Homeकोंकण - ठाणेआशाताईंचा सर्वे थांबला.- ग्रामपंचायत ओझं वाढलं आशासेविकेचा बेमुदतसंप. 【वेतन कमी आणं काम...

आशाताईंचा सर्वे थांबला.- ग्रामपंचायत ओझं वाढलं आशासेविकेचा बेमुदतसंप. 【वेतन कमी आणं काम जास्ती..- शासनाला कधी येणार जाग.】

आशाताईंचा सर्वे थांबला.- ग्रामपंचायत ओझं वाढलं आशासेविकेचा बेमुदतसंप. 【वेतन कमी आणं काम जास्ती..- शासनाला कधी येणार जाग.】

कोल्हापूर.प्रतिनिधी.

कोव्हिड १९ संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन अनेक उपाययोजना अनेक नियम अटी लावून कोरोणा हद्दपार करण्याच्या मार्गावर असताना. यामध्ये आशा सेविकांचा देखील मोलाचा वाटा आहे. प्रत्येक गावात घरोघरी जाऊन घरातील लोकांची संख्या, आजारी असल्याची माहिती, ऑक्सीजन, टेंपरेचर तपासणी, बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती त्यांचे अलगीकरण, कोरोणा टेस्ट कॅम्प मध्ये सर्दी, खोकला, थंडी, ताप असणाऱ्या नागरिकांच्या टेस्ट करून घेण्यासाठी मदत करणे घरोघरी जाऊन घेतलेल्या माहितीच्या आधारे नागरिकांना वेळेत उपचार व्हावे म्हणून कॅम्पमध्ये आशासेविका यांचे मोलाचे सहकार्य होत होते. सध्या अशा सेविकांचा आरोग्य विभाग शासन आरोग्य विभागा विरोधात बेमुदत संप केला आहे. यामुळे गावचा सर्वे थांबला आहे.व ग्रामपंचायत ओझ वाढल आहे. सोमवार दि. २१ रोजी आशासेविकेचा कोल्हापूर येथे मोर्चा असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिल्या जाणारे वेतनही थकित वेतन आहे. ३००० रु च्या मासिक वेतनावर आशाताई काम करत असतात “काम जास्त आणि वेतन कमी” “वेतन जास्त कामच नाही” असेच काही आरोग्य विभागाची परिस्थिती असल्याचेही बोलले जाते. परंतु कोल्हापूर येथील मोर्च्यामध्ये आशाताईंच्या मागण्या व संप मिटणार की नाही परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना वेतनामध्ये वाढ करून त्यांना वेळेस वेतन देणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. या सेविकांच्या शासनाने मागण्या मान्य कराव्या अस नागरिकातून बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.