता. आजरा येथील भावेश्वरी स्वस्त धान्य दुकानदार रेशनकार्ड E-KYC करण्यासाठी रेशन कार्ड वरील प्रत्येक नावापोटी २० रुपये दर आकारून E-KYC करत असलेबाबत आजरा तहसीलदार यांना मडिलगे ग्रामस्थ व दक्षता कमिटी सदस्य यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
मौजे मडिलगे येथे शासनाकडून मिळणाऱ्या रेशनकार्ड धारकांची E-KYC करणे हे काम चालू आहे. पण सदर कामासाठी मानसी २०/- रुपये या प्रमाणे आकारणी संबधित दुकानदार ग्राहकाकडून घेतले जात आहे. असा कोणताही पैसे घेण्याबाबतचा शासन निर्णय नसतानाही गोरगरीब जनतेकडून लुट होत आहे. वारंवार दक्षता कमिटीने मासिक मिटिंग लावण्याची सूचना देवून सुद्धा दक्षता कमिटीची मिटिंग घेतली जात नाही व रेशन वाटप करण्याचा वेळ स्वतः च्या मनमानीने चालू आहे. ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये त्या दुकानदाराला E-KYC च्या पैशाच्या विषयी विचारले असता उद्घट उत्तरे देण्यात आली तरी सदर कामाची E-KYC मोफत करून मिळावी व ज्या रेशन धारकांकडून पैसे घेतले आहेत त्यांना पैसे परत मिळावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सचिन कातकर, विश्वजीत मुंज, बबन कातकर, आनंदा घंट्टे, नितीन कातकर सह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
