Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रउद्योजक मानसिंग खोराटे यांना विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा.- युवा अध्यक्ष जगन्नाथ...

उद्योजक मानसिंग खोराटे यांना विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा.- युवा अध्यक्ष जगन्नाथ हुलजी माजी सभापती.

उद्योजक मानसिंग खोराटे यांना विधानसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा.- युवा अध्यक्ष जगन्नाथ हुलजी माजी सभापती.

चंदगड.- प्रतिनिधी.

Oplus_131074

शेतकरी संघटना ऊस उत्पादक, सह कामगार यांच्यावरील अन्याय सहन करणार नाही. कारखान्यामध्ये काही चुकीचं घडत असेल तर आमचा विरोध असेल पण चांगल्या व्यक्तीला चांगले काम करत असताना साथ देणं देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम आहे. अशा चांगल्या नेतृत्वाला राजकारणात प्रवेश व विधानसभा लढवणार असल्याने आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना चंदगड तालुका पाठिंबा देत असल्याचे. युवा अध्यक्ष अध्यक्ष व माजी सभापती जगन्नाथ हुलजी बोलताना म्हणाले ते उद्योजक मानसिंग खोराटे यांच्या पाठिंबा मेळावा प्रसंगी बोलत होते. स्वागत व प्रास्ताविक संतोष मळवीकर यांनी केले. श्री.‌हुलजी बोलताना म्हणाले श्री खराटे यांनी कारखाना चांगल्या पद्धतीने चालला आहे. यापूर्वी कारखाना हा राजकीय अड्डा झाला होता.
कारखाना बंद असताना ऊस शेती करावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित होत होता. चंदगड तालुक्यात आजी-माजी आमदार हा कारखाना का चालू करू शकले नाहीत. असाही प्रश्न उपस्थित होतो. चंदगड तालुका तितका मोठा असताना विकासाच्या दृष्टीने कोणतेही काम केले नाही तरुण वर्ग नोकरी व उद्योग व्यवसायापासून दूर राहिला आहे म्हणून आज तरुण पिढीची नव्या चेहऱ्याच्या शोधात होती. तो आज मानसिंग खोराटे यांच्या रूपाने समोर येत आहे. अशा व्यक्तीला शेतकरी संघटनेचा विधानसभेसाठी शुभेच्छा व पाठिंबा राहील. शेतकरी संघटना ही चळवळ करणारी संघटना आहे. यामुळे यानंतरही काही चुकीच्या कारखान्यात घडल्यास आमचा आंदोलक म्हणून पवित्रा असेलच पण सद्यस्थितीला बंद पडलेल्या कारखाना मानसिंग खोराटे यांनी चालू करून चांगल्या पद्धतीने चालवा म्हणून चांगल्या व्यक्तीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्यास श्री हुलजी यांनी बोलताना सांगितले.
यावेळी सतीश सबनीस म्हणाले शेतकरी संघटना जर त्या तालुक्याचा सभापती करू शकते तर शेतकरी संघटनेच्या पाठिंबावर चंदगड तालुक्याचा आमदार का होऊ शकत नाही.‌ ज्याच्या बाजूने शेतकरी संघटना त्यांचा विजय एक निश्चित झालेला आहे हा इतिहास आहे. कोणी असं समजू नये शेतकरी संघटनेची ताकद काय आहे. मानसिंग खोराटे यांनी हा बंद पडलेल्या कारखाना चालू करण्याचे धाडस केले हीच आमच्या चंदगड वासियांसाठी मोठी गोष्ट आहे.‌ कारण आज पर्यंत येथील यापूर्वी झालेल्या आमदाराने चंदगड तालुक्याच्या विकासासाठी काय काम केलं. हा प्रश्न मला तरुण असणारा देखील पडला होता आज मला ७० वर्षे पूर्ण झाली तरी देखील जैसे थे परिस्थिती आहे. यामुळे या निवडणुकीत शेतकरी संघटना ही मानसिंग खोराटे यांच्या पाठीशी राहील व त्यांचा विजय निश्चित असल्याचे श्री बोलताना सांगितले.

चौकट.

मला अर्थकारण करायचे नाही.- समाजकारण करायचे आहे.-
उद्योजक मानसिंग खोराटे.

Oplus_131074

यावेळी उद्योजक मानसिंग खोराटे म्हणाले आपण मला होऊ घातलेल्या २०२४ या विधानसभेसाठी मी उमेदवारी घोषित केल्यानंतर आपण मला पाठिंबा जाहीर केला याबद्दल शेतकरी संघटनेचे धन्यवाद मानतो. कारण मी एक उद्योजक आहे. पण उद्योजक असताना व कारखाना चालू करत असताना आज पर्यंत ज्या वेतना सहन केले आहेत. व जितका मला त्रास दिला आहे. मी जर राजकारणात असतो तर हा त्रास मला झाला नसता. म्हणूनच मला राजकारणात यावं लागलं. यासाठी राजकारणात मला आणण्यासाठी ज्यांनी त्रास दिला तेच जबाबदार आहेत. मला फक्त रस्ते आणि गटारी न करता या तालुक्याचा विकास करायचा आहे. येथील तरुण पिढीला रोजगार नोकऱ्या द्यायचे आहेत. अनेक गोष्टी आहेत या चंदगड तालुक्यात या मतदारसंघात करण्यासारखे आहेत. मला अर्थकारण करायचं नाही तर समाजकारण करायचं आहे. सद्यस्थितीत गडहिंग्लज गोड साखर कारखाना चालवण्याबाबत माझा विचार होता व आहे. पण आता उशीर झाला आहे त्यामुळे पुढील वर्षात या कारखान्याबाबत विचार होईल पण १५ वर्ष कारखाना चालवायला घेऊन न परवडणारी बाब आहे. तरीही मी नक्कीच पुढील वर्षात विचार करेल. पण मला चंदगड विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे पर्यटनाचा विकास करायचा आहे. यामुळे मी या निवडणुकीत उतरून विकास काय असतो तो मला दाखवून द्यायचा आहे. असे श्री खोराटे बोलताना म्हणाले.
यावेळी शेतकरी संघटनेचे राजेंद्र पाटील, सुरेश खुंटरे, सह प्रमुख पदाधिकारी यांनी पाठिंबा बाबत मनोगत व्यक्त केले. या मेळाव्याला मधुकर पाटील कृष्णा पाटील हनुमंत सावंत राजू देवळी धोंडीबा चौगुले चावा पेडणेकर बाळू चव्हाण, बाळाराम फडके, प्रकाश कांबळे, चांदोबा सुतार, पिंटू गुरव, सह चंदगड तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.‌

चौकट.

अॅ. संतोष मळवीकर.

उद्योजक मानसिंग खोराटे यांना शेतकरी संघटनेचा आशीर्वाद मिळतो हे मोठे समाधान आहे.
चंदगड तालुक्यातील जनतेचे हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालावा असे मत असणे साहजिकच आहे. पण कारखाना चालू करत असताना विरोध होतो तेव्हा काय करायचं. यासाठी खोराटे यांच्यावर राजकारणात एन्ट्री करण्याची वेळ आली आहे.‌ सत्यवादी व्यक्तीच्या मागे शेतकरी संघटना पाठिंबा देते याचा अभिमान असल्याचे श्री मळवीकर यांनी बोलताना म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.