Homeकोंकण - ठाणेचोपडाई देवीकडे जाणारा नकाशात असणारा रस्ता आडवला.- शेतकऱ्यांचे आजरा तहसीलदारांना निवेदन.

चोपडाई देवीकडे जाणारा नकाशात असणारा रस्ता आडवला.- शेतकऱ्यांचे आजरा तहसीलदारांना निवेदन.

चोपडाई देवीकडे जाणारा.- नकाशात नोंद असणारा रस्ता अतिक्रमन करुन अडवला.- शेतकऱ्यांचे आजरा तहसीलदारांना निवेदन.

आजरा. प्रतिनिधी.२२.

मौजे खेडे, हाजगोळी, चांदेवाडी या गावांना जोडणारा तसेच या तीन गावा करीता असणारा चोपडाई देवी कडे जाणारा नकाशात मंजूर असलेल्या रस्ता अतिक्रमण करून लोखंडी गेट लावून
आढवल्याबाबत आजरा तहसीलदार विकास अहिर यांना येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिलेले आहेत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. खेडे, हाजगोळी, चांदेवाडी येथील नागरिकांना चोपडाई देवीकडे जाणारा रस्ता नकाशात नोंद असताना देवीकडे जाणाऱ्या रोडवर लोखंडी गेट लावून रस्ता आडवा आहे. तर दुसरीकडे सदर जागा मालकाचे क्रशर सुरू असल्याने त्यांनी स्वतः या रस्त्याचा डांबरीकरण व्हावे याकरिता सर्व शेतकरी संमती व सह्या घेतल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना रस्त्यावर गेट लावुन रस्ता अडवला आहे. हि भुमिका योग्य नाही. सदर रस्ता बंद करून केलेले अतिक्रमण ते काढून घ्यावे. व नेहमीप्रमाणे रस्ता खुला करावा यासाठी आजरा तहसीलदार यांना समीर देशपांडे यांनी निवेदन दिले आहे. या निवेदनावर चंद्रकांत देशपांडे, यशवंत कासार, मनोहर हसबे, परसू हरेर, सुशीला गिलबिले, पांडुरंग कसलकर, वसंत पालकर, पांडुरंग पाटील, औदुंबर चौगुले सह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.