पोळगावात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ६८ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा.
आजरा.- प्रतिनिधी.

पोळगांव. ता. आजरा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ६८ वा धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. भारतीय बोद्ध सभेचे तालुका अध्यक्ष. आयु. जीवन शेवाळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड. काशिनाथ मोरे होते. त्यानी सम्राट अशोक यांचा धम्माचा प्रचार प्रसार आणि संताचे विचार यां बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पोळगांव गावच्या सरपंच माधुरी ताई गुरव यांनी धम्म चक्र परिवर्तन च्या शुभेच्छा दिल्या. आजरा तालुका खरेदी विक्री संघांचे माजी चेअरमन राजू होलम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा आणि त्यांनी दिलेल्या घटनेबाबत मनोगत वेक्त केले. सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांनी मनोगत वेक्त केले. उपसरपंच संजय सुतार, लक्ष्मण खामकर वंचित चे आजरा तालुका युवा अध्यक्ष संतोष मासोळे. जिल्हा उपाध्यक्ष डि. के. कांबळे, संदीप कांबळे.भारतीय बौद्ध महा सभेचे चे पर्यटन प्रमुख. तर वंचित च्या ग्राम शाखेचे. हातीवडे. मलिग्रे मुरुडे. हळोली. सारंबळवाडी. कासारकांडगाव, व पोळगांव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन भिकाजी कांबळे यांनी केले.आभार भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष जीवन शेवाळे यांनी मानले.
आजरा रवळनाथ इण्डेण गॅस आयोजित मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात रवळनाथ इण्डेण गॅस आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
आजरा येथे दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी मानसिंग देसाई व सौ.धनश्री मानसिंग देसाई यांच्या रवळनाथ इण्डेण गॅस एजन्सी तर्फे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोरगरिबांना मोफत आरोग्य सेवा मिळावी व आरोग्याच्या समस्यांवर तात्काळ सेवा मिळावी हा या महाआरोग्य शिबिरा पाठीमागचा हेतू होता. या शिबिरामध्ये स्त्री रोग तपासणी, इसीजी,बीपी,शुगर तपासणी, त्वचारोग तपासणी, व इतर जनरल तपासणी यांसारख्या सर्व तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच सर्व रुग्णांना औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नाईक मॅडम यांनी केले. सौ. देसाई यांनी प्रस्तावना केली तसेच सदर शिबिराचा ७०० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी नगर शारदीय नवरात्र उत्सव कमिटी अध्यक्ष नाथ देसाई, शिवसेना वैद्यकीय कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रशांत साळुंखे, माजी नगराध्यक्ष ज्योत्सना चराटी, शिवसेना कोल्हापूर शहर प्रमुख अमर पाटील, शिवसेना मीडिया प्रमुख विनायक जरांडे, शिवसेना कागल तालुका प्रमुख मकु बाई, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चंदगड तालुकाप्रमुख संदीप देवान, आरोग्य खात्याच्या प्रमुख लगी मॅडम गुरव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष गडिंग्लज तालुका प्रमुख निलेश पाटील, सीआरपी च्या सर्व महिला, सी आरपी चे मुख्य श्री. कांबळे सह आजरा शहरातील नागरिक, रवळनाथ इण्डेण गॅस कार्यालयीन स्टाफ उपस्थित होता. श्री. देसाई यांनी आभार मानले.