आजरा – व्यंकटराव प्रशालेत वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे प्राचार्य आर जी.कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता नववी क या वर्गाकडे होते.
वर्ग शिक्षिका एन.ए.मोरे यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा संपूर्ण जीवन परिचय आणि वाचनाची आवड व त्याचे फायदे सांगून विद्यार्थ्यांनी वाचनालयातील जास्तीत जास्त पुस्तके आपल्या विद्यार्थी जीवनात वाचणे आवश्यक आहे असे सांगितले. यावेळी वर्तमानपत्र विकणारे डॉ.अब्दुल कलाम यांची वेशभूषा यश जाधव यांने केली. सूत्रसंचालन आर्या जाधव, मयुरी पाटील व विद्यार्थी भाषणमध्ये अल्का पाटील ,प्राची ठाकर व आस्था गुरव यांनी आपले विचार मांडले. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथपाल टी एम गुरव यांनी पुस्तक प्रदर्शन भरविले. त्याचे उद्घाटन प्राचार्य श्री. कुंभार व पर्यवेक्षिका सौ व्ही जे शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर जागतिक हात धुवा दिनानिमित्त माहिती सौ. ए एस गुरव यांनी दिली व प्रत्यक्ष हात कसा धुवावा हे प्रात्यक्षिक इयत्ता आठवी क व नववी ड या वर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच वर्गशिक्षिका सौ व्ही.ए. वडवळेकर, एस.टी पाटील यांनी करून दाखविले. दोन्ही कार्यक्रमाचे आभार पी.एस.गुरव यांनी मानले.
