Homeकोंकण - ठाणेमहाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम?मुंबईतील ३६ पैकी १८ जागांवर काँग्रेसचा दावा.- अनेक...

महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम?मुंबईतील ३६ पैकी १८ जागांवर काँग्रेसचा दावा.- अनेक उच्चभ्रू मतदारसंघाचा समावेश.🟥पुढच्या पाच वर्षात तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत तर शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील.- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.🟥ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी दि.१६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी..अधिसूचना निर्गमित.

🟥महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम?मुंबईतील ३६ पैकी १८ जागांवर काँग्रेसचा दावा.- अनेक उच्चभ्रू मतदारसंघाचा समावेश.
🟥पुढच्या पाच वर्षात तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत तर शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील.- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी.
🟥ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी दि.१६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी..अधिसूचना निर्गमित.

मुंबई :- प्रतिनिधी.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वत्र पक्ष अँक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सर्व पक्षांसह नेत्यांकडूनही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच जागावाटप, मतदारसंघाची चाचपणीही सुरु करण्यात आली आहे. अशातच आता महाविकासाआघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने मुंबईतील १८ जागांची मागणी केली आहे. त्यात अनेक उच्चभ्रू मतदारसंघाचा समावेश आहे.मुंबईतील ३६ मतदारसंघांपैकी १८ मतदारसंघांची आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. यात मलबार हिलसारख्या उच्चभ्रू मतदारसंघासह धारावीसारख्या आशिया खंडातील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी असलेल्या मतदारसंघाचाही समावेश आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने मुंबईतील २० जागांची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने ७ जागांवर दावा केला आहे.
🔴काँग्रेसने मुंबईतील १८ जागांची मागणी केली आहे. यानुसार काँग्रेसने धारावी, चांदिवली, मुंबादेवी, मालाड पश्चिम, सायन कोळीवाडा, कुलाबा, कांदिवली पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, भायखळा, जोगेश्वरी पूर्व, मलबार हिल, माहीम, बोरिवली आणि चारकोप या जागांवर लढण्याची तयारी केली आहे.
🔴तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने २० जागांसाठी आग्रह धरला आहे. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने ७ जागांवर दावा केल्याचे बोललं जात आहे. मुंबईत २०२९ साली ठाकरे यांच्या शिवसेनेने ३६ पैकी १९ जागा जिंकल्या होत्या. भाजपने ११ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने २८ पैकी ४ जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी १ जागा आणि समाजवादी पक्षाने १ जागा जिंकली होती. तर राज्यात २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ जागा मिळाल्या. तर शिवसेनेला ५६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ जागा आणि काँग्रेस ४४ जागा मिळाल्या होत्या.

🟥कोणाला मिळणार किती जागा?

आता विधानसभा निवडणुकीसाठी आता महायुती आणि महाविकासाआघाडी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणेशोत्सवानंतर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी मॅरेथॉन बैठक घेतली जाईल. यानुसार विधानसभेच्या २८८ जागांपैकी १०५ जागांची मागणी काँग्रेसने केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने १०० जागा मागितल्या आहेत. तर शरद पवार गटाने ९० जागांची मागणी केली आहे.
🅾️सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपाबद्दल सातत्याने चर्चा होत आहे. यानुसार काँग्रेसने १०० ते १०५ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. तर शरद पवार गटाने ८५ ते ९० लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासोबतच ठाकरे गटाने ९५ ते १०० जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानंतर महाविकासाआघाडीच्या अनेक बैठका होताना दिसणार आहे. या सर्व बैठका पितृपक्षात होतील. त्यानंतर नवरात्रीपूर्वी किंवा नवरात्रीदरम्यान जागावाटपाबद्दल अंतिम निर्णय जाहीर केला जाईल.

🟥पुढच्या पाच वर्षात तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत तर शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील.- केंद्रीय मंत्री गडकरी

पुणे :- प्रतिनिधी.

देशात पुढच्या ५ वर्षांत डिझेल गाड्या दिसणार नाहीत, शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील. मला विश्वास आहे, इंजिनियरचं संशोधन फार महत्त्वाचं आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते. विश्वेश्वरैया यांची जयंती आपण अभियंता दिवस म्हणून साजरा करतो. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. मी महाराष्ट्रात ज्यावेळी बांधकाम मंत्री होतो, त्यावेळी सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा माझ्या डिपार्टमेंटचे दोन सचिव होते, तांबे साहेब आणि देशपांडे साहेब. त्या दोघांवर मी जबाबदारी टाकली की, तुम्ही मेरिटवर वर कुणाच्याही प्रभावाखाली न येता ज्यांनी चांगलं काम केलं आहे, त्यांची निवड करा, असं नितीन गडकरी म्हणाले.
🟥ज्यावेळी त्यांनी सिलेक्शन केलं, त्यावेळचे तत्कालीन राज्यपाल डॉ. अलेक्झांडर साहेब यांना मी आमंत्रित करायला गेलो, मी त्यांना निमंत्रण दिलं तेव्हा त्यांनी विचारलं की, तुम्ही सिलेक्शन कसं केलं? मी त्यांना सांगितलं की, मला यातलं काहीच माहिती नाही. ही सर्व निवड प्रक्रिया आमच्या दोन्ही बांधकाम कामाच्या सचिवांनी केलं आहे. मी त्यांना सूचना केली होती की, कुणाचाही प्रभाव तुमच्यावर आला तरी चिंता करायची नाही. फक्त मेरीटवरच इंजिनियरची निवड करायची. मग देशपांडे आणि तांबे साहेबांनी अलेक्झांडर यांना सर्व निवड प्रक्रिया सांगितली. यानंतर अलेक्झांडर यांनी वेळ दिला आणि मोठ्या उत्साहात तो कार्यक्रम पार पडला, अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली.
🅾️विश्वेश्वरैया यांचं जीवन हे इंजिनियर्सकरता एक आदर्श आहे. कारण ते मुंबईत बांधकाम विभागात डेप्युटी इंजिनियर म्हणून रुजू झाले होते. काही दिवस धुळ्याला होते. त्यानंतर त्यांनी 1888 मध्ये छोटी सुरुवात केली. त्यांनी महाराष्ट्रात जवळपास 28 वर्षे काम केलं. त्यानंतर ते कर्नाटकात गेले. अनेक मोठमोठे ब्रिज, अनेक मोठमोठी धरणे बांधण्याची संधी त्यांना मिळाली. एक उत्तम प्रशासक, एक जिनियस इंजिनियर आणि विकासाच्या बाबतीत कमिटमेंट ठेवून काम करणारे दृष्टा ही त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण सर्वजण त्यांना अभिवादन करतो. त्यांची प्रेरणा, कर्तृत्व हे नक्कीच इंजिनियर्सला प्रेरणा देणारं ठरेल, असं नितीन गडकरी म्हणाले.

🟥ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी दि.१६ ऐवजी १८ सप्टेंबर रोजी..अधिसूचना निर्गमित

मुंबई.- प्रतिनिधी

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार दि. १७ सप्टेंबर, २०२४ रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर व इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे. सबब, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात सोमवार, दि.१६ सप्टेंबर, २०२४ करिता घोषित केलेली ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी रद्द करून ती आता बुधवार, दि. १८ सप्टेंबर, २०२४ या दिवशी जाहीर करण्यात आली असल्याची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार, दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा ती रद्द करून बुधवार, दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी या बाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.