पेरणोली प्रकरणातील – गांजा विक्री करणारे रॅकेट उघडकीस..
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा पोलीस ठाणेच्या हददीमध्ये पेरणोली ते सोहाळे जाणा-या रोडवर पेट्रीलींग करत असताना हर्षद थनाजी लोंढे प्लास्टीकच्या पिशवीमध्ये सुमारे ६१२ ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ एकुण १०,०००/-रु. किंमतीचा गांजा विक्री करण्याचे हेतुने जवळ बाळगुन तसेच गांजा हा अंमली पदार्थ चिलीम मधुन सेवन करीत असताना मिळुन आला होता.
सदर आरोपी विरुध्द दि.३१/०८/२०२४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छापा कारवाई दरम्यान आरोपीचे ताब्यातुन एकुण ७५,०००/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील यांचेकडे देण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपी हर्षवर्धन उर्फ हर्षद याचेकडे गांजा कोणाकडुन खरेदी केला याबाबत सखोल चौकशी केली असता त्यांने सदरचा गांजा रोहित उर्फ सोन्या सुरेश कदम, (व.व. ३१, रा. पिंगळे मळा, नारोडी, ता. आंबेगाव, जि.पुणे ) याचेकडुन खरेदी केला असल्याचे सांगितलेने तपास पथक सदर ठिकाणी गेले व त्यांनी त्याला ताब्यात घेवुन त्याचेकडे गांजा कोणाकडुन खरेदी केला याबाबत चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा हा संपत गणपत शिंदे, ( व.व.४०, रा.चास, ता. आंबेगाव, जि. पुणे )
याचेकडुन खरेदी केला असल्याचे सांगितले.शिंदे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे सदर गुन्हय ातील जप्त गांजा अंमली पदार्थ कोणाकडुन खरेदी केला होता याबाबत सखोली चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा हा पोपट उर्फ बबुशा जयराम सालके, (वय ५९ रा. जवळा ता. पारणेर जि. अहमदनगर) याचेकडुन खरेदी केला असल्याचे सांगित ल्याने तपास पथक तात्काळ त्याचे राहते ठिकाणी गेले व त्यांनी त् यास ताब्यात घेवुन त्यास अटक केली. सदर गुन्हयात आतापर्यंत एकुण चार आरोपी अटक करण ्यात आले आहेत. Más información टील हे करीत आहेत.
तालुक्यातील सर्व नागरीकांना गांजा अगर अन्य अ ंमली पदार्थाची विक्री अगर सेवन करताना कोणी मिळुन आल्यास त्याबाबतची माहीती आजरा पोलीस ठाणेस देण्यात यावी असे आवाहन आजरा पोलिस सपोनि यांनी केले आहे.
सदरची कारवाई मा. महेंद्र पंडीत पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर, केश खाटमोडे पाटील, अपर पोलीस अधीक्षक साो गडहिंग्लज कॅम्प इचलकरंजी, मा. रामदास इँ Más información पोलीस निरीक्षक साो आजरा पोलीस ठाणे यांचे मार् गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील. पो हे कॉ एस. एस.
मसवेकर, पो.हे.कॉ. गवळी, पो.हे.कॉ. अनंत देसाई, पो.ना. दयानंद बेनके, पो. कॉ. महेश चिटणीस, पो. कॉ. दिपक किल्लेदार, पो. कॉ. विशाल कांबळे, पो.कॉ. खवरे, पो.कॉ. संजय जाधव, पो. कॉ. विकास कांबळे, या पथकाने केली आहे.