Homeकोंकण - ठाणेनवनीत राणांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड. - सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली.

नवनीत राणांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड. – सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली.

नवनीत राणांची खासदारकी वाचवण्यासाठी धडपड. – सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केली

मुंबई. प्रतिनिधी. १८

अमरावतीच्या भाजप समर्थक खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने २ लाखांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. खासदार नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती मिळतेय.

अमरावतीचे माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना उच्च न्यायालयानं 2 लाखांचा दंडदेखील सुनावला आहे. नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.