Homeकोंकण - ठाणेअर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस. महायुती-महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम🛑राज्यातील हवामानात...

अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस. महायुती-महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम🛑राज्यातील हवामानात सुखद बदल.- गुलाबी थंडीची चाहूल🛑गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी विद्यमान आमदारांना पराभूत करून पुन्हा स्वाभिमानाचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी साथ द्या.- माजी आम. उमेदवार के. पी. पाटील.

🛑गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी विद्यमान आमदारांना पराभूत करून पुन्हा स्वाभिमानाचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी साथ द्या.- माजी आम. उमेदवार के. पी. पाटील.

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131074

आजरा – भुदरगड – राधानगरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उभाठा गटाचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील यांचा शिवसेना आजरा तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आजरा येथे दि. २७ रोजी संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविक उप. ता. प्रमुख संजय येसादे यांनी केले शिवसेना मेळाव्याला संबोधित करताना उमेदवार के. पी पाटील म्हणाले राधानगरी – भुदरगड-आजरा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. या गद्दारीचा शिक्का केवळ आबिटकरांना लागला नाही तर विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेला लागला आहे. हा गद्दारीचा शिक्का पुसण्यासाठी विद्यमान आमदारांना पराभूत करून पुन्हा स्वाभिमानाचे स्वराज्य स्थापन करण्यासाठी साथ द्या. या मतदार संघाचा निष्ठावंत आमदार शिवसैनिकच ठरवणार आहेत. लोकसभेला एक सरला, विधानसभेला एक उरलाय, त्याला घरी बसवण्यासाठी साऱ्यांनी सज्ज व्हायचे आहे. विद्यमान आमदार फक्त फलक लावून नारळ वाढवण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्रात गद्दारीचा पायंडा पडला आहे. यामुळे पुरोगामी विचाराला अडथळे होत आहेत. त्यासाठी गद्दारांना गाडण्याची ही लढाई आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार दृढ करण्याची ही लढाई आहे. पुर्वी २०१४ साली २० गुंठे जमीन असणाऱ्यांच्या कडे शेकडो एकर जमीन कुठून आली, असा सवाल करत ते म्हणाले, विद्यमान आमदारांनी केवळ संपत्ती मिळवण्याचे काम केले आहे. पाटगाव धरण आदानीला विकण्याचे षडयंत्र काही मंडळींनी रचले होते, मात्र तो डाव मतदार संघातील सुज्ञ जनतेने हाणून पाडला. चांगला चालविलेल्या बिद्री साखर कारखान्यात राजकीय आकसापोटी विरोध करून सभासदांचे नुकसान केले आहे. शिवसेना ठाकरे गटाची पेटती मशाल हा धगधगता अंगार आहे. लाडकी बहीण ही सरकारी योजना आहे, ती कुणाची मेहेरबानी नाही. ठाकरे यांचा शिवसैनिक खूपच चिकाटीचा आहे, त्यामुळे स्वाभिमानी शिवसैनिक लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. आगामी काळात प्रत्येक कार्यकर्त्याची जपणूक करून सन्मान केला जाईल. शिवसैनिकाला ताकद देण्याचे काम केले जाईल. असे उमेदवार श्री पाटील म्हणाले यावेळी
शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे म्हणाले, सहकारातील आदर्शवत बिद्री कारखानाच्या इथेनॉल प्रकल्पाला विरोध करून विद्यमान आमदारांनी चांगल्या चाललेल्या संस्था बंद पाडण्याचे काम सुरू केले आहे. यातून सामान्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. गद्दारांच्या विरोधातील लढाईत माजी आमदार के. पी. पाटील यांना मोठ्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेचे माजी उप. जिल्हाप्रमुख विश्वनाथ कुंभार म्हणाले, विद्यमान आमदारांनी नेमका काय विकास केला हेच कळत नाही. शक्तिपीठ महामार्ग नेमका कुणाला हवा होता, मतदार संघातील एमआयडीसीचे गेल्या दहा वर्षात नेमकं काय झालं? असे सवाल करीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नुसत्या घोषणांचा पाऊस सुरू असल्याची त्यांनी सांगितले. तालुकाप्रमुख युवराज पोवार म्हणाले, मशाल चिन्ह के. पी. पाटील यांनी घेतल्यामुळे शिवसैनिकांना हत्तीचे बळ मिळाले आहे. गद्दार आमदारांना धडा शिकवल्याशिवाय निष्ठावंत शिवसैनिक शांत बसणार नाहीत. गेल्या दहा वर्षात विरोधकांना त्रास देण्याचे काम आबिटकर बंधूंनी केल्यामुळे त्यांचा पराभव यावेळी निश्चित आहे. महामार्गाचा आजरा शहरानजी होणारा टोल नेमका कुणाला पाहिजे, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला. यावेळी माजी सभापती उदयराज पवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले, दयानंद भोपळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा बँक संचालक रणजीत पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, आजरा शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, आजरा तालुका संघ संचालक महेश पाटील, जनता बँक संचालक विक्रम देसाई, शिवाजी आढाव, प्रसाद पिलारे, गीता देसाई, राजकुमार भोगण, संकेत सावंत, संतोष पाटील यांच्यासह आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील महाविकास आघाडीचे व शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

🟥अर्ज भरण्यासाठी उरले फक्त दोन दिवस.- महायुती-महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम

मुंबई :- प्रतिनिधी.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत, पण अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीने आपले सर्व उमेदवार घोषित केले नाहीत. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र अद्याप दोन्ही गटांनी 288 जागांसाठी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. दोन्ही म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप तिढा कायम आहे.
🅾️महाविकास आघाडीने आतापर्यंत 239 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत, तर महायुतीने 215 उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही आघाड्यांच्या जवळपास एक चतुर्थांश जागांसाठी उमेदवारांची घोषणा होणे बाकी आहे. महायुतीने अद्याप 73 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत तर महाविकास आघाडीने 49 जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत. महाविकास आघाडीने आतापर्यंत 288 पैकी 239 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसकडून 87, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून 85 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून 67 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
🟥उर्वरित जागांबाबत वाद सुरू असून, यासाठी सातत्याने मविआत चर्चांचे सत्र सुरू आहे. आज-उद्या उर्वरित उमेदवार जाहीर होऊ शकतात. त्याचबरोबर महायुतीकडून 215 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाजपने सर्वाधिक 121 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून 45 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 49 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. 73 जागांबाबत महायुतीत वाद सुरू असून, सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. आज-उद्या महायुतीचीही अंतिम यादी येऊ शकते.

🟥राज्यातील हवामानात सुखद बदल.- गुलाबी थंडीची चाहूल

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. पावसानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. बहुतांश काही भागात तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे. हळूहळू किमान तापमानात घट होऊ लागली आहे. त्यामुळे राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे.

🔴वादळी पावसाने उघडीप देताच थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने सकाळी हवेत गारवा आला असून, धुक्यासह दव पडल्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळी गारठा वाढू लागला असतानाच, दुपारच्या वेळी उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काहीशी घट होणार असून, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे. तिथं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधूनही पावसानं केव्हाचीच माघार घेतली असून, आता तापमानत घट होण्यास सुरुवात झाली आहे. हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींनी आता वेग धारण करण्यास सुरुवात केल्यामुळं हवेत गारठा जाणवू लागला आहे.
🟥वादळी पाऊस थांबताच राज्यात आकाश निरभ्र होत, स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर आल्याने उन्हाचा चटका वाढल्याचे दिसून येत आहे. यातच पहाटेच्या वेळी हवेत गारठा वाढू लागला आहे. पावसाने माघार घेतल्यानंतर राज्यात तापमानात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली होती. पण थंडीची चाहूल लागल्यानंतर किमान तापमानामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळणार आहे. दिवळीनंतर राज्यात थंडीची हुडहुडी भरेल. दिवाळीमध्ये पाऊस पूर्णपणे माघार गेलेला असेल अन् राज्यात थंडीची चादर पसरलेली दिसेल. राज्यात एक नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.