Homeकोंकण - ठाणेआचारसंहिता केव्हाही लागण्याच्या शक्यतेने महायुती व महाविकास आघाडीत हालचाली वाढल्या🟥एक देश-एक निवडणूक'...

आचारसंहिता केव्हाही लागण्याच्या शक्यतेने महायुती व महाविकास आघाडीत हालचाली वाढल्या🟥एक देश-एक निवडणूक’ प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

🟥आचारसंहिता केव्हाही लागण्याच्या शक्यतेने महायुती व महाविकास आघाडीत हालचाली वाढल्या
🟥एक देश-एक निवडणूक’ प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेटनं एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत देशात एकाचवेळी निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. एक देश एक निवडणूक याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती स्थापन केली होती. या समितीनं आपला साडे अठरा हजार पानांचा अहवाल विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे काही महिन्यांपूर्वीच सुपूर्द केला होता.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात. २०२९ पासून याची सुरुवात व्हावी. लोकसभेसोबतच सर्व विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पुढच्या १०० दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी शिफारस कोविंद यांच्या समितीनं दिलेल्या अहवालात आहे. त्यामुळे एका ठराविक अवधीत सगळ्याच निवडणुका पार पडतील. सध्याच्या घडीला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या वर्षांमध्ये, वेगवेगळ्या महिन्यांमध्ये होत आहेत.

🟥नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सातत्यानं एक देश एक निवडणुकीचा मुद्दा मांडत आले आहेत. एक देश एक निवडणूक यासाठी ते खूप आग्रही आहेत. १५ ऑगस्टला त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. त्यावेळीही त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. एक देश एक निवडणूक यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन मोदींनी केलं होतं. संपूर्ण ५ वर्षे राजकारण चालत राहायला नको. निवडणुका केवळ ३ ते ४ महिन्यांत व्हाव्यात. एकाचवेळी निवडणुका होत असल्यानं विकासकामांना खीळ बसणार नाही. निवडणूक आयोजनचा खर्चही कमी होईल, असं मोदी म्हणाले आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीनं अहवाल तयार करताना देशभरातील ६२ राजकीय पक्षांशी संवाद साधला. त्यातील ३२ पक्षांनी एक देश एक निवडणुकीला समर्थन दिलं. तर १५ पक्षांनी विरोध दर्शवला. उर्वरित १५ देशांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. हे पक्ष तटस्थ राहिले.

🟥आचारसंहिता केव्हाही लागण्याच्या शक्यतेने महायुती व महाविकास आघाडीत हालचाली वाढल्या.- जागावाटपावर सलग तीन दिवस मविआची बैठक तर महायुतीच्याही बैठका होणार

मुंबई :- प्रतिनिधी.

महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचं वेध लागले आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात निवडणूक होईल असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत तर येत्या १०-१५ दिवसांत राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागेल असं भाजपा नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महायुतीअसो वा महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाबाबत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.


🟥गणेशोत्सव संपल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्यापासून सलग ३ दिवस महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपावर बैठक होणार आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या व्यस्त आहे तरीही जागावाटपाचा लवकर तोडगा काढला पाहिजे. काँग्रेस नेत्यांना आम्ही बैठकीचं आमंत्रण दिलंय. ते इतके व्यस्त आहेत त्यामुळे तारखावर तारखा देत आहेत. त्यामुळे आज आम्ही ठरवलंय, काहीही झालं आजपासून ३ दिवस आम्ही चर्चा करू असं त्यांनी म्हटलं. पुढील दोन दिवसानंतर जागावाटपावर महायुतीच्या बैठका सुरू होत आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पहिली बैठक होईल. या बैठकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी किती जागा लढवणार याचा निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर येत्या ८ दिवसांत काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बैठकांना वेग आला आहे. युतीबाबत वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि घोषणाही करतील अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
🔴विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार, नेत्यांची बैठक बोलावली आहे. देवगिरी निवासस्थानी ही बैठक होईल. महायुतीतील घटक पक्षांसोबत असलेले वादाचे मुद्दे, निवडणुकीची रणनीती यावर अजित पवार नेत्यांना सूचना देणार आहेत. तसेच महामंडळ वाटपावरही चर्चा होईल. राज्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यासोबत आता तिसऱ्या आघाडीचीही बैठक होणार आहे. आमची तिसरी आघाडी नसून महाशक्ती असेल, ही जनतेची शक्ती असेल. याबाबत उद्या आमची बैठक आहे. राजू शेट्टी, संभाजीराजे, राजरत्न आंबेडकर आणि काही मुस्लीम संघटनांशी आमची चर्चा आहे. या बैठकीत वैचारिक मुद्दे स्पष्ट होतील त्यातून आम्ही निवडणुकीला सामोरे जावू, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.