🛑आत्मा अंतर्गत खरीप हंगाम भात पीक शेतीशाळा देवकांडगावात संपन्न.
🛑आजऱ्यातील ज्ञानदीव क्लासेस येथे रकदान शिबीर संपन्न..
( औचित्य गुरुपौर्णिमेचे )
आजरा.- प्रतिनिधी.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सन. २४/२५ अंतर्गत खरीप हंगाम भात पीक शेतीशाळा वर्ग मौजे देवकांडगाव ता. आजरा येथे आज दि. २२ रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी शेतीशाळा वर्ग कार्यक्रमास शेतकऱ्यांना रक्षा शिंदे प्रकल्प संचालक आत्मा कोल्हापूर, प्रवीण आवटे नोडल अधिकारी स्मार्ट, राजन कामत पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ स्मार्ट, प्रकाश पाटील मंडळ कृषी अधिकारी उत्तुर, गीता देसाई सदस्या तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती आजरा सूर्यकांत दोरूगडे रिसोर्स फार्मर सोहाळे, अक्षय पवार स्मार्ट कोल्हापूर अर्थतज्ञ, अमित यमगेकर सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आजरा यांनी मार्गदर्शन केले व भात रोप लागन प्रात्यक्षिके दाखवली यावेळी, महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजऱ्यातील ज्ञानदीव क्लासेस येथे रकदान शिबीर संपन्न..
( औचित्य गुरुपौर्णिमेचे )
आजरा.- प्रतिनिधी.

गुरुपौर्णिमेचे अवचित साधून
आजरा शहरातील गुणवत्तेमध्ये अग्रगण्य असणाऱ्या ज्ञानदीप क्लासेस येथे. रकदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये ३५ रकदात्त्रांनी रक्तदान केले. सर्व रखादात्यांना जीवनावश्यक हेल्मेट भेटवस्तु स्वरुपात देण्यात आली
क्लासेस चे संचालक नावलकर सर यांनी स्वागत व आभार मानले.