गावची काळजी घेणारा वडकशिवालेचा. व्हाट्सअप.- कोवीड १९ ग्रुप. ठरला मदतीचा हात.
आजरा. प्रतिनिधी. १६.
मार्च २०२० मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व खेडीपाडी लाॕकडाऊन झाली ग्रामीण भागातील कष्टकरी, गरीब यांच्यासह वृद्ध लोकांची मोठी आबाळ होऊ लागली. किमान आपल्या गावातील लोकांना तरी मदत करता यावी म्हणून वडकशिवाले ( ता. आजरा ) येथील सुनील दिवटे यांनी आपल्या मित्रमंडळींना आवाहन केले आणि केवळ दोनच दिवसांत ६९ तरुणांनी ७५ हजारांचा निधी जमा केला. यातून कोवीड १९ हा व्हाट्सअप सोशल ग्रुप तयार करण्यात आला.
गावातील गरीब व गरजू कुटुंबे शोधण्यात आली. ११ लोकांना नेहमी लागणारी शुगर, बी पी अशा आजारांवरील औषधे लाॕकडाऊनच्या कालावधीत मोफत देण्यात आली. हाताच्या पोटावरील २२ कुटुंबांची मोठी आबाळ झाली . या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या . कोरोना कालावधीत चांगले काम केलेल्या अंगणवाडी सेवीका, आरोग्यसेविका , आशा यांचा भेटवस्तू देऊन कोवीड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.
गेले वर्षभर या ग्रुपकडून गावातील नागरीकांची कोरोना कालावधीत चांगली काळजी घेण्यात येत आहे . ग्रुपच्या सदस्यांकडून भाजीपाला व अन्य साहित्य मागणी करुन स्थानिक पातळीवर उपलब्ध करुन दिले जाते . गेल्या मे महीण्यात गावात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली. या रुग्णांना दवाखान्यात दाखल करणे, औषधे उपलब्ध करणे इत्यादी कामे ग्रुपच्या सदस्यांनी मनोभावे केली. दोन गरीब कुटुंबातील कर्ते पुरुष वारले. या कुटुंबियांना तातडीची मदत ग्रुपकडून देण्यात आली. गेले वर्षभर गावातील नागरीकांची या ग्रुपच्या माध्यमातून कोरोना कालावधीत काळजी घेण्यात येत आहे . विशेषतः मुंबई , पुणे येथील तरुण मंडळी यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. या अनोख्या उपक्रमाबद्दल पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
