वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., अमृतनगर गवसे
येणारा सन २०२४/२५ चा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविणार.- चेअरमन वसंतराव धुरे.
आजरा.- प्रतिनिधी.
वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., अमृतनगर-गवसे, हा कारखाना तालुक्यातील शेतक-यांच्या जीवनाशी निगडीत असणारा एकमेव औद्योगिक प्रकल्प आहे. सन १९९७/९८ साली कारखान्याच्या गाळपास प्रत्यक्ष सुरूवात झाली. गेल्या २५ वर्षात कारखान्याची मशिनरीची ब-याच अंशी झीज झाली असुन पुर्वी प्रमाणे मशिनरीवर जादा गाळपाचा लोड देतांना मर्यादा येत आहेत. याचा विचार करून कारखाना
आर्थिक अडचणीत असतांना सुध्दा पुढील हंगामामध्ये गाळपात अडचणी येवून गळीतावर परिणाम होवू नये व कारखान्याचे कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप व्हाये
यासाठी साखर धंद्यातील तज्ञ व्यक्ती, वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटचे टेक्नीकल अॅडव्हायझर यांना प्रत्यक्ष कारखान्यावर आणुन प्रत्यक्ष पहाणी करून व यापुर्वीचे गळीत
हंगामात प्रतिदिनी सरासरी कमी झालेली गाळपाची कारणे शोधुन येत्या हंगामात पुर्ण क्षमतेने प्रतिदिनी किमान ३५०० ते ३७०० सरासरी गाळप व्हावे याकरीता कारखान्याच्या
जुन्या मशिनरीला पुरक (सपोर्ट) काही मशनरी फेरबदल करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. व त्याप्रमाणे फेरबदल करण्यात आले. .या युनिटमुळे कारखान्याचे गाळात नियमितता येणार असुन प्रतिदिनी सरासरी गाळप वाढणार आहे. त्याच प्रमाणे कारखान्याकडील उत्पादित साखरेचे योग्य ग्रेडेशन व्हावे. साखरेच्या वजनात तफावत
येवून कारखान्याचे होणारे नुकसान टाळावे. तसेच शुगर हाऊस मधील हमाल व अन्य व्यक्तीकडून साखरे मध्ये अनावधानाने होणारी अस्वच्छता टाळून चांगल्या प्रतिची स्वच्छ
साखर उत्पादित व्हावी. याकरीता कारखान्याकडे शुगर हाऊमधील मशनरीत सुधारणा करण्याचा निर्णय घेवून काम सुरू केले आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे ओव्हरहोलिंगचे काम करतांना ब-याच जुन्या मशिनरीमध्ये बिघाड असल्याने फेरबदल करून दुरूस्त्या व नविन मटेरिअल बसविणेच्याचा निर्णय. गत हंगामात तोडणी वाहतुक यंत्रणेमुळे गळीतावर झालेला विपरीत परिणाम, कार्यक्षेत्रातील व कारखान्याकडे ऊस करार केलेल्या शेतक-यांना यंत्रणे अभावी झालेला त्रास लक्षात घेवून येत्या हंगामाकरीता २९७ (बिड) परजिल्हयातील टोळी यंत्रणेचे करार केले असुन कार्यक्षेत्रातील ९९ यंत्रणा बांधलेली आहे. त्यामुळे येत्या हंगामात सक्षम यंत्रणा ऊस तोडणी करीता उपलब्ध होईल यांचे संचालक मंडळाने योग्य नियोजन केले आहे.
येत्या गळीत हंगामासाठी कारखाना व्यवस्थापनाने केलेले नियोजन, संकेश्वर बांदा महामार्गाचे काम पूर्ण झालेने वाहतुकीतील अडचण दुर झालेली आहे. त्यामुळे यावर्षी आजरा कारखाना गळीताच्या उपलब्ध दिवसात पुर्ण क्षमतेने प्रतिदिनी ३५०० ते ३७०० गाळप करून कारखान्याचे ४ लाख मे.टना पेक्षा जास्त गाळप करण्याचे उदिष्ट पूर्ण करेल अशी ग्वाही चेअरमन वसंतराव धुरे यांनी दिली. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मधुकर देसाई, जिल्हा बँकेचे संचालक तथा बैंक प्रतिनिधी सुधीर देसाई, कारखान्याचे संचालक विष्णू केसरकर, उदयसिह पोवार, मुकुंदराव देसाई, मारूती घोरपडे, सुभाष देसाई, अनिल फडके, दिपक देसाई, रणजित देसाई, संभाजी रामचंद्र पाटील, शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे, राजेश जोशीलकर, गोविंद पाटील, संभाजी दत्तात्रय पाटील, अशोक तर्डेकर, काशिनाथ तेली, हरी कांबळे, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक नामदेव नार्वेकर, रशिद पठाण आणि प्र. कार्यकारी संचालक व्ही. के. ज्योती व अधिकारी आणि कामगार युनियन अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
