निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाही, ते नुसतेच बोलतात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे
मुंबई. प्रतिनिधी. १९.
एका बाजूला सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भारतीय जनता पक्षाला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केले होते. परंतु, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरु केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले.दुसरीकडे, भाजप नेते निलेश राणे आणि नितेश राणेंकडून शिवसेनेला सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी समाचार घेतला आहे. निलेश आणि नितेश राणे हे काहीही करू शकत नाहीत. ते नुसतेच बोलतात. आपण कोणामुळे मोठे झालोत हे त्यांनी विसरू नये, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी राणे बंधूंना फटकारले आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ऐन निवडणुकीच्यावेळी नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले. त्यावेळी आम्ही निलेश राणेंना दम भरला होता. सरकारी गाडी घेऊन ते फिरत होते. त्यांच्या विरोधात केसही टाकली होती. त्यांना माहीतच असेल, असं सांगतानाच आपण कोणामुळे मोठे झालो हे ते विसरले असतील. बाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले. काहीही बोलू नका आणि उपकार विसरू नका, असा सल्लाही खैरे यांनी दिला.
