Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्ररोख.- ठोक भाग.- १ कागल विधानसभा रणधुमाळी.नव्या नेतृत्वाने होणार नाही का.? विकास.-...

रोख.- ठोक भाग.- १ कागल विधानसभा रणधुमाळी.नव्या नेतृत्वाने होणार नाही का.? विकास.- बदल हवा तर आमदार नवा. (नाम. हसन मुश्रीफ / समरजीत घाटगे.- कोण मारणार बाजी )आजरा / धामणेत २०० बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडी संचाचे वाटप.( युवा कामगार नेते अंबाजी गुरव यांचे प्रयत्नांना यश.)

रोख.- ठोक भाग.- १ कागल विधानसभा रणधुमाळी.
नव्या नेतृत्वाने होणार नाही का.? विकास.- बदल हवा तर आमदार नवा. (नाम. हसन मुश्रीफ / समरजीत घाटगे.- कोण मारणार बाजी )
आजरा / धामणेत २०० बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडी संचाचे वाटप.
( युवा कामगार नेते अंबाजी गुरव यांचे प्रयत्नांना यश.)

संपादकीय.- संभाजी जाधव.

होऊ घातलेल्या २०२४ विधानसभा निवडणुकीचे पडधम लवकरच वाजणार आहेत. ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता तर नोव्हेंबर मध्ये विधानसभा निवडणुक लागणार आहे आचारसंहिता काही दिवसातच लागले. व प्रत्यक्षात विधानसभेची रणधुमाळला सुरुवात होईल. या विधानसभा मतदारसंघात थेट लढत परस्परविरोधी उमेदवार नाम. हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजीत घाटगे यांच्यात होणार आहे. तशी ही निवडणूक कोणासाठी सोपी नाही. यामुळे कोणाला हलक्यात घेण्यात काहीच अर्थ. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये असताना उमेदवारी बाबत दखल न घेतल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले श्री. घाटगे यावेळी देखील पक्षाने संधी न दिल्याने त्यांनी शरदचंद्र पवार गटात राष्ट्रवादीची उमेदवारी घेत तुतारी या चिन्हावर लढवण्याचा अंतिम शिक्कामोर्तब झाला. यानंतर मतदार संघात चर्चेला उधाण आलं

यावेळी कागल विधानसभा मतदारसंघात देशाची नेते व पक्षप्रमुख शरदचंद्र पवार हे स्वतः दोन दिवस कोल्हापुरात ठिय्या मांडून श्री घाटगे यांचा पक्षप्रवेश घेऊन कागलच्या गैबी चौकात विजयाची तुतारी फुंकली परंतु नाम.‌ श्री. मुश्रीफ यांच्या विकासकामांच्या, वैयक्तिक व विविध योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थी व कागल विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर प्रतिस्पर्धी उमेदवार टिकणार का.? असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु कागल विधानसभा मतदारसंघातील मतांची झालेली विभागणी पाहता यामध्ये श्री. घाटगे हे जवळपास विजयापर्यंत पोहोचतील हे इतकं सोपं नसलं तरीही अशी चर्चा मतदारसंघात आहे.‌

कागल विधानसभा मतदार संघातील भाजप म्हणजे अधिक प्रमाणात हा राजे गट म्हणून काम करणारा गटच काम करत होता. परंतु मूळचे भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यरत होते त्यांचा निर्णय आता काय असेल हे सद्यस्थितीला सांगता येत नसलं तरी ते युतीधर्म पाळून श्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत राहणार का.?
परंतु श्री घाटगे यांच्यासोबत राजे गट, व महाविकास आघाडी, तर संभाव्य मुळ कागल विधानसभा मतदारसंघातील भाजप त्यांची ताकद विचारात घेतल्यास श्री घाटगे हे अधिक बळकट झाल्याचे स्पष्टच आहे. मागील पाच वर्षात पायाला भिंगरी बांधून मतदार संघात फिरत आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश केल्यानंतर आतातर रोज एका विभागात दौरा असतो. परंतु फक्त या दौऱ्याने व गाठीभेटी घेऊन मतदारांच्या मध्ये विकास कामापुढे परिवर्तन होईल काय. दुसरीकडे काही जागृत व विचारवंतांचे असे देखील मत आहे की नाम. हसन मुश्रीफ यांना घरी बसवल्यास कागल विधानसभा मतदारसंघाचा विकास घरी बसेल यामुळे विकास म्हणजे श्री. मुश्रीफ या मतदारसंघाचा आणखी जोमाने विकास व्हायचा पाहिजे असेल तर मतदारसंघाचे नेतृत्व हे नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवली पाहिजेत असे मत काही विचारवंत मतदारसंघातील जनतेचे आहे. तस पाहायला गेलं तर महाराष्ट्रात व कोल्हापूर जिल्ह्यात अन्य विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत विधानसभा मतदारसंघातील मतदारांना या दोन्हीही नेत्यांच्यामुळे.. अनेक लाभ मिळाले आहेत. शासनाचा कोणताही लाभ या मतदारसंघात मिळालेला नाही असा एकही मतदार या मतदारसंघात नाही. यामुळे दोन्हीही नेत्यांच्या गटातटाच्या राजकारणात मतदारसंघातील नागरिकांचा नक्कीच लाभदायक योजनेचा लाभ घेतला आहे.

कागल विधानसभा मतदार संघातील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील वेगवेगळ्या योजना घरापर्यंत पोहोचवून त्यांची कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना लाभ दिले आहेत. मग काही वेळा असाही प्रश्न उपस्थित होतो आजूबाजूच्या विधानसभा मतदारसंघातील नागरिक हे या मतदारसंघातील योजनेचा लाभ घेतात.. मग त्या विभागातील आमदार त्यांना का लाभ देऊ शकत नाहीत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य विधानसभा मतदारसंघात अशा अनेक योजनांचे लाभ देण्याचे काम या दोन्ही नेत्याकडून झाले आहे. राहिला फक्त नामदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विकास कामांच्या आढाव्यात श्री. घाटगे विकास कामात कमी पडतील हे निश्चितच पण लोकप्रतिनिधी म्हणून नाम. श्री. मुश्रीफ हे विकास काम करणे त्यांचे कर्तव्यच आहे.‌ यामुळे श्री घाटगे व नाम. श्री.‌ मुश्रीफ यांची लढत ही काट्याची टक्कर आहे. पण प्रत्यक्षात आचारसंहिता लागल्यानंतर खरी विधानसभेची रणधुमाळी सुरू होईल.. यामध्ये कोणाची आघाडी हे देखील पहाव लागेल.‌ क्रमशा

आजरा / धामणेत २०० बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडी संचाचे वाटप.
( युवा कामगार नेते अंबाजी गुरव यांचे प्रयत्नांना यश.)

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा तालुक्यातील धामणे येथील २०० बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडी संचाचे वाटप केल्याने युवा कामगार नेते अंबाजी गुरव यांचे प्रयत्नांना यश आले आहे. सातत्याने कामगारांच्या उन्नती साठी सतत कार्यरत असणारे युवा कामगार नेतृत्व श्री. गुरव यांनी बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात याचाच एक भाग म्हणून त्यांनी गिरणी कामगार तरुण स्वराज्य संस्था कोल्हापूर जिल्हा आणि नाम. हसन मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून कामगार आयुक्त कार्यालयात पाठपुरावा करून २०० बांधकाम कामगारांना भांडी संचाचा लाभ मिळवून दिला हे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. असे धामणे चे माजी सरपंच महादेव पाटील यांनी व्यक्त केले.

आजरा तालुक्यातील धामणे येथील विठ्ठल मंदिरात बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भांडी संचाचे वितरण करण्यात आले. यावेळी अंबाजी गुरव यांचा रमेश तेजम व शंकर गिलबिले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी सरपंच महादेव पाटील माजी उपसरपंच शिवाजी भोसले, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील सावंत, रमेश तेजम, कोतवाल महादेव भोसले, पोलिस पाटील , भूपाल पाटील, अरुण पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष शंकर गिलबिले, वसंत पोटे, धनाजी कांबळे सर, ज्ञानदेव आरेकर, सखाराम आडावकर, राजेंद्र मगदूम, अमोल कांबळे,बजरंग धामणकर, विकास पोवार, रामकृष्ण मगदूम सर, प्रकाश रावण, विलास सावंत, अमित गायकवाड, शिवाजी धामणकर आदीसह बांधकाम कामगार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी भोसले यांनी आभार मानले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.