Homeकोंकण - ठाणेविधानसभा रणधुमाळी. अपडेट.- आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे.-...

विधानसभा रणधुमाळी. अपडेट.- आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे.- मविआच्या जागा वाटपावरुन संजय राऊत संतप्त🛑ज्या नारायण राणेंना सर्वस्व मानलं त्यांच्यावरच खच्चीकरणाचा आरोप.- राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार./महायुती सरकारला निवडणूक आयोगाची चपराक.-

🛑आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे.- मविआच्या जागा वाटपावरुन संजय राऊत संतप्त
🛑ज्या नारायण राणेंना सर्वस्व मानलं त्यांच्यावरच खच्चीकरणाचा आरोप.- राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार.


मुंबई :- प्रतिनिधी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी नियमित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. मविआच जागा वाटप कुठे रखडतय ते सांगितलं. आता सकाळी माझी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकूल वासनिक यांच्याशी बोलणं झालं. आज राहुल गांधींशी बोलणार आहे. सीट शेयरिंग बद्दल थांबलेल्या गोष्टींना गती मिळावी यासाठी चर्चा करणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. बऱ्याच जागांवर निर्णय झालाय. काही जागांवर निर्णय होत नाहीय. आता वेळ कमी आहे. महाराष्ट्राचे नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत असं मला वाटतं. ते वारंवार दिल्लीत यादी पाठवतात. मग, चर्चा होते. आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत मतभेद नाहीयत. काँग्रेस बरोबर सुद्धा तसे मतभेद नाहीयत. पण काही जागांवर तिन्ही पक्ष दावा करत आहेत. काँग्रेस हायकमांडसोबत आम्ही चर्चा केली. बैठकीत जी चर्चा झाली, त्या बद्दल उद्धव ठाकरेंना सांगितलं. 200 पेक्षा जास्त जागांवर सहमती झालीय. पण काही जागांवर तिढा, पेच आहे. उद्धव ठाकरेंनी काही सूचना केल्यात, त्याचं पालन करीन” असं संजय राऊत म्हणाले. मी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सुद्धा काही सूचना मला केल्या आहेत. त्यानुसार आम्ही जागा वाटप पूर्ण करू. कोणाची काय बैठकीत भूमिका आहे हे मी उद्धव ठाकरेना सांगितलं आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव आम्हाला करायचा आहे. भारतीय जनता पक्षाशी कसा लढायचं हे आम्हाला माहिती आहे. भाजपने सर्वात जास्त शिवसेनेला त्रास दिला आहे. भाजपची बिष्णोई गँग आम्हाला त्रास देत आहे. हा त्रास सहन करून आम्ही उभे आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
काँग्रेसचे काही नेते विदर्भातील काही जागांवर अडून आहेत. त्यामुळे जागा वाटपाला उशीर होत आहे का? असे विचारले असता संजय राऊत म्हणाले की, विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग आहे ते काय स्वतंत्र नाही. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदारही जिंकले आहेत. शिवसेनेचे खासदार जिंकले आहेत. रामटेकसारखी सहा वेळेला निवडून आलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली आहे. अमरावतीची आमची हक्काची जागा आम्ही काँग्रेसला दिली. त्या बदल्यात आम्ही विधानसभेला काही अपेक्षा ठेवल्या तर त्यात चुकीचे असे काही मला वाटत नसल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचे नेते निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाने काही जाचक आणि विरोधी पक्षांना अडचणीत आणणारे निर्णय जाहीर केले आहे. ते फक्त भाजप आणि शिंदे गटाला मदत होईल अशा पद्धतीचे निर्णय आहेत.असेही संजय राऊत म्हणाले.

🛑महायुती सरकारला निवडणूक आयोगाची चपराक.- आचारसंहितेत घेतलेले सर्व निर्णय प्रलंबित ठेवण्याचे दिले आदेश!

मुंबई :- प्रतिनिधी

महायुती सरकारने निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळांवर केलेल्या नियुक्त्या आणि घाईगडबडीत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीस निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. आचारसंहिता लागू असेपर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश देतानाच शासन निर्णय निघाले असले पण त्याची अंमलबजावणी झाली नसल्यास ते निर्णय प्रलंबित ठेवावेत, अशी सूचना मुख्य सचिवांना करण्यात आली आहे.

निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सरकारने मंत्रिमंडळ बैठकांचा सपाटा लावत समाजातील विविध घटकांसाठी अनेक लोेकप्रिय निर्णय घेतले. हे निर्णय घेताना अनेक वेळा विहित प्रक्रिया पूर्ण न होताच निर्णय घेण्यात आले. त्यानंतर विभागांनी प्रस्ताव आणि शासन निर्णयांची प्रक्रिया सुरू केली. त्याचप्रमाणे सरकारने विविध महामंडळांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. काही महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे शासन निर्णय १४ तारखेला काढण्यात आले. अनेक महामंडळांवरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे शासन आदेश निघालेले नाहीत. त्याचप्रमाणे अनेक पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. सरकारने बुधवारी २७ महामंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. मात्र आचारसंहिता लागू होईपर्यंत ज्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यास किंवा पदभार स्वीकारण्यास आयोगाने मज्जाव केला आहे.

🛑सरकारला खडसावले

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आज याबाबत राज्य सरकारला पत्र पाठवून आचारसंहिता जाहीर झाली त्यावेळची परिस्थिती कायम राहील. शासन निर्णय निघाला असला आणि त्यांची अंमलबजावणी सुरू झाली नसेल तर अशा निर्णयांची अंमलबजावणी करता येणार नाही. तसेच मंत्रिमंळात निर्णय झाला असे सांगून आता शासन निर्णय काढणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे हा आचारसंहिता भंग असून त्यास सबंधित विभागाचे सचिव जबाबदार असतील, असा इशारा दिला आहे. तसेच काही निर्णय किंवा वित्तीय बाबी सबंधित योजनांच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी लागले असेही या पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती आयोगातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यात निवडणुकीची घोषणा केली. याबाबतची आयोगाकडून सूचना आल्यानंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून सरकारला पत्र पाठवून दुपारी साडेतीननंतर आचारसंहिता लागणार असल्याने या काळात कोणतेही शासन निर्णय, नियुत्या, निविदा प्रसिद्ध करू नका, असे आदेश दिले होते. राज्य सरकारने मात्र आयोगाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करीत मंगळवारी आणि बुधवारी तब्बल १०३ शासन निर्णय निर्गमित केले होते. बुधवारी ही गंभीर बाब आयोगाच्या निदर्शनास आल्यानंतर या संदर्भात चौकशी करून आचारसंहितेचा भंग झाला असल्यास संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारच्या कारभाराची गंभीर दखल घेत राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविल्याचे सांगण्यात आले.

🟥आयोगाकडून गंभीर दखल

राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतरही राज्य सरकारने अनेक निर्णय निर्गमित करून तसेच निविदा प्रसिद्ध करून केलेल्या आचारसंहिता भंगाची केंद्रीय निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून राज्य सरकारला वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने आचारसंहिता काळात शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले १०३ शासन निर्णय मागे घेतले असून आठ निविदाही रद्द केल्या आहेत.

🛑ज्या नारायण राणेंना सर्वस्व मानलं त्यांच्यावरच खच्चीकरणाचा आरोप.- राजन तेली ठाकरे गटाकडून सावंतवाडीत शड्डू ठोकणार

एकाच कुटुंबातील घराणेशाही मान्य नसल्याचे सांगत,राणे कुटुंबीयांवर खच्चीकरणाचे आरोप करीत. – राजन तेलींनी भाजप सदस्य पदाचा तसेच विधानसभा प्रमुख पदाचा भाजप वरिष्ठांकडे दिला राजीनामा

सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकणात फारसे यश मिळवता आले नव्हते.या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने आता कोकणातील भाजपच्या नेत्याला गळाला लावून अनपेक्षित डाव टाकला आहे. माजी आमदार राजन तेली हे आज शुक्रवारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. हा भाजप आणि राणेंसाठी किमान लहानसा धक्का म्हणावा लागेल.

राजन तेली यांनी गुरुवारी भाजप सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली होती. नारायण राणे यांच्याकडून भाजपमध्ये आपले खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप यावेळी तेली यांनी केला. राजन तेली यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यात लढत होईल, असे दिसत आहे.

🟥राजन तेली यांची गणना एकेकाळी नारायण राणे यांचे कट्टर समर्थकांमध्ये व्हायची. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान राणे कुटुंबीय आणि राजन तेली यांच्यातील संघर्ष उफाळून आला होता. याठिकाणी राजन तेली यांनी आपले स्वतंत्र पॅनल उभे केले होते नितेश राणे यांच्यापासून माझ्या जिवाला धोका आहे, असे राजन तेली यांनी म्हटले होते. यानंतर राजन तेली यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी वातावरण प्रचंड तापले होते. या निवडणुकीच्या निकालानंतर राजन तेली यांच्या घरावर दगडफेक झाली होती.

दीपक केसरकरांसमोर आव्हान?

राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दीपक केसरकर आणि राजन तेली हे कट्टर वैरी मानले जातात. हा मतदारसंघ भाजपने आपल्याकडे घ्यावा, यासाठी राजन तेली आग्रही होते. मात्र, भाजप नेतृत्त्वाने त्यांची मागणी गांभीर्याने न घेतल्याने राजन तेली आता ठाकरे गटात जाणार आहेत. दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाने मोट बांधली आहे. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनीही दीपक केसरकरांना लक्ष केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत केसरकर यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे सेनेचे कार्यकर्ते तयार आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

एकाच कुटुंबातील घराणेशाही मान्य नसल्याचे सांगत,राणे कुटुंबीयांवर खच्चीकरणाचे आरोप करीत राजन तेलींनी भाजप सदस्य पदाचा तसेच विधानसभा प्रमुख पदाचा भाजप वरिष्ठांकडे दिला राजीनामा

एकाच कुटुंबाला एक लोकसभा दोन विधानसभा आणि त्यांच्याच कलेने तिसरी विधानसभा उमेदवारी देणे मला योग्य वाटत नाही. घराणेशाही मला मान्य नाही. राणे कुटुंबीयांकडून होत असलेल्या खच्चीकरणामुळे आपण भाजप सोडत आहोत, असा दावा माजी आमदार राजन तेली यांनी केला. ठाकरे सेनेची मशाल हाती घेत असलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी आपल्या भाजप सदस्य पदाचा तसेच विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा भाजपच्या वरिष्ठांकडे दिला आहे.आपण पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु राणे कुटुंबियांकडून तसेच पक्षांतर विरोधकांकडून आपल्यावर वारंवार अन्याय करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आपण हा निर्णय घेत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.