Homeकोंकण - ठाणेमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कृती...

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कृती समितीचे.- तीव्र आंदोलन.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व
महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक कृती समितीचे.- तीव्र आंदोलन

पुणे. प्रतिनिधी. २१

१५ जून २०२१ पासून आशा व गटप्रवर्तक बेमुदत संपावर आहेत. त्यांची कामे संपकाळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करवून घेऊन संप मोडण्याचा शासन व प्रशासनाचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. अंगणवाडी कर्मचारी आणि आशा, गटप्रवर्तक या सरकारच्या एकाच चुकीच्या धोरणाच्या बळी आहेत. काम कर्मचाऱ्यांप्रमाणेच करवून घेणे परंतु कर्मचारी म्हणून अधिकार आणि लाभ न देणे.
आशा, गटप्रवर्तक यांना तर शासनाने आजपर्यंत वेठबिगारासारखे राबवून घेतले, पण त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार केला नाही. कोरोना काळात त्यांनी जीव धोक्यात घालून लढा दिला परंतु शासनाने १००० रुपये आणि तोंडदेखले कौतुक या पलिकडे काही दिले नाही.
शासनाने आपल्याला कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. तोपर्यंत आशांना १८००० व गटप्रवर्तकांना २१००० रु मानधन अधिक दैनंदिन प्रवास भत्ता द्यावा, कोरोनाचा दैनंदिन ५०० रु प्रोत्साहन भत्ता द्यावा, सर्व सुरक्षा साधने व ५० लाखांचा आयुर्विमा व १० लाखांचा पूर्ण कुटुंबासाठीचा आरोग्य विमा लागू करावा. या संपाच्या रास्त व न्याय मागण्या आहेत. परंतु शासन त्यांच्यावर गांभीर्याने विचार करायला तयार नाही.
संपाच्या दुसऱ्या दिवशी वाटाघाटींसाठी कृती समितीला बोलावून कोणताही ठोस तोडगा न काढता आरोग्य मंत्र्यांनी आपल्या तोंडाला पाने पुसली आणि त्यामुळे आपल्या मागण्या पदरात पडेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार कृती समितीने व्यक्त केला.
संप तर १००% यशस्वी झालाच आहे. पण आता आपली ताकद रस्त्यावर उतरवून शासनाचे डोळे उघडण्याची गरज आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आरोग्य योजनेची कामे देऊ नयेत म्हणून देखील लढणे आवश्यक आहे. म्हणूनच आपण २१ जून रोजी जिल्हा परिषदेसमोर संयुक्त रित्या तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि आशा व गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने सामील रहावे असे अवाहन शुभा शमीम, नितीन पवार,श्रीमंत घोडके, निलेश दातखिळे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.