Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रमहायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाने मानसिंग खोराटे यांना दिली उमेदवारी.- नारळाची...

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाने मानसिंग खोराटे यांना दिली उमेदवारी.- नारळाची बाग या चिन्हावर निवडणूक लढवणार. – मानसिंग खोराटे( जनसुराज्यच्या उमेदवारीने दहा हत्तींचं बळ मिळाल्यासारखे”…)

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाने मानसिंग खोराटे यांना दिली उमेदवारी.- नारळाची बाग या चिन्हावर निवडणूक लढवणार. – मानसिंग खोराटे
( जनसुराज्यच्या उमेदवारीने दहा हत्तींचं बळ मिळाल्यासारखे”…)

चंदगड .- प्रतिनिधी.

चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य पक्षाने मानसिंग खोराटे यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी मोठ्या शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल केलेल्या खोराटे यांनी मंगळवारी अधिकृतपणे जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर अर्ज दाखल केला. यावेळी श्री. खोराटे यांनी जनसुराज्य पक्ष आणि पक्षाध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल कौतुक व्यक्त केले.

श्री. खोराटे म्हणाले, “पक्षाची ताकद वेगळी आहे. आम्ही पक्षाध्यक्ष विनयजी कोरे यांच्या कायम संपर्कात असतो. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाच्या ताकदीच्या मदतीने मी चंदगडमध्ये प्रगतीचे काम करू शकेन. या उमेदवारीसाठी अनेक इच्छुक होते, परंतु कोरे साहेबांनी माझ्या प्रामाणिकपणावर आणि कामाच्या निष्ठेवर विश्वास ठेवून मला संधी दिली आहे. त्यामुळे मला दहा हत्तींनच बळ मिळाल्यासारखे वाटत आहे.”

महायुती आणि जनसुराज्य पक्ष स्वतंत्र, परंतु विकासासाठी एकत्र
महायुतीतील अन्य घटक पक्षांसोबत जनसुराज्य पक्ष स्वतंत्र आहे, परंतु मतदारसंघाच्या विकासासाठी महायुती आणि जनसुराज्य पक्ष एका व्यासपीठावर येऊन कार्यरत राहतील. कोरे साहेब याबाबत सविस्तर मार्गदर्शन करतील, असे खोराटे यांनी स्पष्ट केले. चंदगडच्या विकासासाठी जनसुराज्य पक्षाचा संपूर्ण पाठिंबा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Oplus_131072

चंदगड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्हाला जनसुराज्य पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात सहकार्य करणार आहे. मतदारसंघातील अनेक प्रलंबित विकास प्रकल्प आणि कामांना जनसुराज्य पक्षाच्या सहकार्याने गती मिळणार आहे. या ताकदीच्या बळावर माझा विजय निश्चित असल्याचा मला विश्वास आहे,” असे खोराटे यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

नारळ चिन्हावर प्रचाराला सुरुवात; घरोघरी पोहोचणार जनसुराज्य पक्ष
उद्या, नारळाची बाग चिन्हावर प्रचाराचा शुभारंभ करत खोराटे यांनी जनसुराज्य पक्षाच्या विचारांची घरोघरी जाणीव करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. “मी आता जनसुराज्य पक्षाचे प्रतिनिधित्व करणार असून, पक्षाचे विचार आणि ध्येय मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहे. पक्षाच्या बळावर मतदारसंघात आमची ताकद वाढवणार,” असे ते म्हणाले.

चंदगड मतदारसंघातील जनता, विकासकामे, आणि त्यासंबंधीच्या योजनांना पक्षाचे बळ मिळणार असून, जनसुराज्य पक्षाचे ध्येय जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी घराघरात पोहोचणार असल्याचे खोराटे यांनी यावेळी सांगितले. या जनस्वुराज्य पक्षाच्या उमेदवारीने उमेदवार श्री. खोराटे यांची ताकद वाढण्याची चर्चा चंदगड विधानसभा मतदारसंघात होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.