शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भगवा सप्ताह साजरा.( आजरा चंदगड विधानसभा मतदारसंघ.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष्याचा भगवा सप्ताह दि ७ ऑगस्ट रोजी चंदगड विधानसभा मतदार संघातील आजरा तालुक्यातील वाटगी जिल्हापरिषद मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष्याचा भगवा सप्ताह साजरा करण्यात आला. या मध्ये डॉ शंकरराव उत्तुरे हायस्कुल सरबळ वाडी या शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांची बैठक शिवसंग्राम अकॅडमी च्या हॉल मध्ये झाली या सभेत विश्वास किल्लेदार यांनी स्वागत केले तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट मध्ये हा भगवा सप्ताह साजरा करायचा आहे यामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम राबवायचे त्याच बरोबर गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक ही संकल्पना राबवायची आहे. गावागावात मशाल हे चिन्ह पोचवायच आहे शिवसेना सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करायची आहे नवीन मतदार नोंदणी करावी याबाबत माहिती दिली जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे सर यांनी आपल्या भाषणात येणाऱ्या विधानसभेत उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी सर्व शिवसैनिकांनी कामाला लागवून चंदगड विधानसभेला शिवसेनेचाच आमदार निवडून अनुया असा संकल्प या भगव्या सप्ताह च्या निमित्ताने करूया असे आवाहन केले या वेळी सह संपर्क प्रमुख रियाज समनजी विधानसभा संपर्क प्रमुख अशोक निकम यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, संजय येसादे, दयानंद भोपळे, भाऊ किल्लेदार, युवासेना महेश पाटील, राजकुमार भोगण, शिवसेना विभाग प्रमुख महादेव सुतार, सुयश पाटील, रमेश भोगण , विष्णू रेडेकर संजय दळवी, संजय सावंत, प्रकाश पाटील, अरुण कांबळे, यासह विभागातील सर्व शाखा प्रमुख, गटप्रमुख, व शिवसैनिक मोठ्या उपस्थित हजर होते.