🛑भविष्यात देखील कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूकदार यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्म करणार.- चेअरमन मानसिंग खोराटे
( 💥अथर्व-दौलत कारखान्यावरती कर्मचाऱ्यांना १५०० – रुपये वेतन वाढ – धोरणात्मक निर्णय.)
🛑पाणी चळवळीचे नेते डॉ भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत १२ ऑगस्ट रोजी मलिग्रे येथे कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा.👇
चंदगड.- प्रतिनिधी.

अथर्व-दौलत कारखान्यावरती दिनांक-३१/०७/२०२४ रोजी सेवानिवृत्त कामगारांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या वेळी अथर्व-दौलत कारखान्माचे चेअरमन उद्योजक मानसिंग खोराटे यांनी सांगितले कि कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी – ओढणी ठेकेदार यांच्या सहाय्याने गेली पाच गळीत हंगाम अथर्व-दौलत कारखान्माने यशस्वीरीत्या पार पाडली आहेत .
त्याच प्रमाणे कामगारांसाठी चेअरमन श्री. खोराटे यांनी १५००/- (एक हजार पाचशे) रुपये वाढ देऊन धोरणात्मक निर्णय जाहीर केला. कारखाना प्रगतीपथावर येत असून त्मातून कामगारासाठी चांगले धोरनात्मक निर्णय घेण्यात येत असल्याचे नमूद केले .
तसेच कामगारांची सुरक्षा हीच आपली प्राथमिकता या भावनेने कामगारांसाठी कारखान्यामार्फत अतिरिक्त आर्थिक भार सोसून १)” वर्कमेन कॉम्पेनशेशन व २) ग्रुप पर्सनल क्लेम फॉर २४ हॉवर्स” अशा प्रकारच्या सर्व समावेशक अश्या दोन पॉलीशी घेतलेल्या आहेत. अश्या या दोन पॉलीशी करिता एका वर्षासाठी तब्बल ४०.००.००० /- (चाळीस लाख रुपये) अदा केलेले आहेत.
भविष्यात देखील कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूकदार यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्म करणार असून त्मासाठी सर्वांनी अथर्व- दौलत कारखान्माला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी कारखान्माचे संचालक विजय पाटीलसो, टेक्निकल जनरल मॅनेजर एम.आर. पाटील सो, व सर्व खात्मांचे खातेप्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयानंद देवाण (पी.आर.ओ.) यांनी केले असून सूत्र संचालन अश्रू लाड (एच. आर.) यांनी केले शेवटी आभार प्रदर्शन हनमंत पाटील यांनी केले.
🛑पाणी चळवळीचे नेते डॉ भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत १२ ऑगस्ट रोजी मलिग्रे येथे कार्यकर्त्यांचा व्यापक मेळावा.
आज आजरा येथे झालेल्या बैठकीत निर्णय
आजरा – प्रतिनिधी.

चित्री, उचंगी, सर्फनाला, आंबेओहळ, एरंडोळ, धनगरमोळा धरणे पूर्ण झाली असली तरी आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील ५० टक्केहून अधिक गावे ही बिन पाण्याची राहणार आहेत. त्यांचा पाण्याचा हक्कच नाकारला जाणार आहे. आजरा गडहिंग्लज तालुक्यातील शेती करून जगणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सुखाने जगता येईल इतके पाणी त्यांना मिळाले पाहिजेत अशी यामागे भूमिका राहणार आहे. आटपाडी तालुक्यात पाणी संघर्ष चळवळीने केलेल्या आंदोलनामुळे समन्यायी पाणी वाटपाचा प्रकल्प राबविला आहे. बंद पाईपने प्रत्येक शेतकऱयांच्या शेतापर्यँत पाणी पोहचवले आहे. त्याच धर्तीवर आजरा गडहिंग्लज तालुक्यतील शेतकऱयाना हक्काचे बारमाही पाणी मिळावे यासाठी चळवळीची दिशा ठरविण्यात येणार आहे.
या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ भारत पाटणकर, मुंबई आयआयटी सीतारा प्रमुख बकुळ राव, डॉ आदित्य खेबुडकर, सिव्हिल विभाग प्रमुख, डॉ यतीन दिवाकर, डॉ मेघराज, कॉ संपत देसाई इत्यादी तज्ञ मंडळी येणार आहेत. मलिग्रे येथे होणाऱ्या या बैठकीस दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यानी १२ ऑगस्ट रोजी ठीक १२ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन श्री अशोक तरडेकर, संजय घाटगे, अशोक शिंदे, विश्वास बुगडे, शिवाजी भगूत्रे, बाबू येडगे, प्रकाश मोरुस्कर काशिनाथ मोरे उपस्थित होते.
