Homeकोंकण - ठाणेपतीला दीर्घायुष्य लाभावे.- सुवासिनी महिलानी वट पौर्णिमा.- केली आनंदाने साजरी.

पतीला दीर्घायुष्य लाभावे.- सुवासिनी महिलानी वट पौर्णिमा.- केली आनंदाने साजरी.

पतीला दीर्घायुष्य लाभावे.- सुवासिनी महिलानी वट पौर्णिमा.- केली आनंदाने साजरी.

आजरा. प्रतिनिधी. २४

आजरा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील सुवासिनी महिलानी वट पोर्णिमा हा सण आनंदाने साजरा केला. पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून सुवासिनी महिलाची वट पौर्णिमा हा सण वडाचे पुजन करुन साजरा केला जातो.
वर्ष २०२१ या वर्षात २४ जून गुरूवारी म्हणजे आज वट सावित्री पूजन पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे. आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे तीन दिवसीय व्रत असते. ज्या महिलांना संपूर्ण तीन दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत आचरावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. व्रतपजून, व्रतकथा आणि पूजनासाठी शुभ मुहूर्त यांविषयी.संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे सकाळी आपल्या वेळेप्रमाणे वटसावित्री व्रताचा संकल्प करून वडपूजन करावे. करोना संकट कायम असल्याने सर्व महिलांनी शक्यतो घरीच राहून वटसावित्री व्रताचरण करून पूजन करावे. कोरोणाचे संकट असल्याने गर्दि न करता वट पोर्णिमा पुजन सण तालुक्यातील महिलांनी आनंदात साजरा केला.

【 मडिलगे ता. आजरा येथील महिलांनी वट पोर्णिमा पुजन गायन करत कोरोणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान व प्रशासनाचे नियम व स्वतःची जबाबदारी म्हणून गर्दी न करता- अंतर ठेवत पाच – सहा महिला एकत्र येऊन शांततेत वटवृक्ष पुजन केले.】

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.