Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआत्ता - आर या पारची लढाई. / आजरा तालुक्यातील वाहनधारकांना टोलचा भुर्दंड...

आत्ता – आर या पारची लढाई. / आजरा तालुक्यातील वाहनधारकांना टोलचा भुर्दंड कायमचा हटविण्यासाठी २८ रोजी रस्ता रोको.( तालुक्यातील सर्व वाहनधारकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.- समितीचे आवाहन )

💥आत्ता – आर या पारची लढाई. / आजरा तालुक्यातील वाहनधारकांना टोलचा भुर्दंड कायमचा हटविण्यासाठी २८ रोजी रस्ता रोको.
( तालुक्यातील सर्व वाहनधारकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.- समितीचे आवाहन )

आजरा – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील वाहनधारकांना टोलचा भुर्दंड कायमचा हटविण्यासाठी २८ रोजी रस्ता रोको असून तालुक्यातील सर्व वाहनधारकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे समितीचे आवाहन करणे बाबत प्रसिद्ध पत्र दिले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आजरा तालुक्यातील सर्व आंबोली आजरा रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहन धारकांवर बसणारा टोलचा भुर्दंड कायमचा हटविण्यासाठी उद्याच्या २८ तारखेच्या रस्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आम्ही टोल मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने करीत आहोत. खरतरं मुळात हा राष्ट्रीय महामार्ग नाही, त्यात राष्ट्रीय महामार्गाला दिल्या जाणाऱ्या कोणत्याही सुविधा दिल्या जाणार नाहीत असे असतांना केवळ ठेकेदारांची घरे भरण्यासाठी हा टोल जनतेच्या माथ्यावर मारला जात आहे.

हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सार्वजनिक म्हणजेच जनतेच्या पैशातून बांधला आहे असे असतांना जनतेवर टोलचा भुर्दंड का असा आमचा सवाल आहे. खरतरं यापूर्वी २४ जून २०२४ रोजी ज्या ठिकाणी टोल नाका उभा केला जात आहे त्याठिकाणी आजरेकर जनतेने प्रचंड संख्येने मोर्चाने जात आपला विरोध दर्शविला आहे. त्यानंतर २२ जुलै २०२४ रोजी आजरा तहसील कार्यालयावर एकदिवसाचे धरणे आंदोलनही केले. पण अजूनही प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. म्हणून आम्ही बुधवार दि २८ ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी टोल उभा केला जात आहे त्याठिकाणी बेमुदत रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. तालुक्यतील जवळजवळ पन्नास ते साठ गावांनी या टोल नाक्याला विरोध असल्याचे ग्रामसभांचे ठराव करून टोल मुक्ती संघर्ष समितीला पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे आता संकेश्वर बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समितीने आर या पारची लढाई करण्याचा निर्धार केला असून या लढ्यात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन. संकेश्वर बांदा महामार्ग टोल मुक्ती संघर्ष समिती, आजरा यांनी केले आहे. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.