आजरा तालुक्यात “चकाहो” नावाच्या काळ्या भाताची लागवड.- आजरा शेतकरी विकास मंडळ व शेतकऱ्यांचा नवा प्रयोग.
संपादक.- सभाजी जाधव.२४
आजरा तालुक्यात काळ्या भाताची लागवड होत आहे यासाठी शेतकरी विकास मंडळाचे मार्गदर्शन मिळत आहे. २० एकरामध्ये हा प्रयोग केला जात असून. कोकणा नंतर हा आजरा तालुक्यात प्रथमच काळा तांदुळ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचा फायदा होणार असून आजरा घनसाळ, काळा जिरगा, चंपाकळी, कोतमीरसाळ, आधी जातीच्या भातासोबत आत्ता काळ्या जातीच्या भातामध्ये भर पडली आहे. आयुर्वेदिक औषधांनी उपयुक्त असलेला काळा तांदूळ पंजाब, मणीपूर या भागातील शेतकरी भाताची जास्त प्रमाणात उत्पन्न घेतात. राज्यात नागपूर विभागातील कृषी विभागाने या तांदळाच्या लागवड करण्यसाठी येथील शेतकऱ्यांना प्रेरित केले आहे याच धर्तीवर आजरा तालुक्यातील शेतकरी विकास मंडळ व कृषी विभागाच्या माध्यमातून काळ्या भाताची लागवड यापुढेही मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी विकास मंडळाने तालुक्यातील ३० शेतकऱ्यांना या भाताची लागवड करण्यासाठी बियाणे पुरवले आहे. आजरा तालुक्यातील हालेवाडी, ऊत्तूर, वझरे, या गावांमध्ये काळ्या भाताची लागवड होत आहे. “चकाहो” नावाचा हा काळा भात असून या भाताचे उगम स्थान चीन, म्यानमार कोकणातील करंजाळी ( दापोली ) येथील अभिषेक सुर्वे यांनी मागील वर्षी या भाताची लागवड करून प्रयोग यशस्वी केला होता. श्री सुर्वे यांचा यशस्वी प्रयोग झाल्यानंतर छत्तीसगड व आजरा तालुक्यात या भाताची बियानासाठी मागणी वाढत गेली आहे. जुलै महिन्यात या भाताची लागवड होत असते.
【 काळ्या भातामध्ये औषधी गुणधर्म असून काळा तादुळ कार्डियोवेस्कुलर, कर्करोगावर उपाय करत असून मधुमेही रुग्णांसाठी लाभदायी आहे. कोलेस्टेरॉल वर, बध्दकोष्ठता, पचनासंबंधित तक्रारी दूर होणे मदुमेह व डोळ्यांसाठी उत्तम व लठ्ठपणावर उपाय कारक असा हा तांदूळ आहे यातील अँटी इन्फ्लमेंटरी गुणधर्मामुळे एलर्जी, सांधेदुखी वृद्धव दुर होण्यास मदत होते काळा गडद जांभळा असा हा तांदळाचा रंग आहे शिजवल्यानंतर तो बदलत नाही. असा या आयुर्वेदिक तांदळाची मागणी वाढत आहे वेगवेगळ्या जातीचे आजरा तालुक्यातील शेतकरी भाताचे उत्पन्न घेत असतात यामुळे कोकणा सोबत आता आजरा तालुका आहे पुढे येत आहे तर दुसरीकडे आजरा घनसाळ सारख्या भाताचा स्वाद पूर्ण भारतभर दरवळत आहे. 】
