Homeकोंकण - ठाणेवादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रं अखेर सापडली.

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रं अखेर सापडली.

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रं अखेर सापडली.

मुंबई. प्रतिनिधी.‌

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वैद्यकीय तपासणीची कागदपत्रं अखेर सापडली आहेत. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात ही कागदपत्रं मिळाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हाधिकारी, आणि पोलीस अधीक्षकांची बैठक होणार आहे, त्यावेळी ही कागदपत्रं सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संजय घोगरे यांनी दिली. पूजा खेडकर यांनी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2021 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र मिळवले होते. वादग्रस्त आयएएस अधिकारी डॉ. पूजा खेडकर यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर केल्याची माहिती समोर आली आहे. 2007 मध्ये पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता. त्या वेळी NT – 3 (भटक्या जमातींसाठी आरक्षित) कोट्यातून प्रवेश घेतला होता. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8 लाखांच्या आत असल्यास नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळते. मात्र, त्यांनी मेडिकल प्रवेशासाठीही नॉन क्रिमीलेअरचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. मेडिकल प्रवेशावेळी विद्यार्थ्याला फिटनेस सर्टिफिकेट देखील सादर करावे लागते. काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर यांनी फिटनेस सर्टिफिकेट सादर केले होते. त्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे दिव्यांग नसल्याची नोंद आहे. त्यामुळे कॉलेज प्रवेशाच्या वेळी त्या पूर्णपणे तंदुरुस्त होत्या असे दिसून आले आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांनी पुण्यातील जिल्हा रुग्णालयातून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला होता. शारीरिक दृष्ट्या विकलांग म्हणजेच कुठल्यातरी व्यंगामुळे हालचालींवर मर्यादा येत असल्याचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी त्यांनी अर्ज केला होता. 23 ऑगस्ट 2022 रोजी त्यांची वैद्यकीय तपासणी झाली होती, परंतु 11 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची विनंती फेटाळण्यात आल्याचे औंध जिल्हा रुग्णालयाकडून लेखी कळवण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.