💥दुःखत.. वेदनादायी
🟥आईचं दहावं, त्याच दिवशी मुलाचे निधन.- मनाला चटका लावणारी घटना
🟥दहा वर्षांनी झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला आनंदात परतत असताना काळाचा घाला
बीड :- प्रतिनिधी.
आई अन् मुलांचं नातं जगावेगळं असतं. जितका जीव आई आपल्या लेकरांवर लावते, तितकचं प्रेम मुलंही आपल्या आईवर करीत असते. आई नेहमी आपल्या सोबत असावी असं अनेकांना वाटत असतं. मात्र बीड येथे आईचा दुरावा सहन न झाल्यानं तिच्या मुलाचंही निधन झालं आहे. बीडमधील परळी येथे मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. आईच्या निधनाने धक्का बसलेल्या मुलावर आईच्या दहाव्याला अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील संत सावता महाराज परिसरात राहणारे बालाजी शिंदे यांचा रिक्षा चालविण्याचा व्यवसाय होता. त्यांची आई तारामती शिंदे यांचं 4 सप्टेंबर रोजी पॅरालिसिसमुळे वयाच्या 80 वर्षी निधन झालं. बालाजी शिंदे यांना आईच्या जाण्याचा मोठा धक्का बसला होता. आईच्या गंगापुजनाचा कार्यक्रम दहा दिवसांनी 13 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. बालाजी याची तयारी करीत होते. या कार्यक्रमाचं स्थळ, वेळ सांगणाऱ्या छापिल मजकुराच्या व्हॉट्सॲप पत्रिकाही त्यांनी नातेवाईक, आप्त-स्वकीय, मित्रमंडळींना पाठवल्या होत्या. गंगापुजनाचा कार्यक्रम सुरू असताना बालाजी शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागलं. मित्र-परिवाराने त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केलं.
🟥प्राथमिक तपासात हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचं लक्षात येताच त्यांना लातूरला हलवण्यात आलं. मात्र शुक्रवारी दुसऱ्या दिवशी 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी बालाजी शिंदे (वय 53) यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. बालाजी शिंदे मुंबईतील गणेशपार येथे ऑटो चालविण्याचा व्यवसाय करीत होते. गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते याच व्यवसायात होते. पहाटे पाच वाजल्यापासून ऑटो स्टार्ट करून ते कामाला सुरुवात करायचे. अगदी ऊन, वारा, थंडीतही ते नित्यनियमाने पाच वाजता रिक्षा सुरू करायचे. मात्र आईच्या मृत्यूच्या दहा दिवसात त्यांचंही निधन झाल्याचं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
🟥दहा वर्षांनी झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला आनंदात परतत असताना काळाचा घाला.- स्कॉर्पिओ गाडीची कारला जोरदार धडक.- दिड महिन्यांच्या बाळासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर :- प्रतिनिधी.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. स्कॉर्पिओ गाडीने धडक दिल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदनगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. यामध्ये दीड महिन्यांच्या बाळासह आई, आजी आणि सात वर्षांच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. तर एकजण गंभीर असल्याची माहिती आहे. पुण्याच्या दिशेने हे कुटुंब जात असताना हा भीषण अपघात घडला असून यामुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
🟥मिळालेल्या माहितीनुसार, दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला स्कॉर्पिओने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आजी, आईसह दीड महिन्याच्या चिमुकला आणि सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. छत्रपती संभाजीनगर शहराच्या जवळच असलेल्या अहमदनगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ घडली. या अपघातात मृणाली अजय देसरकर, आशालता हरिहर पोपळघट, अमोघ देसरकर (दीड महिने) आणि दुर्गा सागर गीते (७ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर अजय देसरकर गंभीर जखमी झाले आहेत. देसरकर कुटुंबाच्या घरात दहा वर्षांनी पाळणा हलला होता. पण कदाचित नियतीला त्यांचं सुख बघवत नव्हतं. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.