ठरवले तर अशक्य असे काहीच नाही. – आम.- आबिटकर
( २५ कोटी ३९ लाखाच्या. – विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा व लोकार्पण समारंभ संपन्न. )
आजरा.- प्रतिनिधी.
ठरवले तर अशक्य असे काहीच नाही. यामुळे सर्वांच्या सहकार्यामुळे आज हा लोखंड सोहळा असल्याचे २५ कोटी ३९ लाखाच्या विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा व लोकार्पण समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून आम. प्रकाश आबिटकर बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक गट विकास अधिकारी संजय धुमाळ यांनी केले. पुढे बोलताना आम. आबिटकर म्हणाले २७ वर्षाच्या अनेकांच्या प्रयत्नाने गवसे विभागात प्रत्यक्षात आज ६ कोटी ६४ लाखाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा होत आहे. या आरोग्य केंद्रासाठी यापूर्वी अनेकांनी प्रयत्न केले होते. त्याला प्रत्यक्षात आदेश आले आहे. या आरोग्य क्षेत्रात येथील नागरिकांचे उपचार सुरू होणार आहे. त्यामुळे येथील लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. या कामाला उशीर लागला पण खूप वेळाने देखील खूप चांगलं काम होते. येणाऱ्या आठ दिवसातच आजरा येथे उपजिल्हा रुग्णालय कामाचा उद्घाटन सोहळा होईल. अंतिम मान्यता शिल्लक असून त्यामधील आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्या त्यासाठीच आमचा प्रयत्न आहे. खाजगी दवाखान्यात आर्थिक बुदंग बसतो यासाठी शास्वत आरोग्याची सेवा मिळवण्याचे ठिकाण म्हणून सरकारी दवाखान्याकडे पाहिले जाते. लवकरच सर्पनाला पाणी पूजन सोहळा होणार आहे. केलेल्या विकास कामातून लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आपण समाधानी असल्याचे बोलताना आम. श्री आबिटकर म्हणाले.

चौकट
मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा व लोकार्पण समारंभ
किटवडे धनगरवाडा रस्ता (बजेट)
शेळप आंबाडे – लिंगवाडी रस्ता (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना)
दाभिल फाटा ते गवसे रस्ता (काँक्रीटीकरण) (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना)
गवसे प्राथमिक आरोग्य केंद्र
देवर्डे ते पारेवाडी रस्ता करणे (मुख्यमंत्री ग्रामसडक योजना)
देवडें फाटा ते वेळवट्टी

अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय रणवीर, माजी. जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, गवसे सरपंच रणजित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार समीर माने, माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, कारखाना संचालक, मुकुंदराव देसाई, के. डी. सी. संचालक सुधीर देसाई, उदयराज पवार, रचना होलम,
संजय सावंत, परशुराम बामणे, दशरथ अमृते, तसेच सुधीर कुंभार अभिषेक शिंपी, संतोष भाटले, विजय थोरवत, संजय पाटील, इंद्रजीत देसाई, विभागातील सरपंच, प्रमुख पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार मारुती डोंगरे यांनी मानले.