Homeकोंकण - ठाणेनव्याने प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव.-वि. मं. साळगावचा अनोखा उपक्रम..

नव्याने प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव.-वि. मं. साळगावचा अनोखा उपक्रम..

नव्याने प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव.-वि. मं. साळगावचा अनोखा उपक्रम..


आजरा. प्रतिनिधी. १६

कोव्हिड १९ महामारीमुळे शाळा बंद असल्याने इयत्ता पहिलीबरोबरच इतर इयत्तांमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमावर महामारीचे सावट आले. म्हणून वि. मं. साळगावने राबविला एक अनोखा उपक्रम. मुलांना शाळेत बोलविण्यात महामारीची अडचण आली म्हणून विद्यार्यांचे स्वागत करण्यास शाळेनेच मुलांच्या घरी जाण्याचे ठरविले.यानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये या कार्यक्रमाचे नियोजन करुन नवागत मुलांच्या सोयीने गावातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम निश्चित करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य सौ. संगिता कांबळे , श्री गणपती कांबळे , सौ. संगिता पाटील , सौ. मनिषा पाटील , सौ. यास्मिन पठाण यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी स्वीकारत कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे नियोजन केले.
कार्यक्रमाच्या प्रत्येक ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजिरी यमगेकर , ज्येष्ठ अध्यापक श्री संजय मोहिते तसेच अध्यापक निवृत्ती मिटके आणि सत्यवान सोन्ने यांनी शाळेच्या विविध उपक्रम , शासकीय योजना , आॕनलाईन अध्यापन , इ. विषयावर विद्यार्थी , पालक आणि उपस्थितांचे प्रबोधन केले. या कार्यक्रमास साळगावच्या सरपंच सौ. पूजा कांबळे, पांडूरंग पाटील शा. व्य.समितीचे सर्व सदस्य यांच्यासोबत नवागत मुलांचे पालक आणि इतर प्रतिष्ठित नागरिकांना उपस्थिती दर्शविली.
या कार्यक्रमाची माहिती देताना मुख्या.सौ. यमगेकर यांनी सांगितले की शाळा आणि गावचा समन्वय साधणे , नवागत मुलांना प्रत्यक्ष आपल्या शिक्षकांशी बोलता येणे , आॕनलाईन शाळेत कोणकोणत्या प्रकारे अभ्यास घेता येणे याची माहिती पालकांना होणे तसेच समूह अध्यापनासाठी योग्य ठिकाणे निश्चित करणे अशीही दूरदृष्टी होती . आणि या सर्वाचा इष्ट परिणाम म्हणून गावातील सर्व दाखलपात्र १७ मुले तसेच इतरत्र इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणारी ७ मुले अशा एकूण २४ मुलांनी शाळेत नव्याने प्रवेश घेऊन शाळेचा पट वाढविण्यास मदत केली. असा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.