श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचा आदर्श घेतला पाहिजे.- आम. प्रकाश आबिटकर
( श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ संपन्न.)
आजरा.- प्रतिनिधी.

गंगामाई वाचन मंदिराचा आदर्श घेतला पाहिजे असे हे वाचन मंदिर आहे. वाचाल तर वाचाल प्रत्येकाने वाचले पाहिजेत आजच्या युगात तरुण पिढी मोबाईलच्या माध्यमातून काही योग्य बरच काही अयोग्य असं घेत आहे. श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रो. डॉ. अशोक बाचूळकर यांनी केले. यावेळी पुढे बोलताना श्री आबिटकर म्हणाले.
तरुण पिढीने वाचन संस्कृतीकडे वळले पाहिजेत. या वाचण्याच्या नवीन वास्तू होण्याचे श्रेय हे अशोक अण्णांना जाते. जर अण्णांनी धडपड करून आजरा नगरपंचायत केली नसती तर इतका मोठा निधी ग्रामपंचायतला देणे अशक्य होते. भविष्यात या मतदारसंघातील प्राथमिक शाळा दुरुस्त व्हाव्यात यासाठी देखील प्रयत्न करणार पण विकास कामासोबत सामाजिक बांधिलकी जपली पाहिजेत वाचन संस्कृतीत वाढ व्हावी वाचायला यात सगळीच संयुक्तिक झाली पाहिजेत. असे बोलताना आमदार श्री आबिटकर म्हणाले.

यावेळी श्री बाचूळकर म्हणाले
आजरा शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीचे प्रेरणास्थान व १३१ वर्षाची परंपरा असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या या वाचन मंदिराची सुसज्ज इमारत उभी राहावी यासाठी आमदार श्री.आबिटकर यांनी चार कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर हे तालुकास्तरीय वाचनालय असून याची स्थापना १८८९ साली झाली आहे.

१३४ पुस्तके व काही नियतकालिके यामाध्यमातून सुरु झालेल्या या वाचनालयात आजघडीला तीस हजारहून जास्त ग्रंथसंपदा आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठी तसेच हिंदी व इंग्रजी भाषेतील दर्जेदार ग्रंथ उपलब्ध आहेत. ग्रंथालयाच्या संदर्भ ग्रंथ विभागात एक हजार हून अधिक संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. वीस हुन अधिक दैनिके व शंभरहून अधिक नियतकालिके ग्रंथालयात नियमित येतात. या ग्रंथालयाच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक तसेच साहित्यिक यांना सेवा दिली जाते. वाचकांना ग्रंथालय सेवा देण्याबरोबरच ग्रंथालयातर्फे वाचन संस्कृती व ग्रंथालय चळवळ वाढीसाठी नियमितपणे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये ग्रंथ प्रदर्शन, चर्चासत्र, व्याख्यानमाला, विविध शालेय स्पर्धा, साहित्य पुरस्कार, ग्रंथालय पुरस्कार असे विविध उपक्रम राबवण्यात येतात. अशा या आजरा शहरासह तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात मापदंड ठरणाऱ्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या नूतन इमारतीसाठी निधी मिळावा अशी तालुकावासियांची मागणी होती. याला अनुसरून राधानगरी भुदरगड आजाराचे कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर यांनी चार कोटी पन्नास लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी संपन्न होत आहे. वाचन मंदिरची निर्माण होणारी नवी वास्तू सर्वसोईंनीयुक्त अशी तयार होणार आहे.

वाचन मंदिराची नवी इमारत आजरा तालुक्याच्या सांस्कृतिक चळवळ व वाचन संस्कृतीला बळकटी देणारी ठरणार आहे. जे पी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाचनालय उभं आहे इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात एका वाचनालयाला इतका निधी मिळतो. याचा आनंद होत असल्याचे असे श्री बाचूळकर म्हणाले.
यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, जि. प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, जनता बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई, भाजपचे माजी उपाध्यक्ष सुधीर कुंभार यांनी भूमिपूजन सोहळा निमित्ताने श्रीमंत गंगामाई वाचन वाटचालीबाबत मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, डॉ. अनिल देशपांडे, अभियंता राजेंद्र सावंत मुख्याधिकारी सुरज सुर्वे, विजयकुमार पाटील, संजयभाऊ सावंत, विलास नाईक, दिवाकर नलवडे, जी. एम. पाटील, विजय थोरवत, संतोष भाटले, सह श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर उपाध्यक्षा सौ. गीता पोतदार, विनायक आमणगी, सदस्य रवींद्र हुक्केरी, डॉ. अंजली देशपांडे, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, विद्या हरित विजय राजोपाध्ये, विठोबा चव्हाण वामन सामंत, सुचेता गड्डी, कुंडलिक नावलकर सह वाचक, हितचिंतक शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन कार्यवाहक सदाशिव मोरे यांनी केले तर आभार सदस्य संभाजी इंजन यांनी मानले.