Homeकोंकण - ठाणेमविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला 119-86-75 नुसार तिन्ही पक्ष मैदानात उतरणार ? -...

मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला 119-86-75 नुसार तिन्ही पक्ष मैदानात उतरणार ? – शरद पवारांची बुचकाळ्यात टाकणारी भूमिका.. पहा 👇

🟥मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला 119-86-75 नुसार तिन्ही पक्ष मैदानात उतरणार ? – शरद पवारांची बुचकाळ्यात टाकणारी भूमिका.. पहा 👇

मुंबई :- प्रतिनिधी.

राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा आता अवघ्या २ तासात होणार. या अगोदरच राज्यात महाविकास आघाडीचा जागावाटपाचा निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता कोण किती जागांवर लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या काही दिवसांपासून मविआच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही बोलणी आता शेवटच्या टप्प्यात असून मविआच्या संभाव्य जागावाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. त्यानुसार मविआने 119-86-75 अशा पद्धतीने जागावाटप करायचे ठरवल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

🟥119-86-75 नुसार तिन्ही पक्ष मैदानात उतरणार

या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीला काँग्रेस 119, शिवसेना ठाकरे गट 86 आणि शरद पवार गट 75 जागा लढवेल, असे सांगितले जात आहे. तर शेकापला 3, समाजवादी पक्ष 3 आणि कम्युनिस्ट पक्षाच्या वाट्याला 2 जागा येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष 13 जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

🔴शरद पवारांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी

अद्याप 10 ते 15 विधानसभा मतदारसंघांचा तिढा कायम असल्याचे सांगितले जाते. मात्र, शरद पवार गट 10 पैकी 8 जागा जिंकत स्ट्राईक रेटच्या गणितात सरस ठरला होता. तरीही शरद पवार गटाने विधानसभेच्या जागावाटपात सर्वात कमी म्हणजे 75 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. शरद पवार यांची ही भूमिका राजकीय वर्तुळाला बुचकाळ्यात टाकणारी आहे. यामागे शरद पवार यांची काय राजकीय समीकरणे आहेत, याविषयी आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.