मडिलगे येथे सरस्वती वाचनालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
मडिलगे ता. आजरा येथील सरस्वती वाचनालय आयोजित महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत मराठी भाषेचा प्रचार प्रसारासाठी आणि वाचन संस्कृती वृध्दिगंत होण्यासाठी माजी राष्ट्रपती स्व डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्य वाचनालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन अध्यक्ष जनार्दन नेऊगरे, उपाध्यक्ष विजय परुळेकर कार्यवाह महादेव पाटील. संचालिका सुक्णी पवार यांचे हस्ते करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष श्री. नेऊंगरे यांनी केले त्यांनी बोलताना म्हणाले. वाचनालयाविषयी थोडक्यात माहिती सांगितली आमचे वाचनालय इतर अ वर्गामध्ये असून, आजरा तालुक्यात दोन नंबरचे वाचनालय आहे. आज वाचनालयात मुलांची स्पर्धा परिक्षा, बाल शैक्षणिक, थोरा मोठ्यांची चरित्रे नाटके, खेळ, धार्मिक, ऐतिहासिक संदर्भ, इंयजी हिंदी कादंबरी, कथा, काव्य अशी सर्व प्रकारची मिळून २५०५७ इतकी ग्रंथ संपदा असून विध्याध्यांनी व ग्रामस्थांनी याचा लाभ घेऊन आपल्या जीवनात आनंद घ्यावा. जास्तीत जास्त जो पुस्तके वाचेल तोच या जगात टिकणार आहे. १९००० इतके ग्रंथ वाचनालयाच्या सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ठ केलेले आहेत उर्वरित ग्रंथ लवकरच समाविष्ठ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शासनाकडून सॉफ्टवेअर मिळताच पुस्तक देवघेव ऑनलाईनने करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. तसेच वाचनालयात दैनिके १६ साप्ताहिके १५. पाक्षिके ०४. मासिके ६५ असे विविध प्रकारचे वाचनीय साहित्य असल्याचे बोलताना श्री. निऊगरे म्हणाले
यावेळी वाचनालयामध्ये वाचन संस्कृती वाढावी यासाठी वकृत्व व निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १ ली ते ४ थी गट वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक यशश्री तेजदीप कदम, द्वितीय क्रमांक आराध्या दयानंद गुरव तृतीय क्रमांक श्रावणी विनोद उगाडे उतेजनार्थ हर्ष प्रमोद मुंज ५ वी ते ७ वी गट वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक संस्कृती रवींद्र गुरव, द्वितीय क्रमांक वैष्णवी शिवाजी ग्रेसणे, तृतीय क्रमांक रविराज मास्ती वेसणे, उत्तेजनार्थ पांजल युवराज पाटील ८ वी ते १० वी गट वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सजोल अरुण येसणे द्वितीय क्रमांक श्रवणी सागर कदम, तृतीय क्रमांकसान्वी अशोक लकमले उत्तेजनार्थ अंजली जयसिंग नेऊगरे १ ली ते ४ थी गट निबंधलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पार्थ प्रविण पाटील. द्वितीय क्रमांक अवंती विवेकानंद साबळे तृतीय क्रमांक स्वानंद आनंदा येसणे, उत्तेजनार्थ यशश्री तेजदीप कदम ५ वी ते ७ वी गट निबंधलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक अक्षरा सचिन सुतार, द्वितीय क्रमांक सान्वी विलास कांबळे, तृतीय क्रमांक श्रेया दत्तात्रय कांबळे, उत्तेजनार्थ आर्यन अनिल कातकर ८ वी ते १० वी गट निबंधलेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक भार्गवी भूषण कातकर, द्वितीय क्रमांक सिद्धौ युवराज सुतार तृतीय क्रमांक भूमिका संभाजी आरळगुंडकर, उत्तेजनार्थ सिद्धेश संजय भाईगंडे सदर विध्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते वही पेन, देऊन करण्यात आला वक्तृत्व स्पर्धेत आठ विध्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतल्यामुळे मुलांना एक वेगळीच प्रेरणा मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले सदर विध्यार्थ्यानांही पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर वाचनालयाचे उपाध्यक्ष विजय परुळेकर, संचालिका सुवर्णा पोवार, मुल्ला सर यांनी आपल्या शैलीत मुलाना व वाचकांना पुस्तक वाचनाने आपल्या जीवनात, कितीही मोठी संकटे आली तरी आपणास त्यावर यश मिळवता येते हे त्यांनी विविध उदारणे देऊन पटवून दिले पुस्तके जो वाचेल तोच जीवनात यशस्वी होईल ज्यांनी ज्यांनी पुस्तके वाचली तीच माणसे आज मोठी झालीत ऐ.पी.जे अब्दुल कलाम यांनी अनेक पुस्तके वाचल्यामुळेच ते आज अजरामर आहेत. सदर कार्यक्रमास मडिलगे हायस्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ, श्री शंकरलिंग विध्यामंदीरचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ, हायस्कूलचे व मराठी शाळेचे सर्व विध्यार्थी वाचनालयाचे खजिनदार राजेंद्र कुंभार, सदस्य रघुनाथ येसणे, आनंदा कडगावकर, दत्तात्रय देसाई, जनार्दन पाटील, गणपती आयवाळे, सुमित्रा येसणे, वाचकवर्ग, ग्रंथपाल सुर्यकांत चोडणकर, मारुती मोहिते, सुदर्शन घोडणकर जोतिबा निऊंगरे उपस्थित होते. सूत्रसंचाल संचालक श्री . परुळेकर यांनी केले. कार्यवाह महादेव पाटील यांनी आभार मानले.