माझी वसुंधरा अभियानात आजरा नगरपंचायतीने मिळविले १. ५ कोटीचे बक्षिस – मुख्याधिकारी सुरज सुर्वे.
आजरा.- प्रतिनिधी.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत येणाऱ्या माझी वसुंधरा अभियानामध्ये उत्तुंग कामगिरी करत राज्यस्तरावर आजरा नगरपंचायतीने १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या असणा-या ‘क’ वर्ग नगरपरिषद गटामध्ये राज्यस्तर उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळविला आहे.
आजरा शहरातील नागरीकांच्या सहकार्यामुळे माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये आजरा नगरपंचायतीस उत्तम कामगिरी करता आली अशी माहिती मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी दिली. माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविले. या अभियानात राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थानी सहभाग घेतला होता. अभियानात चांगली कामगिरी केल्यामुळे नगरपंचायतीस 1.5 कोटीचे बक्षिस प्राप्त झाले आहे. प्राप्त बक्षिस रक्कमेतून शहरामध्ये विविध कामे राबविता येणार आहेत. हरीत अच्छादन तयार करणे, रोप वाटीकांची निर्मिती, जलसंवर्धनाचे उपक्रम, उर्जा स्त्रौतांच्या वापरास प्रोत्साहन देणे, सौर उर्जा प्रकल्प उभारणे इत्यादी कामे करता येणार असून या मुळे शहराच्या वैभवात भर पडणार आहे. अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी नगरपंचयातीचे मुख्याधिकारी सुरज सुर्वे, प्रशासकीय अधिकारी राकेश चौगले, स्वच्छता निरीक्षक अमर कांबळे, वरीष्ठ लिपीक संजय यादव, शहर समन्वयक कोमल देसाई, नेहाराणी कुंभार, कर्मचारी संतोष कांबळे यांच्यासह नगरपंचायतीचे सफाई कर्मचारी, पदाधिकारी व शहरातील सर्व नागरीकांचे सहकार्य लाभले.

शासनाने काढलेला जी आर रद्द करावा. अन्यथा मत मागायला येवू नये.- काॅ.अतुल दिघे
आजरा.- प्रतिनिधी.

गिरणीकामगारना त्याच्या हक्कचे घरे मुंबईत देण्यात यावी, यासाठी शासनाकडे सातत्याने रस्त्यावरची लढाई केली जात असताना मांडवली करणाऱ्या प्रशासनाने परिपत्रक काढून, गिरणीकामगाराना मंबई बाहेर चा रस्ता दाखवला असून, येत्या निवडणूक आचारसंहिते पूर्वी काढलेले परिपत्रक रद्द करावे. अन्यथा शिंदे सरकारने मत मागायला येवू नये असे मत किसान भवन आजरा येथील गिरणीकामगार मेळावा च्या अध्यक्षस्थावरुन काॅ. अतूल दिघे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक नारायण भंडागे यांनी केले.
गिरणीकामगारना भुलवण्या साठी काही ठोणगे तयार होत आहेत. त्यांना त्याची जागा दाखवण्याचे आव्हान काॅ शांताराम पाटील यानी केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा पेन्शन संघटना सचिव काॅ. आप्पा कुलकर्णी यांनी केंद्र शासनाने पेन्शनरांचा प्रश्न मार्गी लावण्या साठी चालू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. यावेळी काॅ. गोपाळ गावडे गिरणीकामगार चंदगड तालूका अध्यक्ष, काॅ.संजय घाटगे, महादेव होडगे यांनी मत व्यक्त केले यावेळी दौलती राणे हिंदूराव कांबळे, शांताराम हरेर, मनप्पा बोलके, जानबा धडाम, दयानंद कांबळे, विठ्ठल बामणे, राजश्री कुंभार, अनिता बागवे, प्रभावती राणे, शांता करडे, सुगंधा पन्हाळकर, नंदा वाकर याच्या सह गिरणी कामगार उपस्थित होते आभार आबा पाटील यांनी मानले. शासनाने गिरणीकामगाराना मुंबई च्या बाहेर घरे देण्याच्या परिपत्रकाची रस्त्याच्या कडे ला होळी करून निषेध व्यक्त केला. यावेळी गिरणीकामगारना मुंबई मोफत घर मिळाली पाहीजे अशा घोषणा देण्यात आल्या.