🛑प्रलंबित प्रश्नांची जबाबदारी घेऊनच पाणी पूजन करत आहे. आमदार.- प्रकाश आबिटकर
( पारपोली सर्पनाला पाणी पूजन सोहळा संपन्न.)
🛑मडिलगेतील.- एकही विकासकाम शिल्लक ठेवणार नाही.- चेअरमन नावेद मुश्रीफ
विविध विकास कामे, व्यायाम शाळा इमारत उद्घाटन सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

सर्पनाला प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची जबाबदारी घेऊनच पाणी पूजन करत असल्याचे सर्पनाला पाणी पूजन सोहळा प्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी अभियंता रोहित बांदवडेकर यांनी केले. आम. श्री. आबिटकर
पुढे म्हणाले लोकप्रतिनिधी आहेत पण सार्वजनिक जीवनात जनतेसाठी जी जबाबदारी दिली आहे ती प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. सर्व गावांची हरित क्रांती होणार आहे महाराष्ट्राची चेरापुंजी बोलल्या जाणाऱ्या या परिसरात बोरवेल मारावी लागत होती यासाठी आत्ता पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार यामध्ये सर्वात मोठी जबाबदारी ही शेतामध्ये पाणी पोहोचवण्याची आहे. जरी पाणी तुम्हाला मिळत असेल तरी पुण्याई मला मिळणार आहे. असे बोलताना श्री आबिटकर म्हणाले.
यावेळी प्रकल्पग्रस्त प्रकाश शेटके, सुरेश मिटके, संतोष पाटील, अशोक मालव मनोगते व्यक्त करत प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांची जाणीव करून दिली. आजचा हा कार्यक्रम जरी आनंदाचा असला तरी आम्ही अजूनही दुखात आहोत. पण तरीही देखील या आनंदी कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो आहोत. आमचे प्रलंबित कष्ट मार्गी लावावे असे या कार्यक्रमाचे प्रकल्पग्रस्तांनी मागणी करत आमदार प्रकाश आबिटकर यांनी या सर्पनाला प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल आभार मानले.
यावेळी कॉम्रेड धरणग्रस्तांचे नेते संपत देसाई म्हणाले धडकग्रस्तांचा लढा व प्रकल्प धरणग्रस्तांचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागून पूर्णत्वास नेण्यासाठी आमचा हा लढा होता. तो खऱ्या अर्थाने पूर्ण झाला आहे. अजूनही काही प्रश्न प्रलंबित तरीही एकमेकांच्या हातात हात घालून पाणी पुजण्यासाठी आनंदाने प्रकल्पग्रस्त पाणी पूजन कार्यक्रमासाठी आले आहेत आता हे पाणी शेतापर्यंत कसं जाईल हा प्रश्न महत्त्वाचा असून लाभधारक शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ दिला पाहिजेत त्यासाठी यापुढे काम व्हावे असे कॉम्रेड श्री देसाई म्हणाले.
यावेळी पाणी परवाना वाटप कार्यक्रम करण्यात आला यामध्ये प्राथमिक स्वरूपात मारुती जाधव पारपोली, प्रकाश जाधव यांना पाणी परवाना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या पाणी सुजन कार्यक्रमासाठी विभागातील मुकुंद दादा देसाई तानाजी देसाई राजेंद्र सावंत उदयराज पवार, सरपंच प्रियांका जाधव, प्रियंका शेडगे संतोष पाटील आनंदा कुंभार जीएम पाटील. सह पारपोली सरपणाला प्रकल्प सर्व अधिकारी कर्मचारी, प्रकल्पग्रस्त कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संजय पाटील यांनी मांनले.

चौकट.
सर्फनाला मध्यम प्रकल्प..
ता. आजरा, जि. कोल्हापूर
सर्फनाला मध्यम प्रकल्प ( ता. आजरा जि. कोल्हापूर हा हिरण्यकेशी नदीखोऱ्यातील सर्फनाल्यावर पारपोली या गांवानजीक बांधण्यात येत आहे. सदर प्रकल्प कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत आहे. सदर प्रकल्पांतर्गत आजरा तालुक्यातील २० गांवातील २६४४ हे. (पीकक्षेत्र ३७८४ हे.) क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पिण्यासाठी १.८१३ द.ल.घ.मी. आणि औद्योगिक वापरासाठी ०.६०४ द.ल.घ.मी. पाणीवापर प्रस्तावित आहे. सिंचनाचे नियोजन उपसा पध्दतीने असून त्यासाठी हिरण्यकेशी नदीवर साखळी पध्दतीने एकूण ५ को.प. बंधारे बांधण्यात आले आहेत.
सदर प्रकल्पाच्या कामाची निविदा सन २००० मध्ये निश्चित करण्यात आली. तथापी, भूसंपादनाचे काम सन २००८ पर्यंत पूर्ण न झाल्याने, प्रकल्पाचे क्षेत्रीय काम सन २००८ पर्यंत सुरू करता आले नाही. सन २००८ ते २०१३ च्या दरम्यान प्रकल्पग्रस्तांशी समन्वय साधून प्रकल्पाचे काम ६५ % पूर्ण करण्यात आले. सन २०१३ ते २०२० च्या दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची कार्यवाही पूर्ण झाली नसल्याने व कोव्हीड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रकल्पाच्या प्रगतीवर परिणाम झाला. सन २०२१ पासून प्रकल्पाचे काम सातत्याने सुरु होवून जून २०२४ मध्ये पाणीसाठा करण्यात आला आहे.
प्रकल्पाच्या बुडीत व धरण पायासाठी एकूण २८९.२० हे. क्षेत्र संपादन करणेत आले आहे.
प्रकल्पामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यामधील पारपोली गावातील शिर्केवाडी व गांवठाणवाडी बाधित होत असून त्यांच्या पुनर्वसनासाठी मौ देवर्डे व शेळप येथे पुनर्वसन वसाहती विकसीत करण्यात आल्या असून त्यांना सर्व नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत.
आजरा तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन यामध्ये.
सर्पनाला प्रकल्प पाणी पूजन.
माजी सैनिक सभागृह उद्घाटन.- २० लाख.
आमराई गल्ली नदीवरील पूल ७ कोटी.
बौद्ध विहार.- २ कोटी
उपजिल्हा रुग्णालय १७ कोटी २५ लाख
क्रीडा संकुलन सुशोभीकरण ५ कोटी.
असे विविध उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
स्वर्गीय रावसाहेब शामराव देसाई गृहतारण संस्थेचे उद्घाटन सोहळा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील वेळवट्टी येथील स्वर्गीय रावसाहेब शामराव देसाई गुहतारण संस्थेचा शुभारंभ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे प्रमुख इंद्रजीत देसाई यांनी केले
यावेळी आमदार श्री. आबिटकर म्हणाले सहकारातील संस्था म्हणून आपल्याला आजऱ्याचा सेवा वाटतो. आजरा तालुक्याने सहकारात घेतलेली गती ही कौतुकास्पद आहे शिस्तबद व गतिमान कारभार यामुळे येथील संस्था उद्यास आले आहेत परंतु संस्थेमध्ये चांगल्या ठेवीदार सोबत चांगले कर्जदार देखील मिळणे गरजेचे असते. यामुळे आपली संस्था ही अधिकाधिक गतिमान होवो आपण जे वृक्ष लावला आहात त्याचे वटवृक्ष निश्चितपणे होणार आहे. असे बोलताना आबिटकर म्हणाले.
यावेळी जयवंतराव शिंपी मुकुंदादा देसाई यांनी मार्गदर्शक मनोगत व्यक्त केली.
या शुभारंभ प्रसंगी डॉ. अनिल देशपांडे, इजि. विजय पाटील माजी नगरसेवक विलास नाईक, तसेच जी. एम. पाटील, सुभाष विभुते, सुरेश गट्टी, सुधीर कुंभार जीवन पाटील, माजी नगरसेविका शुभंदा जोशी, सह संस्थेचे सर्व संचालक सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मडिलगेतील.- एकही विकासकाम शिल्लक ठेवणार नाही.- चेअरमन नावेद मुश्रीफ
विविध विकास कामे, व्यायाम शाळा इमारत उद्घाटन सोहळा संपन्न.
( चेअरमन नावेद मुश्रीफ प्रमुख उपस्थिती.)
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे गावातील अजून काही गावची विकासकामे राहिली असतील ती पुर्ण करुया उर्वरित विकास कामाचा आराखडा तयार करा मडिलगे ता. आजरा येथील
विविध विकास कामे व व्यायाम शाळा इमारत उद्घाटन सोहळा दि.१३ रोजी संपन्न झाला.
या सोहळ्या प्रसंगी घोरपडे साखरचे चेअरमन नावेद मुश्रीफ अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक के. व्ही. येसणे यांनी केले. पुढे बोलताना श्री मुश्रीफ म्हणाले. विकास कामे तर होत राहतीलच परंतु आपण आता आपली जबाबदारी म्हणजे मुश्रीफ साहेबांना येणाऱ्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी करावे.
साहेबांचा दौरा लवकरच होईल आपल्या गावाला भेट देण्यासाठी साहेब येणार आहेत. उर्वरित विकासकामे त्यांना सांगावी. व आज व आत्ता पासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावी आचारसंहिता दोन-तीन दिवसात जाहीर होईल. असे बोलताना श्री नावेद मुश्रीफ म्हणाले यावेळी प्रास्ताविक करताना के. व्हि. येसणे म्हणाले. ना. हसन मुश्रीफ यांच्या निधीतून विविध विकास कामे झाली. आपण त्याच्या विकास कामाला जागलं पाहिजे गावातील विकासकामे केली तीही न मागता केली त्यासाठी आम्ही होऊ घातलेल्या विधानसभेसाठी त्यांना आपण मदत करायला लागले आमचं कर्तव्य असल्याचे श्री. येसणे म्हणाले.
यावेळी सरपंच बापू निऊगरे म्हणाले बरेच वर्षांपूर्वी व्यायाम शाळेची मागणी मी व माझ्या ग्रुपने केली होती. ती पुर्ण झाली. सोबत अनेक कामाची मागणी केल्यानंतर तात्काळ मंजूर केली व त्या कामाचा पाठपुरावा करून घेतला. ना. मुश्रीफ पालकमंत्री झाले नंतर अनेक कामे झाली यासाठी पुढील कामे मार्गी लावण्यासाठी येणाऱ्या विधानसभेत पुन्हा पाठवायचे आहे. सर्वांना मदत करावी असे आवाहन सरपंच श्री निऊगरे यांनी केले. यावेळी आजरा साखरचे चेअरमन वसंतराव धुरे, माजी उपसभापती शिरिष देसाई, दीपक देसाई, संचालक मारुती घोरपडे, काशिनाथ तेली, उपसरपंच पांडुरंग जाधव, तसेच उत्तूर विभागातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी, अनिकेत कवळेकर, मडिलगे येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील जेष्ट नागरिक, महिला भगिनी, कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन व विविध विकास कामाचा शुभारंभ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घोरपडे कारखान्याचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. आभार उपसरपंच पांडुरंग जाधव यांनी मानले.