Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रसरोळी ता‌. चंदगड व उंबरवाडी ता. गडहिंग्लज या गावातील नागरिकांनी मानसिंग खोराटे...

सरोळी ता‌. चंदगड व उंबरवाडी ता. गडहिंग्लज या गावातील नागरिकांनी मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठवण्याचा केला निर्धार.- दिला जाहिर पाठींबा

सरोळी ता‌. चंदगड व उंबरवाडी ता. गडहिंग्लज या गावातील नागरिकांनी मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठवण्याचा केला निर्धार.- दिला जाहिर पाठींबा

चंदगड.- प्रतिनिधी.

चंदगड मतदारसंघ रोजगार निर्मिती आरोग्याच्या व उद्योगधंद्याच्या बाबतीत आजही मागे असून हा मतदारसंघ राज्यात एक विकासाचे मॉडेल बनवण्यासाठी आपण सर्वांनी साथ द्यावी. चंदगड तालुका भोगोलिक दृष्ट्या फार विस्तारलेला असून या तालुक्यातील युवकांना रोजगारासाठी व शिक्षणासाठी बाहेर जावे लागते त्यासाठी या विभागातच शेती पूरक व्यवसाय सुरु करून रोजगार तयार करणे नवीन नवीन उद्योग आणणे त्यातून रोजगार देणे शेतकऱ्यांना शेतीमध्ये येणाऱ्या समस्या सुटतील. मुला मुलींच्या शिक्षणामध्ये गुणवत्तेची घट या समस्या तुमच्या साथीने सोडवू. त्यांच्या नेतृत्वाखाली, विकासाची गती सुधारली जाणार आहे. आणि आता त्याच प्रकारे चंदगड तालुक्याचा विकास होईल याची खात्री आहे. असे मा.मानसिंग खोराटे म्हणाले. भोगोलिक दृष्ट्या नैसर्गिक विविधतेने नटलेल्या चंदगड मध्ये समृद्धी आणली जाईल आणि चंदगड तालुका, आरोग्य रोजगाराच्या बाबतीत सर्वात पुढे राहील, याची मला खात्री आहे. म्हणूनच, तालुक्यातील सर्व युवा वर्ग व नागरिकांनी उद्योजक मानसिंग खोराटे साहेबांना विधानसभेत पाठवावे असे आवाहन सरोळी ता. चंदगड व उंबरवाडी ता.गडहिंग्लज मधील नागरिकांच्या मार्फत करण्यात आले. यावेळी ब्रह्मलीन मंडळाचे वैजनाथ पाटील पांडुरंग पाटील प्रवीण पाटील शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष रामलिंग पाटील संदीप नवगिरे व उंबूळवाडी मधील सिद्धप्पा बाबू पाटील नामदेव गणपती कोकितकर संजय गुरूले बाळू चव्हाण अझरुद्दीन मुल्लांनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.