उत्तूर – जखेवाडी मार्गावर ४ किलोचा गांजा जप्त.- आजरा पोलिसांची धडक कारवाई.- चार आरोपी ताब्यात
आजरा.- प्रतिनिधी.
गडहिंग्लज येथील पाडूरंग हरी गुरव यांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गडहिंगलज तालुक्यातील चार जणांना आजरा पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकारी गडहिंग्लज यांच्या पथकाने उत्तूर – जखेवाडी ता आजरा . येथे संशयित रित्या पकडले असता गांजा विक्री करीत असल्याने चार जणांना ताब्यात घेतले .पोलिस विश्वनाथ विलास देवडकर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, गडहिंग्लज यांनी आजरा पोलिसांत वर्दी दिली.
शनिवारी दुपारच्या पोलिस गस्तीवर असताना दुचाकीवर दोन खोके पोलिसांना दिसले त्याचा उग्र वास येऊ लागल्याने अधिक तपास करता तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले . दोन खोक्या मध्ये ८० हजाराचा चार किलो गांजा पोलिसांना आढळून आला.
विश्वनाथ आनंदा रायकर वय ३४ वर्षे, रा. शिप्पूर तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज, प्रविण सुभाष भाटले वय ३२ वर्षे, रा. करंबळी, ता. गडहिंग्लज, अभिषेक गजानन जाधव वय २२ वर्षे, रा. शिप्पूर तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज, अविनाश गजानन जाधव रा. शिप्पूर तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज यांनी संगणमत करुन, पांडुरंग हरी गुरव वय 53 वर्षे, रा. चर्च रोड, गडहिंग्लज यास अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यामध्ये अडकवणेसाठी अभिषेक जाधव याने शनिवारी साडेबाराच्या सुमारास आजरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये उत्तूर ते जखेवाडी गावी उत्तूर हायस्कुलमार्गे जाणारे रोडवर अंदाजे उत्तूर हायस्कुलपासून थोड्या अंतरावर रस्त्याचे कडेला निळ्या रंगाची सॅकमध्ये अभिषेक जाधव याने गांजा हा पांडुरंग हरी गुरव याचे जवळ ठेवला तर प्रविण भाटले यास घेऊन येतो येथेच थांब असे सांगून अभिषेक पळून गेला तर विश्वनाथ रायकर यांने पांडुरंग गुरव अमंली पदार्थ विकतो असा खोटा बहाणा करून यास अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे . अधिक तपास पोलिस निरीक्षक नागेश यमगर , एस जे भदरगे करीत आहेत .